साहित्य : डाळीचे पीठ - २ वाट्या
बारीक रवा - पाव वाटी
हिरवी मिरची,आले , लसुण यांचे वाटण - २ चमचे
मीठ
साखर - १/२ चमचा
तेल - २ चमचे
लिंबाचा रस - २ चमचे
खायचा सोडा - १/२ चमचा
फोडणी - तेल , मोहरी, कढीपत्ता , कोथिंबीर
- डाळीचे पीठ , रवा , हिरवे वाटण , मीठ , साखर ,लिंबाचा रस एकत्र करावे. त्यात तेल व गरजेनुसार पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.हे मिश्रण अर्धा तास तसेच राहु द्यावे. नंतर त्यात खायचा सोडा घालुन एकत्र करावे.
तेल लावलेल्या थाळीमध्ये हे मिश्रण घालुन एकसारखे पसरावे व कुकरमध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावे.
थंड झाल्यावर तुकडे कापुन घ्यावेत. तेल ,मोहरी , कढीपत्ता यांची फोडणी वरुन घालावी.
कोथिंबीर व ओले खोबरे घालुन सर्व्ह करावे.

वाचने
12150
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला एवढं सोप्पंय होय ढोकळा
फोटो
In reply to हायला एवढं सोप्पंय होय ढोकळा by मेघवेडा
फोटो असतातच हो.. फक्त ते
In reply to फोटो by पैसा
वा! ढोकळा! लैच मस्त की!
In reply to फोटो असतातच हो.. फक्त ते by मेघवेडा
सहमत
In reply to वा! ढोकळा! लैच मस्त की! by असुर
परा ची स्थिती काय?
In reply to फोटो असतातच हो.. फक्त ते by मेघवेडा
परा ची स्थिती काय? हम
In reply to परा ची स्थिती काय? by चिंतामणी
छान पण फोटो?
मी फोटो टाकला होता पण दिसत
In reply to छान पण फोटो? by सुनील
पाशवी शक्ती
In reply to मी फोटो टाकला होता पण दिसत by प्राजक्ता पवार
पा श
In reply to पाशवी शक्ती by सुनील
तुका गो कोणी सांग्ल्यान?
In reply to पा श by पैसा
हैसर नव्या रेशिप्या ईल्यार
In reply to तुका गो कोणी सांग्ल्यान? by प्रीत-मोहर
प्रश्न आणि उत्तर
In reply to हैसर नव्या रेशिप्या ईल्यार by सूड
माका काय ता म्हायत नाय!! माका
In reply to प्रश्न आणि उत्तर by सुनील
कोणे सांगला?
In reply to तुका गो कोणी सांग्ल्यान? by प्रीत-मोहर
छान पाकृ! मगाशी येउन गेले
वा...
मस्तच
इनो
In reply to मस्तच by नेहरिन
"मुगाच्या डाळीचा ढोकळा"
अलिबाबाची गुहा आणि रेपिप्यांचा खजिना.
In reply to "मुगाच्या डाळीचा ढोकळा" by नेहरिन
वाह वाह वाह ! सकाळ सकाळ असे
मि बरयाच वेळा प्रयत्न केला
वा!
मला कधीही न जमलेला