माझ्या बागेतील फुले
हा आहे सोनटक्का. ह्याचे मुळ आल्यासारखे असते. एक रोपटे किंवा मुळ लावले तरी ह्याच्या बाजुला त्याची पिल्ले भराभर तयार होतात. मोहक सुगंधाने सोनटक्का स्वतःकडे आकर्षीत करुन घेतो. बाजारात पानात बाधुंन ह्याची फुले विकायला येतात पण बरेचदा ही अर्धवट उमललेलीच दिसतात. सोनटक्क्यामधे पिवळा रंगही असतो. पिवळ्या रंगाचे फुल आकाराने थोडे छोटे असते.
हा आहे डेलीया माझ्या बागेतील नविनच पाहूणा. आमच्या जवळच्याच नर्सरीतुन घेतला. ह्यामध्ये मला पिवळा किरमिजी रंगही दिसला. पण हा जास्त आवडला म्हणून हा घेतला.
हा माझ्याकडील गावठी गुलाब. लहानपणापासुन ह्याचे अॅट्र्याक्शन होते. कारण ह्याचा मंद सुगंध आणि झाड मोठ झाल की अगदी चांदण्या लागल्यासारख बहरत हे. माझ्याकडे सध्या छोट आहे तरी रोज ४-५ फुले लागतात. ह्याचा गुलकंदही करतात.
हा गुलाब लोणावळ्याच्या नर्सरीत सापडला. ह्याच्या मनमोहक रुपावर भाळले आणि त्याला घरी घेउन आले. आता ह्याला १ वर्ष पुर्ण झाल असेल.
हा सुद्धा लोणावळ्याच्याच नर्सरीतला मिनिचर गुलाब. खर तर ह्याला झुबक्याने लागतात फुल. पण फुलांचे छोटे रुप पाहुन ह्याला सावली मिळावी म्हणून डबलच्या तगरीने हिच्यावर आपली छाया पसरवली. त्यामुळे हल्ली असे १-२ लागतात.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकदम छान.........
असेच म्हणतो
केशरी गुलाब मस्त
प्रियाली जांभळ्या गुलाबाचा
बाग आवडली. आमच्या बागेत
जागु मला कोणताही फोटो दिसत
सुंदर आहेत फुलं!
अ-प्र-ति-म!!!!
बाग आवडली
वा सुंदर बाग!
वा !
छान
मस्त जागुताई. मला तो शेवटचा
मस्तच. सोनटक्का किती तरी
वेताळ, विलासराव, प्रियाली,