सारणासाठी साहित्य:- २ वाट्या सुकं खोबरं, १टेबलस्पून खसखस(भाजून पूड करुन), १वाटी पिठी साखर, १टी स्पून वेलदोड्याची पावडर, चिमुटभर मीठ.
पारीसाठी साहित्य:- १वाटी बारीक रवा, १वाटी मैदा, १/२ वाटी दूध आणि पाणी, १टी स्पून मीठ , १चिमूट बेकिंग सोडा, १ टेबलस्पून वनस्पती तुप.


From मोदक " alt="" />
कृती:- खोबरं खिसून भाजुऊन घ्याव. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक करुन घ्याव.मग त्यात भाजून पूड केलेली खसखस , पिठी साखर, वेलदोड्याची पावडर घालून छान एकत्र कराव. सारण तयार झाले .
मैदा चाळून घ्यावा.त्यात रवा मीठ बेकींग सोडा घालून दूध पाणी घालून भिजवून घ्यावा . थोडासा तुपाचा हात लावून चांगला मळून २/३ तास झाकून ठेवावा .


From मोदक " alt="" />
नंतर त्याला थोडं तूप लावून पीठ कुटून घ्याव. पीठाला चमक आली म्हणजे पीठ तयार झालं. त्याचे दोन भाग करुन त्यातल्या एका गोळ्याची मोठी पोळी लाटून घ्यावी.उरलेले तूप चांगल फेटून घ्याव आणि त्या पोळीवर लावाव.


From मोदक " alt="" />
मग त्या पोळीचा रोल करुन दोन्ही कडा बंद कराव्यात. त्या रोलचे १ इंचाचे तुकदे करावेत. त्या तुकड्यांना दोन्ही बाजूनि पीळ देऊन त्याची पुरी लाटावी.


From मोदक " alt="" />


From मोदक " alt="" />
त्या पुरीला हातावर ठेवून ४पाकळ्या कराव्यात म्हणजे सारण छान भरता येत. १ चमचा सारण त्यात घालून उरलेल्या पाकळ्या करुन मोदक बंद करवा.
ओव्हन १८०सें.ग्रे. ला तापवून घ्यावा. त्यामधे तया केललेले मोदक ५/७ मिनिटं बेक करुन घ्यावेत्. एकदा बघुन गरज वाटल्यास परत ५ मिनिते बेक करावेत. मोदक तयार झाले.


From मोदक " alt="" />
(फोटो- चिंतामणी पळसुले)
वाचने
5605
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! हे देखील मस्तच!
छान हो नेहरिन तै
आभार
मस्त...
ह्म्म्म.. छानच आहे
चिंतामणी
माझी भूक चाळवली, मोदक
मस्त
हेच
In reply to मस्त by सुनील
बेक्ड करंजी ऐकून जुनी झाली,
मॅडम
In reply to बेक्ड करंजी ऐकून जुनी झाली, by रेवती
मोदक मस्तच आहेत... मलाही ते
In reply to मॅडम by चिंतामणी
वा मस्तच आहे ही पाकृ आता करुन
वाह वाह हि पाकृ पण उत्कृष्टच
परिकथेतील राजकुमार
In reply to वाह वाह हि पाकृ पण उत्कृष्टच by परिकथेतील राजकुमार
वा! मस्त आहे ही पाकृ!
करून पहायलाच हवे! मी अजुन असे