सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण कसे राबवावे?
माझ्या मित्रासबरोबर काल गप्पा चालल्या होत्या. त्याने सांगितलेला हा प्रसंग.. "त्याचा इस्त्रीवाल्याच्या मुलाला शिकायचे नाही असे तो इस्त्रीवाला माझ्या मित्राला दोन वर्षांपूर्वी सांगत होता. तेव्हा मित्राने कारण विचारले असता त्याला शाळेत जे शिकवतात ते आवडत नाही (आणि त्यामुळे नीट येतही नाही). त्याची सगळी आवड गाड्यांचा "मेकॅनिक" किंव तत्सम मशिन्सना उघडण्यात आहे आणि शाळेत ते काही शिकवत नाहीत. इस्त्रीवाला नुकताच गावाहून आला होता. मुलगा गावी असताना नियमित शाळेत जात असे त्यामुळे त्याच्या पायाभुत गोष्टीच कच्च्या होत्या. त्याला इंजिनियर हो म्हणणे धाडसाचे ठरले असते. अश्यावेळी मित्राने त्याच्या मुलाशी बोलून त्यास आय.टी.आय.च्या कोर्सबद्द्ल सांगितले. मात्र त्यात ऍडमिशन मिळण्यासाठी दहावी / बारावी ही किमान परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असेही सांगितले. मात्र ही नवी माहीती मिळाल्यानंतर आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळेल असा हुरूप येऊन दोन वर्षे चांगला अभ्यास करून तो दहावी झाला व त्याला आता आयटीआयला ऍडमिशन मिळाली आहे"
मित्राला ही कथा ऐकून म्हटले "अरे वा! चांगलं काम केलस की"
तो म्हणाला "अरे त्यासाठी नाही सांगितली हि गोष्ट. सांगायची गोष्ट अशी की आता आपल्याकडे शालेय शिक्षण सक्तीचे होऊ लागले आहे. मी त्या इस्त्रीवाल्याच्या मुलाला मार्गदर्शन करू शकलो पण हे सार्यांच्या बाबतीत होईल असे नाही. बहुतांशी मुले कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एकाच प्रकारचे साचेबद्ध शिक्षण घेणार व कमीतकमी १५ वर्षात पदवीधर म्हणून बाहेर पडणार. पुढे केवळ शाळेत जायचं म्हणून एकाच प्रकारचे शिक्षण घेणारी अख्खी पिढी उभी राहील. एकाच प्रकारे घेतलेले शिक्षण, साधारण एकाच छापाचे विचार व एकाच पद्धतीने ब्रेन कंट्रोल केलेली पिढी तयार होणार आहे हे कितपत बरोबर आहे?"
"अरे पण आपल्यावेळीही असेच तर होते. सगळे जण तोच अभ्यासक्रम शिकायचे. तरीही सगळे एकाच साच्यात विचार थोडेच करतो? आणि तुला काय म्हणायचे आहे? सगळ्यांना शिक्षण देऊ नये? का शिक्षणाची सक्ती करू नये? चांगल्या गोष्टी कोणी आपणहून करत नसतील तर काहिशी सक्ती करावी लागु शकते"
"नाही शिक्षण नको असे नाही पण सरसकट शिक्षणाने काहि तोटे होणार आहेत त्याचाही विचार झाला पाहीजे"
"कोणते तोटे?"
"आता बघ आपण ट्रेकला गेलो होतो तिथे आपल्याला वाट दाखवायला आलेले आजोबा काय सांगत होते? 'चार बुकं शिकल्यापासून पोर गडावर फिरकेनाशी झाली आहेत. खाली उभं राहून शिग्रेटी ओढतील पण कोणाला वाट दाखवायलाही गडावर येणार न्हाईत' किंवा आपला मेकॅनिक पण ओरडत होता हल्ली गॅरेजमधे कामं करायला तरूण पोरं पटकन तयार होत नाहीत. हॉटेलवाल्यांना विचार त्यांना वेटर नेहमी "मागास" म्हणजेच अशिक्षित राज्यांतून का आणावे लागतात? थोडक्यात सगळ्यात मोठा तोटा म्हणजे शारीरिक श्रमांचे मुल्य कमी होऊन ते श्रम करायला लागणार्या मनुष्य बळाची कमतरता येत्या वर्षांत वाढणार आहे. शिवाय एका छापाचे शिक्षण घेऊन होणारी सृजनशीलतेची कमतरता हाही लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. याच बरोबर एकाच प्रकारच्या मनुष्यबळाची होणारी वाढ झाल्यावर त्यांचे नोकरीचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यामुळे वाढता असंतोष व तरुणांचे चुकीच्या मार्गाला लागणं ही बायप्रोडक्ट्स आहेतच"
मी मित्राचं बोलणं ऐकून विचारात पडलो हे खरं..
सार्वत्रिक शिक्षण हवेच हे खरे. पण ते एकाच प्रकारचे हवे का? जर
- शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे काय शिकावे याचीही सक्ती करणे कितपत योग्य आहे? (शालेय शिक्षणात)
- सक्तीच्या शालेय शिक्षणाचे फायदे आपण सारेच जाणतो आणि ते आहेतच. पण या सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचे काही तोटे आहेत का? असल्यास त्यावर उपाय काय?
- शिक्षण घेऊनही शारिरीक श्रमाला मोल व श्रमजीवनाला प्रतिष्ठा देणे हे शक्य आहे का? असल्यास कसे?
- इतक्या सुशिक्षितांना जर फारसे शारिरीक श्रम न करता पैसा हवा असेल तर तशा नोकर्या उपलब्ध आहेत का? नसल्यास ह्या सार्वत्रिक शिक्षणामुळे असंतोषाची संभावना कितपत वाढते?
- थोडक्यात, सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण देताना काही खबरदारी, विषेश योजना, पुरवणी नियम असणे गरजेचे आहे असे वाटते का?
प्रतिक्रिया
पारंपारिक शिक्षण व अंगभूत
इथे असाही युक्तीवाद असु शकतो
जन्मल्या जन्मल्या
ॠषिबॉय मस्त विषय कुटायला
ठरवणार कसं?
परा, समद्विभुज त्रिकोण आणि
मुद्दा हा आहे
थोडक्यात सगळ्यात मोठा तोटा
सहमत
>> शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा
चित्रात फरक पडलेला नाही
श्रमाला प्रतिष्ठान
वा! तुमच्याकडून
सर्व शिक्षा अभियान
ह्म्म्म्म
घरकामाला मुली
ठ्ठो!
नक्की ?
उत्तम चर्चा ! मला
सुतार्,लोहार..कुंभार व इतर
अभिनंदन
ऋषीकेश यांच्या लौकिकाला जागणारा लेख आणि चर्चाविषय
शिक्षणाची 'सक्ती' आहे म्हणजे
"ते" वाक्य