कच्छी दाबेली
वाढणी : चार माणसांकरिता ( प्रत्येकी दोन या अंदाजाने...... करताना दीडपट प्रमाणाने करा बरं का, म्हणजे कमी का केलीची भुणभूण होणार नाही )
साहित्य :
चार मध्यम-मोठे बटाटे उकडून + कुस्करून
एक मोठा कांदा बारीक चिरून
एका मोठ्या डाळिंबाचे दाणे
( डाळिंब न मिळाल्यास लाल/काळी द्राक्षे मध्ये चिरून घ्यावी.
तीही नसतील तर मनुका घ्याव्यात. )
चिंचगुळाची चटणी एक वाटी
मूठभर कोथिंबीर चिरून
बारीक शेव वरून भुरभुरायला
चवीनुसार मीठ
पाच चमचे कच्छी दाबेली मसाला
चार/पाच चमचे बटर/तूप ( वितळवलेले )
मसाला शेंगदाणे एक मोठी वाटी भरून
दोन वाट्या पाणी
आठ पाव ( आपल्याकडचे बेकरीतले पाव असतील तर अजूनच मस्त )
( किमान आठ हवेतच. शक्यतो दोन लाद्या आणाव्यात. )
कृती:
चिंचगुळाची चटणी :
दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )
मसाला शेंगदाणे करताना......
दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )
शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून वरीलप्रमाणेच उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.
मसाला बनविताना :
उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून/किसून घ्यावे. एका पसरट पातेल्यात तीन चमचे तूप टाकावे. गरम झाले की लगेच कुस्करलेले बटाटे, मीठ व दोन वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवावे. एक वाफ आली की कच्छी दाबेली मसाला घालून हालवावे. मिश्रण कोरडे होते आहे असे वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालावे. पुन्हा पाच मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे.
सगळे साहित्य तयार झाल्यानंतर पाव मधून कापून त्याचे दोन भाग करावेत. तव्यावर दोन चमचे बटर टाकून सगळे पाव खालून वरून शेकून घ्यावेत. नंतर लगेचच एकेका पावाच्या तळच्या भागावर बटाट्याचा मसाला पसरावा. ( दोन चमचे तरी हवाच. आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घ्यावे ) त्यावर मसाला शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर व शेव घालावी. पावाच्या वरच्या भागावरही हलकासा बटाट्याच्या मसाल्याचा थर लावून चिंचगुळाची चटणी घालून तळच्या भागावर किंचितसे दाबून ठेवावे व गरम गरमच खायला द्यावे.
टीपा :
कच्छी दाबेली तसा वेळखाऊ पदार्थ मुळीच नाही. तयार मसाला शेंगदाणे, एखादा दिवस आधी चिंचगुळाची चटणी तयार करून ठेवली तर अक्षरशः: अर्ध्या तासात काम तमाम होऊ शकेल.
कच्छी दाबेलीचा तयार मसालाच वापरावा. मी टिट-बिट कंपनीचा दाबेली मसाला वापरला आहे. बर्याच कंपन्यांनाचा मिळतो पण त्यातल्या त्यात हा जास्त छान वाटला. खाताना पावही गरम हवेत व आतला बटाट्याचा मसालाही गरम हवा, त्यामुळे अजूनच मजा येते.
कच्छी दाबेली अतिरेक तिखट नसते. खट्टामीठा व थोडा तिखा अशी लागायला हवी.
लहान-मोठ्या मुलांच्या पार्टीसाठी हिट व पोटभरीचा पदार्थ. :)

वाचने
15029
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
वा! धन्यवाद. कित्येक दिवसात
गणपतीत रात्री जागरणात
छान
यम यम... यातले मसाला
ज ह ब र्या !! काय शॉल्लेट
मस्तच.
कच्छी दाबेली
In reply to कच्छी दाबेली by निवेदिता-ताई
हा हा ...दे इकड पाठ्वून..........फस्त करते.?
मस्तच!! मी शोधतच होते
In reply to मस्तच!! मी शोधतच होते by स्वातीदेव
सध्या पुण्यात कुठला चांगला
मसाला
मस्त..
स्वातीतै, दाबेली मसाला कसा
आवडली पन
यम्म यम्म्म यम्म्म!
In reply to यम्म यम्म्म यम्म्म! by अरुंधती
अरुंधती,
हा आमच्यासारख्या एकट्या
व्वा! या शनिवार चा बेत
उद्याचा बेत ठरला! फोटू
हा कच्छ प्रांतातील पदार्थ
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by भानस
धन्यवाद.
मस्त!
जहबहर्या!!
कसला खलास फोटू आहे राव!!
मनःपूर्वक धन्यवाद.
खलास!!! वारले, मेले,
रंगाशेठशी १००% सहमत. कहर आहे
मस्तच!!!!
एकदम शॉल्लेट ! आहे !
बनवली !!!
फोटो भयानक टेंम्टिंग आहे !
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
चमचमीत!!