मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंब्याचे मोदक

नेहरिन · · पाककृती
गणेशोत्सव जवळ आल्याने मोदकांचा वेगवेगळ्या पाककृती देत आहे. आंब्याचे मोदक सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्था चमचा साजूक तुप पारीसाठी साहीत्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी, अर्धा चमचा मीठ, पाणी From आंब्याचे मोदक" alt="" /> From आंब्याचे मोदक" alt="" /> कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तुप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे. एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅस बारीक करून वाफ आणावी. ५ मिनीटाने गॅस बंद करावा. ५ मिनीटाने त्यातील उकड काढुन घेउन, तेल पाण्याचे हाताने चांगली मळून घ्यावी. या उकडीचा लिंबा एव्हढा गोळा घेउन त्याला वाटीचा आकार द्यावा. From आंब्याचे मोदक" alt="" /> यात एक चमचाअ सारण घालून पारीला पाकळ्यांचा आकार देउन मोदक बंद करावा. तयार झालेले मोदक मोदकपात्रात उकडुन घ्यावेत. From आंब्याचे मोदक" alt="" /> From आंब्याचे मोदक" alt="" /> From आंब्याचे मोदक" alt="" /> (फोटो- चिंतामणी पळसुले)

वाचने 22655 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by मदनबाण

रेवती Tue, 09/07/2010 - 19:43
अरे थांब थांब! त्यातला अर्धा मी मागितला हे विसरलास काय?;) पाकृ मस्त! उकडीतही केशरीरंग नव्हे पण थोडा आमरस घालावा असे कुठेतरी वाचले होते.

In reply to by रेवती

रोचीन Wed, 09/08/2010 - 09:59
>>उकडीतही केशरीरंग नव्हे पण थोडा आमरस घालावा असे कुठेतरी वाचले होते. हो, उकडीसाठी लागणार्या पाण्यातच तो रस मिस्ळून घ्यायचा मग नेहेमीसारखी उकड करायची. छान केशरी रंग येतो.

मनि२७ Tue, 09/07/2010 - 18:01
आई ग.....sssssssssssssssssss तोंडाला पाणी सुटलंय.... आता केव्हा बाप्पा येतंय अस झालय.... खूप मस्त आहेत मोदक....

मनि२७ Tue, 09/07/2010 - 18:01
आई ग.....sssssssssssssssssss तोंडाला पाणी सुटलंय.... आता केव्हा बाप्पा येतंय अस झालय.... खूप मस्त आहेत मोदक....

मनि२७ Tue, 09/07/2010 - 18:01
आई ग.....sssssssssssssssssss तोंडाला पाणी सुटलंय.... आता केव्हा बाप्पा येतंय अस झालय.... खूप मस्त आहेत मोदक....

प्रियाली Tue, 09/07/2010 - 18:05
पाककृती मस्तच आहे. नक्कीच करून बघावी अशी पण हे आंब्याचा मावा प्रकरण कसे निस्तरावे? स्वाती दिनेश, स्वाती२, चित्रा आणि लेखिका नेहरिन काही टिपा आहेत का? रिकोटा चीज आणि आमरस एकत्र करून ढवळत राहिले तर पर्यायी मावा होईल का?

In reply to by प्रियाली

नेहरिन Tue, 09/07/2010 - 18:23
आपण कुठल्या गावात रहाता हे माहीत नाही. (माझे आहे ते नाही हे माहिती आहे.) त्यामुळे कुठे मिळेल हे सांगता येणार नाही. मात्र तयार मावा मिळ्तो हे नक्की.

स्वाती दिनेश Tue, 09/07/2010 - 18:17
प्रियाली, माझ्याही डोक्यात रिकोटा चीजच आले आधी. तसेही त्याचा मावा बनवून मग आंब्याच्या रसात/पल्पमध्ये मिसळून परत आटवल्यास पर्यायी व्यवस्था होऊ शकते असे वाटते. रिकोटा+ आम्रस+ एकत्र करुन आटवले तरी चालावे.नंतर त्यात ओले खोबरे मिसळून परत एक कढ द्यायचा. स्वाती पाकृ छान आहे,:)

In reply to by स्वाती दिनेश

रोचीन Wed, 09/08/2010 - 09:55
स्वातीताई, मला वाटतं कि आंब्याचा मावा म्हण्जे आटवलेला आंब्याचा रस! तिने कंसात साटं अस लिहिलेल आहे ना!! मी अनेक कोकणस्थ मैत्रिणींना आटवलेला आंब्याचा रसाला मावा म्हणतांना ऐकले आहे.

In reply to by रोचीन

स्वाती दिनेश Wed, 09/08/2010 - 12:53
म्हणजे आटवलेला आंब्याचा गोळा होय? आंबा + नारळ वड्यांसाठी घेतो तो? पण आमरस+ नारळात खवा घातला तर अजून छान लागेल ना? :) कोकणस्थ मैत्रिणी साटं म्हणतात? पण आम्ही आंबापोळी, फणसपोळीला आंब्याची साटं,फणसाची साटं म्हणतो त्यामुळे जरा 'कनफूजन' झाले माझे. :) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चिंतामणी Wed, 09/08/2010 - 14:14
म्हणजे आटवलेला आंब्याचा गोळा होय? आंबा + नारळ वड्यांसाठी घेतो तो? व्हय हो. तेच ते. 'कनफूजन' होउ नये म्हणून पहिल्या फोटूत दाखवला आहे "आंब्याच्या माव्याचा गोळा"

In reply to by स्वाती दिनेश

रोचीन Fri, 09/10/2010 - 12:51
>>>कोकणस्थ मैत्रिणी साटं म्हणतात? नाही, मावा म्हणतात. :) >>आम्ही आंबापोळी, फणसपोळीला आंब्याची साटं,फणसाची साटं म्हण>>. आम्हीपण!!! :) >>आमरस+ नारळात खवा घातला तर अजून छान लागेल. हो , पण तो हवाच असे नाही म्हणून त्यासाठी रिकोटा चीजचा खवा बनवण्याचे कष्ट कशाला?? म्हणजे वेळ असेल तर जरूर करा पण वेळ नसेल तर नाही केला तरी चालेल, एवढंच!! बाकी केल्यावर फोटो टाकालच!!! :) :)

मितान Tue, 09/07/2010 - 18:21
तुमची पाककृती नि स्वातीतैचा सल्ला एकत्र करून बघते :) काय बिशाद मोदक बिघडण्याची !!!

अजबराव Wed, 09/08/2010 - 07:27
उकड कशि घ्यायचि या साथि अजुन महिति हवि आनि काहि खास टिप्स असतिल तर सान्गा....मला निट जमत नाहि...

In reply to by अजबराव

नेहरिन Wed, 09/08/2010 - 11:17
एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅसबारीक करूनझाकण ठेवून ५ मिनिटे वाफ आणावी.गॅस बन्द करुन ५ मिनिटे तसेच ठेवावे

In reply to by नेहरिन

छोटा डॉन Wed, 09/08/2010 - 11:26
>>येताना नारळ आणि देसाई बंधू आंबेवाले यांचे कडुन आंब्याचा मावा घेऊन येणे. +१, हेच म्हणतो. परा, ते सगळे विकत घेऊन झाले की मगच माझ्याकडे ये, आपण दोघे मिळुन जाऊ मोदक खायला. नेहरिन मॅडम, जबरा झाली आहे हो पाकॄ. फोटो पाहुन तर जीवाचे पाणीपाणी झाले, फारच उत्तम !!! - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

येताना नारळ आणि देसाई बंधू आंबेवाले यांचे कडुन आंब्याचा मावा घेऊन येणे.
बर बर ! बिल काका देणार म्हणल्यावर काय कुठुनपण आणु की ;)
परा, ते सगळे विकत घेऊन झाले की मगच माझ्याकडे ये, आपण दोघे मिळुन जाऊ मोदक खायला.
डोन्या भोसडीच्या अजुन पुण्यात आला पण नाहीत आणि किती गोष्टीत शेअर मागुन ठेवतोस बे ? पब्लिक लिमिटेड प्रेमी

विसोबा खेचर Wed, 09/08/2010 - 13:32
सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आब्यांचा मावा (साटे),
माझं मत - आंब्याचा आटीव रस..आंब्याची साठं उपेगाची नाहीत.. हापूस आंब्याचा ताजा रसच हवा. डब्यातलाही चालणार नाही.. रसरशीत पिकलेल्या हापूस आंब्याच्या ताज्या रसाकरता अन्य कोणताही पर्याय नाही.. तात्या.

In reply to by स्वाती२

नेहरिन गुरुवार, 09/09/2010 - 09:26
कॅन मधला आमरस घेतला तर सारण कोरड व्हायला खूप वेळ लागतो. करुन बघायचे असल्यास हरकत नाहि.आंब्याच्या साट्यामुळे सारण पटकन तयार होईल.

विलासराव गुरुवार, 09/09/2010 - 12:01
आधी स्वाती ताईंचा केक, मग भानसांची कच्छी दाबेली आनी आता तुमचे मोदक. असे जिवघेणे फोटो पाहून एकच प्रश्न पडतो. जगाव की मराव ? जगाव -तर नुसतेच फोटो बघायचे. मराव - कारण असे पदार्थ खायला मिळत नाहीत. उद्या काही बरवाईट झालच तर त्याची जबाबदारी सर्व मिपाकर पाकॄवाल्यांचीच.