कारल्याची सळीभाजी
लागणारे जिन्नस:
पाव किलो कारली (कारली स्वच्छा धुवुन ती उभी सळ्यांसारखी कापावी चित्रात दाखवल्याप्रमाणे).
४-५ लसुण पाकळ्या
कढीपत्ता
हिंग,
हळद,
जिर
मसाला
थोडा लिंबु रस
चविपुरते मिठ
१ चमचा साखर
२ चमचे शेंगदाणा कुट
क्रमवार पाककृती:
मिपावर बर्याचदा काहीजणांची शब्दांची लढाई चालू असते. म्हणून म्हटल जरा त्यांना शाद्बीक लढाईयुक्त रेसिपी देऊ.
सगळ्यात आधी कारली धुवुन घ्या मग त्यांची चिरफाड करुन त्याच्या सळ्या जश्या बटाट्याच्या बाजारात मिळतात त्याप्रमाणे साधारण तेवड्याच आकाराच्या सळ्या करा. आता गॅसवर भांड ठेवा आग लावुन भांड चांगल तापू द्या. भांडे आणि तेल तापले की जिर, हिंग, लसुण, कढीपत्ता, हळद हे फोडणीचे सैन्य तापलेल्या तेलावर सोडा. जर तेल चागले तापले असेल तर लढाई चांगली जुंपते आणि ह्याची प्रचिती आपल्याला खमंग सुटलेल्या वासातुन येतो. फोडणीचा खमंग वास घेत बसू नका नाहीतर लढाईत जिन्नसांचा कोळसा होईल. भराभर परतुन लगेच त्यात सळ्यांची हत्यारे सोडा अजुन भडकवण्यासाठी वरुन मसाला टाका. थोड परतवुन शिजत ठेवा. हो पण मधुन मधून ढवळत राहा नाहीतर सैन्य तळाला बसेल. आता कारल शिजत आल की त्यावर अजुन लिंबुरस व मिठ चोळा म्हणजे घाला हो नाहीतर हाताने चोळायला जाल आणि मग युद्धात तुम्हीच जखमी व्हाल. परत त्यांना थोडी ढवळून चालना द्या. आता सगळे सैन्य हत्यारे थकली असतील म्हणून आता ही लढाई संपवण्यसाठी त्यावर साखर आणि शेंगदाणा कुट पसरवा आणि थोडे परवतुन एक वाफ येउन गॅस बंद करा म्हणजे लढाई संपली आणि तुम्ही जिंकलात.
चु.भु.द्या.घ्या.
अधिक टिपा:
आवडत असल्यास थोडा गोड्या मसाल्याचा मारा करा.
जर डाएटचा विचार मनात येत नसेल तर थोडे जास्त तेल टाकुन ही भाजी कुरकुरीत करता येते.
हे आहे लढाईचे सैन्य
येतोय का फोडणीचा वास ?
ही रंगसंगती कशी वाटते ?
ही आहे मी जिंकलेली लढाई.
येतोय का फोडणीचा वास ?
ही रंगसंगती कशी वाटते ?
ही आहे मी जिंकलेली लढाई.
वाचने
6531
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
हाहा! शाब्दिक लढाई मस्तच!
In reply to हाहा! शाब्दिक लढाई मस्तच! by मेघवेडा
+१
In reply to +१ by सहज
+१००
लढाई करून पहायला हवी..
मस्त
शॉल्लेट ग ! आमचा आवडता पदार्थ
मेघवेडा, सहज, प्राजक्ता,
मस्त पाकृ !
माझी आवडती भाजी...
छान
सळी!!!!
हा हा काय छान लुटुपुटीची लढाई
जागुतै, लढाई जिंकून जठराग्नि
छान!
सगळ्यांचे मनापासुन
ज ब रा !! लिखाणाची शैली आणी
खुपच छान
ही ही ही ही.
लढाई झाली.. आता महायुद्ध कधी?
कडू कारले फोडणीच्या सैन्यात
लढाई आवडली.
शुभांगी, आदिती, अरुण, प्राजू