Skip to main content

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे. हा रस्ता सज्जनगडाजवळून हिरव्यागार डोंगरा मधुन जातो. जाताना सज्जनगड तसेच उरमोडी धरणाचंही दर्शन होतं. रस्त्यापासून धबधबा थोडा आत आहे.पण तिथपर्यंत जाण्यासठी आता चांगल्या पायर्‍या बांधल्या आहेत. सतत पाऊस पडत असल्याने आम्हाला जरा जपूनच जावं लागलं. मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला एक लहान धबधबा आहे. त्याचे हे फोटो.. मुख्य धबधब्याच्या ४ धारा आहेत. त्यांचं मनोहारी दर्शन घेताना आणि पडणार्‍या पाण्याचा नाद ऐकताना आपल्याला तिथून हलावसं वाटत नाही. पावसापासून कॅमेरा जपावा लागत असल्याने फार फोटो काढता आले नाहीत. पण जे पाहिलं ते असं..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2528
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

देखावा सुंदर असावा पण चित्रे धूसर आली आहेत. पुरेशी स्पष्ट नाहीत.

फोटो नीट अपलोड झाले नाही. कृपया हा धागा काढून टाकावा. नवीन तयार केला आहे.