पालकभात
आमच्या गावात आपल्या हिरव्या पालेभाज्यांपैकी पालक ही एकच भाजी मिळते. ती पण कमीत कमी अर्धा किलो चे पॅकेट घ्यावे लागते. एवढा पालक न कंटाळता संपवायचा म्हणजे फारच सुगरणपणा दाखवायला लागतो ;) मग पालक पराठे, सूप, पालकभात असे भरपूर पालक लागणारे पदार्थ केले जातात. त्यातला एक प्रकार पालक भात.
लागणारा वेळ - ३० मि.
दोन फुल एक हाफ व्यक्तींसाठी.
साहित्य -
तांदूळ - १ मोठी वाटी
पालक - १ मोठी जुडी
कांदा - १ लहान ( ऐच्छिक )
लसूण पाकळ्या - ३ - ४
मटार - पाव वाटी
जिरे - अर्धा चमचा
दालचिनी - एक इंच
तमालपत्र - १
हिंग - पाव चमचा ( छोटा )
तूप किंवा लोणी - २ मोठे चमचे ( यापेक्षा जास्त घालू शकता )
मीठ चवीपुरते
सजावटीसाठी - काजू, टोमॅटो, कोथिंबीर, तीळ वगैरे ( ऐच्छिक )
कृती -
तांदूळ थोडे मीठ घालून मोकळा शिजवून घ्या.
पालक धुवून गरम पाण्यात ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. पाणी निथळून घ्या.
कांदा, लसूण बारीक चिरून घ्या.
पालक मिक्सरमधून वाटून घ्या.
शिजलेला भात थोडा गार व्हायला ताटात पसरून ठेवा. म्हणजे तो मोकळा होईल.
एका कढईत लोणी किंवा तूप टाका. गरम झाले की हिंग आणि जिरे घाला. जिरे लालसर झाले की तमालपत्र आणि दालचिनी घाला. वर लसूण आणि कांदा घाला. कांदा लसूण गुलाबी झाला की मटार घाला. गॅस बंद करा. आता पालकाची पेस्ट घाला. २ मिनिटे परतून घ्या. कांदा लसूण चांगले मिसळले गेले पहिजे. आता हे मिश्रण भातावर घालून चांगले मिसळून घ्या. पालक भात तयार.
आवडत्या भांड्यात भात ठेवून आवडेल तशी सजावट करा.
या भातासोबत नुसते लोणचे तोंडीलावणे म्हणून असले तरी छान. किंवा कढी, टोमॅटोचे सार किंवा ताक पण भाताची लज्जत वाढविते.
वाचने
6120
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
आनंदयात्री
In reply to आनंदयात्री by श्रावण मोडक
आत्ता कुठे बोलावताय त्याला?
In reply to आत्ता कुठे बोलावताय त्याला? by चतुरंग
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
काल जीटॉकवर साहेब "अव्हेलेबल"
मस्त
In reply to मस्त by सुनील
बरोबर आहे सुनील, पण दरवेळी
छानच पाकृ!
In reply to छानच पाकृ! by चतुरंग
तीळ
In reply to तीळ by स्वाती दिनेश
हो तसे पाककृतीत दिले आहे पण
ते तीळ आहेत
तों पा सु
मस्तच दिसतोय भात.. फोटो पण
मस्त दिसतोय भात...करुन बघेन.
मस्त दिसतोय.
मला पालक भात हा प्रकार महीत
मस्त पाकृ आणि फोटो तर अप्रतिम
वा वा छान खायला आवडेल..
रेसिपी आणि डेकोरेशन दोन्ही
In reply to रेसिपी आणि डेकोरेशन दोन्ही by जागु
+१
अजुन पाभा खायची वेळ आली
मस्त !!! फोटो तर फारच छान !