Skip to main content

आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो का?

लेखक आप्पा यांनी रविवार, 05/09/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्‍याच्या बायकोसारखा दुसर्‍याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा. आपणही विचार मांडा. आपण जो काही व्यवसाय करतात त्यात खुष आहात का आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2354
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

आम्ही व्यवसाय करत नाही, पुर्वी शाळेत असताना मात्र व्यवसाय सोडवायचो-नवनीतचा. आता मात्र नोकरी करतो आणि फार कमावत नसलो तरी सुखात आहोत. अर्थात अधिक पगाराची दुसर्‍याची नोकरी मात्र आवडते.

नोकरीही करत नाही आणि व्यवसायही करत नाही....

In reply to by सूर्यपुत्र

नोकरीही करत नाही आणि व्यवसायही करत नाही.... हे आमचे आयुष्यातले अंतिम ध्येय होय. -ध्येयवादी

In reply to by अप्पा जोगळेकर

बरोबर. (अंतिम ध्येय गाठलेला), (आणि त्यामुळेच नव्याने झालेला) ध्येयहीन. आम्ही अलीकडेच पिंका टाकायला सुरुवात केली आहे. @@ - आमचे राज्य - वयाची शंभरी..

आम्हाला 'लेडिज टेलर' चा व्यवसाय खूपच आवडतो.