Skip to main content

इतिहासाचे पुनर्लेखन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 03/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच. असो.. तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल. आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :- १) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ? २) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ? ३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? ४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही. ५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ? गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ? आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।। आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।। तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।। ५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ? ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.

वाचने 97333
प्रतिक्रिया 352

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

अंशतः सहमत आणि अंशतः असहमत . १. असहमत अशासाठी की संभाजीमहाराजांनी बाया ठेवल्या असतील तर तसं म्हणण्यात वाईट काय आहे. डॉ. सदाशिव शिवदे लिखील ज्वलज्वलनतेजस या पुस्तकात येसूबाईंनी शंभूराजांच्या दासीपुत्रांचा औरंगजेबाच्या छावणीतून सुटका होईपर्यंत नीट सांभाळ केला होता असे म्हटले आहे. पुढे जाऊन राजाराम महाराजांनी येसूबाई व शाहू यांस सोडविण्यासाठी २० वेळा प्रयत्न केले व छावणीवर छापे घातले असाही उल्लेख आहे. मग तसं होतं तर तसं म्हणण्यास प्रत्यवाय का? २. सहमत यासाठी की संभाजीराजांचा दाखला देऊन बाया ठेवण्याचं समर्थन करणार्‍यांनी आधी संभाजीराजांसारखा पराक्रम गाजवावा. इतक्या पराक्रमी माणसाच्या हातून असा बदफैली पणा झाला असेल तर तो समर्थनीय नाही पण क्षम्य नक्कीच ठरतो. म्हणजे त्यांचे गुण हे त्यांची थोरवी ठरवण्यास पुरेसे ठरतात आणि फक्त त्या अवगुणांमुळे थोरवी झाकोळली जात नाही. बाजीरावाच्या बाबतीतही असेच म्हणता येतील. थोडक्यात काय रावबाजी आणि संभाजी दोघे एका गाडीचे प्रवासी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हे बघा. त्या काळात अनेक लग्ने केली जायची. बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात. उपस्त्रिया म्हणजे काय ते जरा कोणी स्पष्ट करेल काय? जे त्या काळात योग्य होते त्याबद्दल उगाच कशाला मोठ्या माणसांना नावे ठेवायची. आणि ते मोहित्यांची मंजुळा वगैरे प्रकरण तर उगाच हवेतल्या गोष्टी आहेत असे मला वाटते. संभाजी महाराजांनी जर खरेच असे काही केले असते तर शिवाजी महाराजांनी नक्कीच त्यांना शिक्षा केली असती. शिवाजी महाराज म्हणजे काही आजकालचे राजकारणे नव्हते की काहीही करुन पोटच्या पोराला पाठशी घालतील. शिवाय ती जी कोण होती ती कोण्या बड्या सरदाराची नातेवाइकच होती तो बरे ऐकुन घेइल हे सगळे.

In reply to by मृत्युन्जय

झाडावरून उतरलोय.. मात्र रुमाल टाकलाय जागेवर> तुम्ही आजच्या काळातले नीतीमत्तेचे नियम संभाजी राजआंना लाऊ शकत नाहीत. त्याकाळात अनेकबायका असणे, अनेक बायकांशी राजांचे संबंध असणे समाजसंमत व शिष्टसंमत होते. राजांनी मग त्यांना का शिक्षा केली असती? झाडावर परत चढलो :P>

In reply to by ऋषिकेश

संभाजीराजांनी एका मुलीवर जबरदस्ती केली होती आणि एका विधवेला नादी लावले होते (जे त्या काळच्या प्रथेप्रमाणे अपराध होते) असा अपप्रचार केला जातो त्यांच्याबद्दल. त्याबद्दल बोलत होतो मी.

In reply to by मृत्युन्जय

नाही, हे खोटा आहे. त्या मुलीनेच संभाजीराजां वर बळजबरी केली होती, त्या ऐतराज मधल्या प्रियांका वाणी. आणि केला त्या विधवेचा थोडा उद्धार तर, काय बिघडले हो ? (एक पुणेरी पाटी : पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल )

In reply to by Dipankar

चूक. पहील्या बाजीरावालाही रावबाजी म्हणायचे. दुसर्‍यालाही अर्थात त्याच्या नावामुळे रावबाजी म्हणायचे. दुसर्‍याला बाजीरायी असेही म्हणायचे.

In reply to by Dipankar

>>एक छोटी चुक रावबाजी हे दुसर्‍या बाजीरावाला म्हणायचे पहील्या नाही. Dipankar या गोष्टी तुमच्या पेक्षा पेशव्यांनाच जास्त नाही का माहीत असणार...उगीच हुज्जत घालू नका. ;)

>>सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? आम्हाला काय माहीत, सर्व चित्रकार, छायाचित्रकार ब्राम्हण आहेत असा उपआरोप समजायचा का? हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा नाही का? >>रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? कधिही कुठल्याही असुराशी प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग आला नाही, कृपया पत्ता कळवणे. >>काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? मीपावर कुणाचे तरी नाव हलकटशी समानार्थी समजले जाते असं ऐकुन आहे. हा प्रश्नाला ते उत्तर देतील काय? >>ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? राजमहाल वनात असू शकत नाही काय? >>द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? हा न्याय करायला कुठले न्यायाधीश आणायचे. वळसे घालुन कोळसे उगाळणारे का? >>कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? कशी झाली ब्वॉ? उर्वरीत प्रतिसा(वा)द ब्रेक के बाद

In reply to by अर्धवट

>>कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? कशी झाली ब्वॉ? उगाच वेड पांघरुन पेडगावला जाउ नका. नियोगातुन पुत्रप्राप्ती झाले हे तर सर्वज्ञात आहे. त्या काळी योग्य होते ते. केले तसे तर बिघडले कुठे? फक्त कुंती माद्रीच का, अंबिका अंबालिका यांना सुद्धा पुत्रप्राप्ती तशीच झाली ना? त्यांच्याबाबतीत तर त्यांच्या मनाविरुद्ध झाली. मला या प्रश्नाचा रोखच कळाला नाही. हा धागा नक्की कशासाठी आहे पराशेठे कळेल का? ब्राह्मणांबद्दल आहे, कुंती - द्रौपदी बद्दल आहे, की अजुन कशाबद्दल?

लोकांना ब्राह्मणी मैना, ब्राह्मणी स्वैपाक वगैरे गोष्टी माहित असतील. मला या लेखनात ब्राह्मणी कावा दिसतो. ब्राह्मणी काव्या विषयी आम्ही पुरोगामी वैचारिक मासिक आजचा सुधारक ला लिहिले आहे. वाचा आता क्षत्रिय राम जानव घातलेला का दाखवतात? आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाही

In reply to by प्रकाश घाटपांडे

आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाही
आणि किल्ल्या अडकवण्यासाठीही! :)

In reply to by ऋषिकेश

आणि किल्ल्या अडकवण्यासाठीही!
वनवासात कसल्या किल्ल्या ? हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वनवासात कसल्या किल्ल्या ?
अयोध्येतील महालातील पर्सनल तिजोरीच्या ;) अयोध्या सोडली तरी सगळ्या किल्ल्या दिल्याचा उल्लेख रामायणात कुठे आहे?

In reply to by ऋषिकेश

अहो सीतेने सगळे अलंकार काढुन दिले. वल्कले नेसली. तर आता किल्ल्या घेउन कुठला खजिना जपणार होती ती. उद्या म्हणाल राज्य सोडले पण सिंहासन राम बरोबर घेउन गेला कारण त्याने सिंहासन परत दिल्याचा कुठलाच उल्लेख नाही म्हणुन. :P

In reply to by मृत्युन्जय

अहो सीतेने सगळे अलंकार काढुन दिले. वल्कले नेसली. तर आता किल्ल्या घेउन कुठला खजिना जपणार होती ती.
बरोबर.. म्हणूनच ती जानवे घालत नसावी ;) :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल जानवे होते की नाही इथपासूनच सुरुवात आहे ना! आधी हे सिद्ध करा की जानवे होते! राम उजवा होता असा उल्लेख आहे रामायणात सीता-स्वयंवराच्या वेळेस. म्हणजे बाण उजव्या हातानेच काढणार भात्यातून! म्हणजे भात्याची दोरी उजव्या खांद्यावरुन जात असणार! मग ते जानवे सव्य घालायचे सोडून भाता बांधायला सोपे जाईल म्हणून कोणी अपसव्य का करेल का? अपसव्य करायला त्यांचे तात तेव्हा हयात होतेच की! (मायला, जानव्यावर इतका विचार??? आवरा!) आणि किल्ल्यांचं म्हणाल तर त्या राजवाड्याच्या असतील हो. आमच्या मते जानव्याचा मुख्य उपयोग कानावर किंवा खुंटीवर (संदर्भ: बावन्नखणी) टांगण्यासाठी होतो! :-)

In reply to by असुर

बरं रामाचं सोडा.. अर्जुनाला सव्यसाचि हे नावं यावरूनच पडलं असावं! सव्यापसव्याचा हा खेळ तो लीलया करत असणार! :)

In reply to by यशोधरा

अर्जुनाला परवानगी असली पाहिजे, कारण त्यांचे तीर्थरूप सव्यापसव्याचा भार त्याच्या (दोन्ही) खांद्यावर टाकून गेले होते. :-)

In reply to by असुर

>>>>राम उजवा होता असा उल्लेख आहे रामायणात सीता-स्वयंवराच्या वेळेस. काय सांगता ? रामायणात आणि चक्क राम सीता स्वयंवरात ? जरा डीट्टेल देता का त्याचे नक्की काय काय झाले तेव्हा !!

In reply to by अवलिया

असं गृहित धरुन की आपण एकाच रामाबद्दल बोलतो आहोत, सीता-स्वयंवराच्या वेळी रामाने शिवधनुष्य उचलले ते डाव्या हाताने (जी एखाद्या उजव्या हाताच्या व्यक्तीसाठी नैसर्गिक गोष्ट आहे) आणि उजव्या हाताने प्रत्यंचा जोडायचा प्रयत्न केला असता ते धनुष्य तुटले. वाल्मिकिरामायणात हे वर्णन आहे. माझ्याकडे याचा श्लोक सद्ध्या उपलब्ध नाहिये, त्यामुळे पुरावा नाही असा दावा तुम्ही करु शकता. सद्य परिस्थितीत तो अगदीच गैरवाजवी नाही. तो श्लोक मिळाला की इथे च्योप्य पस्ते करतो!

In reply to by असुर

सीता स्वयंवराच्या वेळी राम होता की सीता स्वयंवर झाल्यावर कुणीही पण न जिंकल्याने अविवाहित राहिलेल्या सीतेच्या त्या स्वयंवराची माहिती मिळाल्यावर ते शिवधनुष्य आहे तरी कसे हे पहायला बर्‍याच काळाने राम मिथिलेला गेला होता?

In reply to by अवलिया

आमचे मत वर एकदा सांगून झाले असल्याने पुनर्लेखित करीत नाही! आपणास काही वेगळी माहीती असल्यास सांगावी. माझ्या ज्ञानात भर पडेलच, अधिक प्रस्तुत लेखकाचा विषय इतिहासाचे (+/- पुराणांचे देखील) पुनर्लेखन आहे, त्यांनाही एक वेगळा दृष्टीकोन मिळेल! कसे?

In reply to by अवलिया

असं भपकन (!) भडकायला मी त्या बाबतीत इतका प्रवीण नाही हो! उलट पुनर्लेखन चालूच आहे तर आपणही आपल्या पोतडीत काही जादुई माहीती असेल तर बाहेर काढा असा घाऊक आग्रह आहे हा! यात चिडाण्याजोगं काही आहे का आता.. असो, तुम्ही माहीती देत होता!

In reply to by असुर

आणि किल्ल्यांचं म्हणाल तर त्या राजवाड्याच्या असतील हो.
इतिहासाचार्‍यांचा एकेरी उल्लेख खटकला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ ३_१४ तै, ते राजवाडे वायले ओ! तेनला मदे आनू नका तुमी! हे राजवाडा बद्दल चाललंय.. काय ना म्हणजे, कोन काय सोचेल काय भरवसा नाय!

१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ?
कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनही वर्ण पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही. बहुधा मध्ययुगाचा महिमा असावा.
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.
नाही याचा अर्थ ते राजमहालात होते असा होतोच असे नाही (नक्की सांगता येत नाही) कदाचित, सुग्रीव किंवा वानरांमुळे सुरक्षित असणार्‍या किष्किंधा नगरीजवळील वनात त्यांचे वास्तव्य असावे.
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
बहुधा द्रौपदीची महती मोठी. ;-) किंवा तिला पाच पतिव्रतांमध्ये स्थान मिळाले म्हणूनही असेल. अर्थातच, वरील तिघींना नावे ठेवणारे मूर्ख आहेत असे मला वाटते. असो.
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ?
बोलायची मुभा आणि शक्ती मिळाल्यावर अनेक लोक बोललेले आहेत असे वाटते. प्रश्न काळाला अनुसरून वाटला नाही. ५ वा प्रश्न दोनदा आला आहे तो ५ वा आणि ६ वा असावा असे धरते. दोन्ही प्रश्नांत मला दोन्ही बाजूंचा थोडाफार द्वेष दिसतो. इतिहासाचा अभ्यास द्वेषाने करू नये हेच खरे. असो.

In reply to by प्रियाली

>>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही जाती पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही. या काळात देखील क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे मुंज होते. मी अशा मुंजींना गेलो आहे.

In reply to by अरुण मनोहर

या काळात देखील क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे मुंज होते. मी अशा मुंजींना गेलो आहे.
अशा गोष्टी अपवादात्मक असतात प्रातिनिधिक नव्हे. बाबा महाराज सातारकरांनी मुलाची मुंज केली होती किंवा तसा घाट घातला होता त्यावर टीका झाली होती. मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक? ;)

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक? ह्या सोडमुंजीला हली ब्याचलर पार्टी असे नाव आहे. अधिक माहिती साठी आमचा अत्यंत आवडता चित्रपट "द हँगओव्हर" बघावा.

In reply to by मिसळभोक्ता

हँगओव्हर चित्रपटातील नवरोबाची मुंज झालेली होती याचा पुरावा सादर करावा! सोडमुंज म्हणजे ब्याचलर प्यार्टी हा मुद्दा (व्यक्तिशः मला मान्य असला तरीही) त्यानंतरच ग्राह्य धरण्यात येईल. ;-) एकदा हा मुद्दा क्लियर झाला की अशी सोडमुंज ही तीर्थक्षेत्री (पक्षी: लास व्हेगास) करावी की नाही याबाबत मिपाकरांना एक कौल लावता येईल. :-)

In reply to by अरुण मनोहर

सहमत आहे. आमच्या वर लिहीलेल्या प्रतिसादातही तसे लिहीले आहे. सदर धाग्याचा उद्देश आपली संस्कृती कशी वाईट आहे हे दाखवणेच दिसतो आहे.

>>सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहे>> माझ्या माहितीप्रमाणे पुर्वीपासून मुंज आणि जानवे हे ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे आहे. ज्ञानार्जनाची सुरवात करतांनाचा विधी म्हणून मुंजीचे महत्व आहे. जुन्या काळच्या दुर्दैवी समाजकारणाने शूद्र वर्णीयांना शिक्षणापासून वंचीत ठेवले, म्हणून मुंज विधी पण नाकारला. असे इतर तीन वर्णांमधे नाही.

In reply to by अरुण मनोहर

ज्ञानार्जनाची सुरवात करतांनाचा विधी म्हणून मुंजीचे महत्व आहे. सहमत.

In reply to by चिंतामणी

ज्ञानार्जनापेक्षा, मामाच्या मुलीवर पहिला क्लेम करण्यासाठी मुंजीचे महत्त्व आहे.

In reply to by मिसळभोक्ता

ओ ते मुंजीचे नाही सोडमुंजीचे. मुंजीत लंगोटी लावून भिक्षावळीला बसायचं अन नंतर ब्रम्हचारी होऊन गुरुगॄही जायचं. सोडमुंजीत मामाची मुलगी वगैरे.

लक्ष ठेवून आहे धाग्यावर. बाकी आपला इतिहासाचा एवढा अभ्यास नाही की ह्यावर काही बोलावे. चालू द्या. रंगा

In reply to by चतुरंग

धागा छान होता. सविस्तर प्रतिसाद देण्याइतपत माहिती आणि वादविवाद, चर्चेइतपत मुद्दे होते. पण अनावश्यक, अवांतर प्रतिसाद पाहून प्रतिसाद द्याची इच्छाच मरून गेली. त्यामुळे धाग्यावर लक्ष ठेवूनच आहे/असणार आहे. असो. चालू द्यात. (सुस्पष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

का उगा नसतं कातडं पांघरताय राव..... हे म्हंजी रविंद्र जाडेजा टीममधी असल्यामुळं सचिननी क्रिकेट सोडण्यासारखंय.... तुमचं काम तुम्ही करा ना...का उगा दुसर्‍याच्या पाण्याव डोळा? भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

हरकत असल्यास सांगावी. दूर करता आल्यास पाहतो. हरकत नसल्यास, कृपया आपले काम करा. (आगाऊ)बेसनलाडू

ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
साफ चूक. विष्णूचा पहिला अवतार हा ब्राम्हण कुळातला होता (आणि हे कळल्यापासूनच आजकालचे ब्राम्हण 'ते' चापताना आढळतात)अशी धूळफेक तुम्हाला करायची आहे का? पहिल्याच मुद्द्यावर क्लिन बोल्ड झाल्यामुळे फुडे कण्टिन्यु करण्यात हशील नाही. अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण जास्त का ब्राम्हणेतर? ;)

In reply to by विंजिनेर

अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण जास्त का ब्राम्हणेतर?
च्यायला लोक एक काय काय अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात ना !

In reply to by परिकथेतील राजकुमार

काही अर्थबोध झाला नाही.असो. या वरून एक विनोद आठवला. ब्राह्मण (किंवा ब्राह्मणेतर) हा शब्द कसा लिहायचा या वर वाद सुरू होता. म्हणजे ह अर्धा नी म पूर्ण, की म अर्धा आणि ह पूर्ण.?? अगोदर ह की म वगैरे.

सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? सर्वप्रथम उपनयन संस्कार हा केवळ ब्राह्मणांसाठीच होता/आहे ही समजुतच मुळात चुकीची आहे. या शब्दाचा अर्थ जाणून घेणे आधी महत्त्वाचे आहे. चातुर्वर्णीय संस्था ही खूप अलिकडची आहे हो त्यामानाने. तरीही चातुर्वर्णीय संस्थेतही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य तिघांनाही उपनयन संस्कार सांगितलेला आहेच. मुळात गुरुगृही शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्‍यांचा उपनयन संस्काराने विद्यारंभ होत असे. यज्ञोपवीत हे त्या काळी शिक्षणाचा पासपोर्टच होता म्हणा ना. ज्याला शिकायची इच्छा असेल त्याने यज्ञोपवीत धारण करणे अनिवार्यच होते. विवाहाप्रमाणेच उपनयनातही मनुष्याला शपथा घ्यायच्या असतात. म्हणजेच यज्ञोपवीत धारण केलेल्याने उपनयनात घेतलेल्या शपथांचे, ब्रह्मचर्याचे पालन केलेले आहे आणि योग्य ते शिक्षण घेतलेले आहे! पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असणारच. आजच्याप्रमाणेच त्याकाळीदेखील विरोधक हे असणारच. ज्यांना उपनयनाच्या शपथा पटल्या नाहीत, त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले नाही, मग तेच असुर ठरले असावेत. त्यांनी आपल्या मुलांवरदेखील आपल्याच विचारांचे संस्कार केले असावेत! म्हणून कुणाच असुराच्या अंगात यज्ञोपवीत दाखवले जात नसावे. आणि रावण बिभीषण हे चांगले म्हटलेले ब्राह्मण होते राव. आणि महाराजांचाही उपनयन संस्कार झालेलाच होता. यावरून तोच जुना श्लोक आठवला - "अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठतः सशरं धनु। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं, शापादपि शरादपि॥

माननीय श्री. परिकथेतील राजकुमार यांस विनंती. आणखी काड्या घालू नका. जाती मोडा असे मोठे लोक सांगून गेले आहेत त्यांचा आदर राखा. हा धागा नसून काडी आहे असे वाटते. ( काडी - दोन अर्थानी - घालणे आणि लावणे) .जातीच्या पूर्वग्रह दुषित विचाराने बरबटलेला धागा वाटतो. उदाहरणच द्यायचे झाले तर धाग्याचा विषय. हा पहा धोरण मांडणी संस्कृती वावर धर्म विनोद इतिहास समाज जीवनमान तंत्र राहणी राजकारण शिक्षण मौजमजा प्रकटन मत विचार संदर्भ चौकशी बातमी सल्ला प्रश्नोत्तरे माहिती प्रतिक्रिया वाद प्रतिभा विरंगुळा आपल्या इतिहास लेखनास हार्दिक शुभेच्छा !! आपले लेखन करण्याच्या अधिकाराची पूर्ण जाणीव आणि आदर ठेवून हा माझा प्रतिक्रिया देण्याचा हक्क बजावत आहे. अवांतर चला आता २२६ चे रेकॉर्ड मोड्ण्याची 'तोड ' झाली. इतिहासप्रेमी कापूसकोन्ड्या

In reply to by कापूसकोन्ड्या

जाती मोडा असे मोठे लोक सांगून गेले आहेत त्यांचा आदर राखा. ते कितीही मोठे असले तरी ते चुकले. आणि त्यांनी शक्याशक्यतेचा विचार केला नाही असे म्हणावे लागते आहे.

मनात आलेले वाट्टेल ते लिहून टाकणारे लेख(न) थांबवा! नुकतेच असे रेसीडेंट इव्हील आपलं रेसीडेंट इतिहास तज्ञांनी सांगीतले होते ना.

In reply to by सहज

श्री सहजरावांचा एक धागा पापुलर झाल्याने त्यांना आता इतर पापुलर धागे बघवत नाहीत.

युद्ध परा-पुपे करणार | समर्थ-दादोजी मूळ आधार | ढगफुटी प्रतिसाद येणार |राघा रडणार निश्चित ||

१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? महेश हा पुर्वापार द्राविडांचा (राहुला द्रवडांचे पुर्वज नव्हे. हे वेगळे) देव मानला जातो. त्यामुळे शिवाचे सर्व अवतार अब्रह्मण्य आहेत. उदाहरणार्थे - हनुमान. शिवाय शंकराने असे विष्णुसारखे अवतार घेतल्याचे ऐकीवात नाही. तर मग हा शोध कुठुन लावलात की त्याचे अवतार ब्राह्मण म्हणुन दाखवले गेले आहेत. ब्रम्हाने सुद्धा असे अवतार घेतल्याचे ऐकीवात नाही. तुम्ही नक्की कुठल्या अवतारांबद्दल बोलत आहात? शिवाजीराजांना जान्हवेधारी दाखवले असेल तर त्यात चुक ते काय? त्यांची मुंज आणि सोडमुंज झालीच होती ना? केवळ त्यासाठी त्यांचे एक लग्न देखील करवण्यात आले होते म्हणे. ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ? पुप्यांनी म्हणल्याप्रमाणे विष्णुचे बरेच अवतार अब्राह्मण्य होते. त्यात पशु पण आले. आता विष्णुने गाढवाचा अवतार न घेउन गाढवांचा अपमान केला असे म्हणाल उद्या तुम्ही. २) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ? ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास नव्हते. उलट जेव्हा सुग्रीव बरेच दिवस निरोप धाडेना तेव्हा स्वतः लक्ष्मण जाउन त्याची कानौघडणी करुन आला होता. ३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? उत्तर आधीच दिले आहे. तसे मग तुम्ही अंबिका , अंबालिकेला देखील नावे ठेवणार काय? ४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही. एकल्व्याला पुढे कृष्णाने म्हणजे एका क्षत्रियाने मारले. त्याचा अंगठा देखील एका क्षत्रियाच्या जळफळाटामुळे गेला. ५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? मग काय समाध्या उकराव्या की काय आता? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ? काय पुरावे पुरावे चालवले आहे. पुरुन टाका एकदाचे दोघांच्याही आठवणींना म्हणजे सगळे सुखेनैव राहायला मोकळे. काय पुरावा हवा तुम्हाला. पुरावा म्हणजे काय ते आधी स्पष्ट करा. गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ? आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।। आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।। तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।। हेच हेच उरले होते आता. व्यासांनी पण महाभारत कोणाकडुन तरी चोरले असे जाहीर करुन टाका ना एकदाचे. ५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ? यात मस्तानी मुसलमान होती ना. ;) आता कळाले ते दैवी का ते?

In reply to by मृत्युन्जय

ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास नव्हते. उलट जेव्हा सुग्रीव बरेच दिवस निरोप धाडेना तेव्हा स्वतः लक्ष्मण जाउन त्याची कानौघडणी करुन आला होता. अगदी अगदी यावरच आम्ही टणत्कार लेख लिहिला होता, तेव्हा अनेकांच्या मनात धडकी भरली होती असे आमचे गुप्तहेर कळवतात.

सौंफु म्हणजे काय याचा अजूनही उलगडा झालेला नाही ... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणार्या धाग्यांना मिसळ्पावतर्फे काही बक्षिस मिळते का हो?

ते बराक ओबामा पण जानवे घालते का हो? नसल घालत तर ते कोण? क्षत्रीय, वैश्य, की क्षृद्र ? त्याचा पण खुलासा काय तो अत्ताच करा, पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सध्या ते मुसुलमान असल्याचे कळते. ख्रिस्चन असल्याचा संशय आहे. पुढे मागे त्यांनी हिदू धर्माचा ऑफिशियली स्विकार केला तर इथेच त्यांना कोणत्या जातीत टाकायचे यावर धागा झालेच तर कौलही काढता येईल. आधी त्यांनी हिंदू होणे गरजेचे आहे.