दुबई ला जाताय..जरा जपून
काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very-serious-warning-to-those-going-to-uae-and-gulf-countries.html
थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते. http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/7234786.stm . बहुतेक ढकलपत्र जुनं असाव. आत्ता पुन्हा फिरू लागल आहे.
खसखस ने जेट लॉग जातो हे नवीनच कळल. त्यापासून अफीम कशी बनवतात तेही पाहिल पाहिजे.
खरतर परदेशात प्रवास करताना कोणताही खाद्यपदार्थ बाळगु नये. देशी लोक कधी सुधारणार माहीत नाही. खसखस नाही खाल्ली तर काय फरक पडणार आहे काय माहित. हेच कडिपत्ता, ओवा, ई. ना लागु होत.
प्रतिक्रिया
बातमीबद्दल धन्यवाद. तसेही
दहा टक्के नाही रे
आला प्रतिसाद द्यायला बाहेर ! !
खसखस
क्या बोल रै ले थत्ते चाचा
खसखसची बोंडे
झोप
खसखसची बोंडे?
हा हा हा हा