Skip to main content

स्वीट कॉर्न घालुन आप्पे.

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 02/09/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीट कॉर्न घालुन आप्पे. आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- १.५ कप तांदुळ, ३ कप मका दाणे, १/४ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ,आले, मीरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. From APPE" alt="" /> कृती:- तांदुळ आणि डाळ वेगवेगळे ५-६ तास भिजत घालावेत.नंतर पाणी काढुन टाकुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. तयार झालेले पीठ ५-६ तासचे झाकुन ठेवले तर आप्पे जस्त हलके होतात. (पीठ रात्री करून ठेवावे) आप्पे करायचे आधी थोडावेळ स्वीट कॉर्नचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. बारीक करताना थोडे आले, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकावी. From APPE" alt="" /> तयार झालेल्या पिठात हे मिश्रण घालावे व खवलेला नारळ आणि चविनुसार मीठ घालुन एकजिव होई पर्यंत ढवळावे. आप्पे पात्राला थोडेसे तेल लावुन गॅसवर ठेवावे. आप्पेपात्र थोडेसे गरम झाले की त्यात चमच्याने पीठ घालावे. From APPE" alt="" /> आता उलटवुन थोडेसे तेल सोडुन पुन्हा भाजुन घ्यावेत. From APPE" alt="" /> अशा प्रकारे आप्पे तयार करुन नारळाच्या चटणी अथवा सॉसबरोबर गरम गरमच खायला द्यावेत. [फोटो3.JPG ] From APPE" alt="" /> खाद्यश्रींना सुचना- गरम गरम आप्प्यांवर "बटर" घालुन खावे. चव अजून छान लागते.

वाचने 9501
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

वाह ! क्या बात है चिंका, आजारपणातला वेळ अगदी सत्कारणी लावत आहात की ;) फोटु तर एकदम झ क्का स !!

In reply to by मदनबाण

फोटु नाही टाकला तर आजकाल पाकृ पचनी पडत नाही मिपाकरांना. म्हणुन फोटु टाकाया लागतात. ते चांगले आले आहेत हा अभीप्राय पोहोचला. धन्यु.

अप्पे मस्त दिसत आहेत. कॉर्न घालून अप्पे कधी केले नव्हते, करुन पाहिन. स्वाती

पहिल्या फोटोत आलंमिरचीच्या शेजारच्या छोट्या वाटीत खाण्याचा सोडा आहे का ? कारण मीठ कोथिंबीरीच्या शेजारी दिसतंय.

In reply to by सूड

पिठ चांगले हलके झाले नाही तर अप्पे कमी फुगतील. तसे झाल्यास थोडा खाण्याचा सोडा घालावा. सुदैवाने इथे घालायला न लागल्यामुळे उल्लेख राहीला.

माय गॉड!! जरा दहा मिनिटं आधी हे वाचलं असतं तर आप्पे नसते का बनवले??? आत्ता आम्ही सगळेजण मधुमक्का खातोय!! क्या बात है!!! पुढच्या वेळी करणार आहे आई आता...सेव्ह करून घेतोय...कॉपीराईट ढिला करा..

In reply to by यशवंतकुलकर्णी

कॉपीराईट ढिला केला आहे. सर्वांनी आनंद ध्यावा ही इच्छा आहे. म्हणुनच फोटु सकट पाकृ टाकली आहे. खाओ और खिलाओ.

मस्त ..मस्त ...अजुन केव्हा करणार आहात ...खायलाच येते.

पटकन उचलून तोंडात टाकावेतसे दिसत आहेत. (हावरा)बेसनलाडू

वेगळे आप्पे. फोटो जबराच!

मस्त, मस्त, मस्त! हल्ली मक्याला स्वीटकॉर्न म्हणण्याची फॅशन आल्ये का?

आप्पे खुपच छान दिसत आहेत. कुठल्याही प्रकारचे आप्पे करत असताना गॅस वर किती वेळ भाजू. [मी या आधी कधीही आप्पे बनविले नाहीयेत आणि खाल्लेही नहियेत. पण फोटो खूपच टेंप्टिंग आहे.] आप्पे पात्र विकत घेण्याच्या विचारात..जासुश..

In reply to by जासुश

आजकाल निर्लेपचे आप्पे पात्र मिळ्ते. ते जास्त चांगले आहे. साधारणतः ५ मिनीटे लागतात. त्या आप्पे पात्राबरोबर एक टोकदार लाकडी दांडी/काडी येते. त्याने एक बाजु झाली की पलटी मारायची. आणि झाले की त्यानेच काढायचे.

पाकृ एकदम आवडली. आणि आप्पेपात्रासहित दाखवलीत म्हणुन विशेष आभार. मी आप्प्यांच्या पाक्रू खुप वाचल्यात पण त्या आप्पेपात्रात कशा करायच्या, 'तेल सोडुन उलटवुन घ्या' म्हणजे नक्कीच उलटतील की पात्रालाच चिकटुन बसतील, मग अर्धे आप्पे तयार आणि अर्धे पात्रालाच चिकटलेले व्.व. सगळे सिन कल्पनेत आणुन कधी आप्पेपात्र आणायचा विचारही केला नाही. वरचा फोटो पाहुन जरा धीर आला. आता एक लहान आप्पेपात्र आणुन करुन पाहिन.

In reply to by काजुकतली

निर्लेपचे आप्पेपात्र बिडाच्या आप्पेपात्रापेक्षा जास्त चांगले आहे. बिडाच्या पात्राला चिकटण्याचे प्रमाण जास्त असते. वेळ आणि तेलसुध्दा जास्त लागते.

मस्त . मी नेहमी फक्त डाळ , तांदुळ यांचे अप्पे करते . आता कॉर्न वापरुन देखील करेल.

प्रतिक्रीया देणा-या सर्वांचे आभार. धन्यु.