हे कसले औदार्य?
आज रविवार!!!
म.टा. वाचायला घेतला, त्यामध्ये भारतकुमार राऊत यांचा लेख वाचनात आला.....
हे कसले औदार्य?
उत्तर भारतात जसे पावसाचे तांडव सुरू झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे, त्याहून अधिक भयानक परिस्थिती पाकिस्तानात आहे. ज्या बातम्या हातात येत आहेत, त्यावरून दिसते की, दोन तृतियांश पाकिस्तानला पुराने वेढले आहे. कदाचित, एव्हाना परिस्थिती काबूत आली असेल, पण पुरानंतरची रोगराई, निर्वासितांचे प्रश्न आणि उद्योगांचे पुनर्वसन या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पाकिस्तानी सरकारला अनेक महिने झंुजावे लागेल.
पाकिस्तानी पुराबद्दल चर्चा करण्याचे कारण, पुराच्या संकटाशी शेजारी राष्ट्र लढाई देत असताना भारतासारख्या तुलनेने मोठ्या राष्ट्राने काय भूमिका घ्यावी, याविषयी सध्या दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय विचारवंतांमध्ये सुरू झालेली चर्चा. भारत सरकारने तातडीची मदत म्हणून सुमारे पन्नास लाख डॉलर्सचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. यापुढेही मोठी मदत देण्याची तयारी भारत सरकारने दाखविल्याचे समजते. ही मदत द्यावी का, या विषयावर भारतात आणि ती स्वीकारावी का, याची जाहीर चर्चा पाकिस्तानात सुरू आहे.
भारताने मदत द्यावी का, या विषयाला मानवतावादी, राजकीय आणि आत्मसन्मान असे तीन स्पष्ट कंगोरे आहेत. त्यांची चर्चा होणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही एकाच बाजूने विचार झाला, तर आंतरराष्ट्रीय नीती म्हणून आपण खड्ड्यातच जाण्याची भीती आहे.
मानवतावादी विचार करायचा, तर ही मदत देणे गरजेचे ठरते. आपण शेजारी निवडू शकत नाही आणि त्यामुळेच शेजाऱ्यावर येणारी नैसगिर्क संकटे 'परदु:ख शीतलम्' अशा तटस्थ भावनेने पाहू शकत नाही. जी वेळ आज शेजाऱ्यावर आली, तीच उद्या आपल्यावर येऊ शकते, हा विचार मनात ठेवायलाच हवा. दुसरा विचार राजकारणाचा. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणूनही पाकिस्तानच्या मदतीला 'धावून' गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय समूहात, विशेषत: पाश्चिमात्य देशांमध्ये भारताची प्रतिमा उंचावू शकेल. तिसरा विचार आत्मसन्मानाचा. पाकिस्तान शेजारी असला, तरी ते 'शत्रुराष्ट्र' आहे. अशा शत्रूला मदत करून त्याला का वाचवायचे, हा प्रश्न उरतोच. त्याचा विचारही भावनेच्या आहारी न जाता करायला हवा.
कर्णाच्या रथाचे चाक चिखलात रुतले, तेव्हा समोरच्या अर्जुनाला शरसंधान करण्याचा सल्ला साक्षात् भगवंत श्रीकृष्णांनी दिला. याचे कारण रथाचे चाक बाहेर काढल्यानंतर कर्ण पुन्हा अर्जुनाच्या जीवावर उठणार, हे श्रीकृष्णांना ठाऊक होते. इथे अडचणीच्या काळात पाकिस्तानावर हल्ला करण्याचा इरादा कोणी व्यक्त करणार नाही, पण ज्या देशाने भारतावर वारंवार युद्धे लादली, भारतात अतिरेकी घुसवले, बाँबस्फोट करून हजारो निरपराधांचे बळी घेतले, त्या पाकिस्तानला मदत करण्यात कोणता आलाय 'धर्म'? हा विचार काहींच्या मनात आला, तर त्यांचे काय चुकले?
भारताकडून मदत स्वीकारू नये, असे मानणारा एक वर्ग पाकिस्तानात आहे. त्या गटाकडून तसा प्रचार केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर अमेरिका व युरोपीय देशांतही होत आहे. त्यांच्या प्रचाराचा रोख असा की, भारतातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्यामुळे या नुकसानाला भारतच जबाबदार आहे. त्यामुळे भारताने पैसे दिलेच तर ते 'नुकसानभरपाई' म्हणून स्वीकारावे. एकतर भारतातील नद्यांमुळे हे पूर आले, हे सपशेल झूट. तसे असते, तर तसेच पूर आधी पंजाब, काश्मीर, हिमाचल या राज्यांत यायला हवे होते. शिवाय, वायव्य सरहद्द प्रांतात जे पूर आले त्यांचा आणि भारतातील नद्यांचा काय संबंध? पुरापासून संरक्षण करायचे, तर ठराविक अंतरांवर बंधारे, धरणे बांधून प्रवाहाला नियंत्रित करावे लागते. पाकिस्तानने असे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे अतिवृष्टी होताच नद्यांना पूर आले. त्याला भारत काय करणार? पाकिस्तानातील जो गट असा भारतविरोधी प्रचार करत आहे, त्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न झरदारी-गिलानी मंडळी करत नाहीत. अशा परिस्थितीत भारताने का मदत द्यावी? दान करताना ते 'सत्पात्री' असेल, याची खात्री करावी, ही भारतीय अध्यात्माची शिकवण आहे. ती का विसरावी?
मदत द्यायचीच, तर ती कोणत्या स्वरुपात, हा पुढचा प्रश्न. अशी मदत रोख, औषधे, अन्नधान्य अशी वा मानवीशक्तीच्या, म्हणजे डॉक्टर्स, इंजिनीअर्स, स्वयंसेवी कार्यकतेर् अशा तऱ्हेने देता येते. पण त्यातही अडचणी आहेतच. पाकिस्तानात रोख रकमा पाठवल्या, तर त्या पूरग्रस्तांपर्यंत न पोहोचता भारतविरोधी कारवायांसाठी थेट प्रशिक्षण छावण्यांच्या विकासासाठी जाणार नाहीत, याची काय खात्री? मागे अमेरिकेकडून तालिबानींविरूद्ध वापरण्यासाठी मिळालेली शस्त्रे कारगिलजवळच्या छावण्यांत पोहोचली होती. जर अन्नधान्ये व औषधे पाठवली, तर त्यांचे वाटप दूरवरच्या पूरग्रस्तांना करण्याची कोणतीही यंत्रणा पाकिस्तानकडे नाही. अशी मदत रेडक्रॉससारख्या संस्थांमार्फत करायची, तर तिथे काम करण्यास कोणी आंतरराष्ट्रीय संस्था तयार नाहीत. कार्यकतेर् पाठवायचे, तर मदतीला येऊ पाहणाऱ्या इस्त्रायली आणि भारतीय नागरिकांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी घेतल्याच्या बातम्या आहेत. अशावेळी काय करायचे?
केवळ आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये टाळ्या मिळवण्यासाठी आत्मसन्मानाला आणि मुख्य म्हणजे देशहिताला तिलांजली देऊन आमची मदत स्वीकारा, अशी याचना करत राहायचे?
भारतात पूर, भूकंप, वादळे, त्सुनामी अशा आपत्ती आल्या. त्या भारत सरकार व जनतेने स्वबळावर झेलल्या. अनेक राष्ट्रांनी मदत केलीच. या मदतीत पाकिस्तानचा वाटा किती? ज्यांचे राष्ट्रीयत्व पाकिस्तानीच आहे, हे सिद्ध झाले, अशा नऊ अतिरेक्यांचा भारतीय सुरक्षा दलांनी २६/११च्या हल्ल्यात खात्मा केला. या आपल्याच नागरिकांचे मृतदेह स्वीकारण्यासही पाकिस्तानने अखेरपर्यंत नकार दिला. करोडोंचा खर्च करून आणि प्रत्येकी ९० लाख रुपयांच्या एसी शवपेट्या वापरून ही प्रेते भारताला सव्वा वषेर् 'जतन' करावी लागली. हा इतिहास दोनच वर्षांतच विसरायचा? एका बाजूला पैशाअभावी गोदामे बांधली जात नसल्याने हजारो टन धान्य भारतात सडतेे व गरीबांना दोन वेळच्या अन्नाला मोताद व्हावे लागते आणि दुसरीकडे शत्रूचे घर सावरण्यासाठी आपण घराची कौले काढून देत आहोत. हे औदार्य परवडणारे आहे का?
एकदा विचार कराच.
प्रतिक्रिया
सरळ सरळ कॉपी !!
दुसरीकडे शत्रूचे घर
लेखाच्या सुरुवातीलाच त्यांनी
मदत करणे चूक आहे ना, मग ते
विषयांची कमतरता?