Skip to main content

पैसे गुंतवायचे आहेत किमान १ लाख कमीत कमी ३ वर्षांसाठी. जास्तीत जास्त परतावा कुठे मिळेल?

पैसे गुंतवायचे आहेत किमान १ लाख कमीत कमी ३ वर्षांसाठी. जास्तीत जास्त परतावा कुठे मिळेल?

लेखक प्रचेतस
Published on रवीवार, 29/08/2010

याद्या 866
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by सुधीर१३७

उगाचच "अस्सल सोने" ला मत टाकलय कारण कौल पुढे सरकत नव्हता. पण मला एन एस सी आणि के व्ही पी बरी वाटायची. अजून आहेत ना ती?

In reply to by शुचि

मराठी उद्योगी माणसास उद्योगधंदे करण्यासाठी भांडवल म्हणुन द्या ;-) अवांतर = समाजसेवा किंवा सामाजीक जाणिवा तिव्र असल्यास आजारी (कॅन्सर / ऑपरेशन ई.) माणसांना मदत करा. (कृ.ह.घ्या)

In reply to by सुहास..

ऱोटी कपडा या मकान ...तिन्हीपैंकी कुठेही गुंतव ...मरण नाही बजेट फक्त एक लाखाचे आहे, तेव्हा मकान कटाप! कपडा. भिवंडीत "कच्चे कापड" स्वस्तात मिळते. एकदा मी स्वतः विचार केला होता पण अंगभूत मराठमोळेपण्याने मोडता घातला! तुम्ही प्रयत्न करू शकता. शुभेच्छा! रोटी? नक्की कळले नाही!

जास्तीत जास्त परतावा कुठे मिळेल याचे उत्तर बहुधा अस्सल सोने हेच असेल. पण प्रश्न मिळू शकेल असा असेल तर शेअरबाजार हे उत्तर आहे. किंवा तुम्ही स्वतः काही व्यवसाय केला तर शेअरबाजारापेक्षाही अधिक परतावा मिळू शकेल.

In reply to by शाहरुख

१९९५-९९ काळ सोडता आजतागायत इतिहास नाही. रिअल इस्टेट हापण एक उपाय आहे पण तेवढे बजेट दिसत नाहीये.

एखाद्या कुख्यात क्लबात जाउन तीनपत्ती खेळण्याचा पर्याय वर दिलल्या सर्व पर्यायांपेक्षा अधिक फलदायी आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे. स्वानुभवाचा कुठलाही आधार नसलेले मत. एक परचुटन जॉकी कम गम्बलर कम खिलाडी एखाद्या प्लॉट,जागेच्या खरेदीचा पर्याय वर दिलल्या सर्व पर्यायांपेक्षा अधिक फलदायी आहे. असेही माझे वैयक्तिक मत आहे. स्वानुभवाचा भक्कम आधार असलेले मत. एक परचुटन रीयॅल्टर कम बिल्डर कम डेव्हलपर

अस्सल सोने ला मत दिले आहे. (अर्थात आजकाल ढीगभर पैसे देवून सोन्याची उगीच एवढीशी वळी येतात. ती घेतल्यावर मला मनातून इतकं पोकळ वगैरे वाटायला लागतं.)

तुम्हाला प्रामाणिक मत हवे आहे असे गृहीत धरून मत देतो. (येथील काही प्रतिसाद हे टिंगल करणारे दिसले). माझ्यामते मुच्युअल फंड हा जास्त चांगला पर्याय आहे. ELSS मध्ये टाकले तर उत्पन्न करात पण सूट मिळेल. मुच्युअल फंडामध्ये प्रत्यक्ष शेअर बाजारापेक्षा कमी धोका असतो (इति मन्ये)