सात धारी भेंडे म्हणजे ह्या भेंड्यांना सात किंवा आठ किंवा नऊ धारा असतात. (गोल केलेल्या चकत्यांच्या फोटोत मोजु शकता सत्यतेसाठी) हे फक्त श्रावणात येतात. हे भेंडे आकाराने साधारण अर्धा फुट पेक्षा थोडे जास्त लांब असतात (आता पुढच्यावेळी फुटपट्टि घेउन माप मोजेन, कारण मिपाकरांना जरा सविस्तरच माहीती लागते ना, नाहीतर त्यावर भले मोठे मोठे, गहन प्रश्न पडतात).
दिसायला उंचीला मोठे आणि रुंदीला जाडेच असतात. पण जाडे दिसत असले तरी कोवळेच असतात. ह्याच्या खात्रीसाठी भाजीवालीच्या टोपलीतुन मोठा दिसणारा एक भेंडा उचलायचा आनी त्याच्या वरचे टोक कटकन मोडायचे. टोक भेंड्यापासुन वेगळे झाले की समजायचे भेंडा कोवळा आहे आणि जर नुसती वाकली तर समजायचे जुन आहे. कधी कधी भाजीवाली हा प्रयोग स्वतःच करुन दाखवते आणि एवढे करुन नाही घेतले की मोडलेल्या भेंड्याचा राग आपल्यावर काढते. असो, तर हे भेंडे चविला एकदम बेश्ट असतात.
किंमत म्हणाल तर नॉनव्हेज पेक्षा जास्त एका जुडीत तिन भेंडे असतात व ही जुडी रु. १२/- ला मिळते. एक पैसाही कमी नाही. फक्त जर जास्त प्रमाणात घेतलेत तर कमी होतात थोड्या प्रमाणात. भाव कमी न होण्याचे गुढ कारण म्हणजे आमच्याइथे फक्त एकाच गावातुन हे भेंडे लागवड करुन विकायला येतात. ह्या गावातील गावकरी शेजारच्या गावालाही ह्या भेंड्यांचे बी देत नाहीत त्यांचा उद्योग मंदाउ नये म्हणुन.
परतवलेली भेंडी :
लागणारे साहित्य:
सातधारी भेंडे १ ते २ जुड्या.
लसुण ४-५ पाकळ्या
मिरच्या २-३
कढीपत्ता १ फांदी
मिठ चविनुसार
चिमुटभर साखर
हिंग
हळद
ओल खोबर २ ते ३ चमचे
तेल
पाककृती :
प्रथम भेंडे स्वच्छ धुवुन स्वच्छा फडक्याने पुसुन घ्या. मग परतवलेले भेंडे करण्यासाठी ह्या भेंड्यांचे अंदाजे दिड इंच किंवा तुमच्या आवडीनुसार फोडी करुन त्याला मधेही चिरा. मधुन चिरण्याचे कारण ह्या भेंड्यांची जाडी आहे. साध्या भेंड्यांना फक्त मध्ये खाच पाडावी लागते.
चकत्यांची भाजी करताना अशी गोल चिरलेली भेंडी. आली ना शाळेच्या चित्रकलेची आठवण ? शाळेत भेंडा कापुन त्याला रंग लावुन त्याचे ठसे वहीवर उमटवायचा माझा आवडता चित्रकलेचा प्रकार होता.
आता लसुण ठेचुन घ्या, कढीपत्ता तयार ठेवा, हिरव्या मिरच्या कापुन घ्या. माझ्याकडे हिरव्या मिरच्या राहुन राहुन वापरत नाही म्हणून रागाने लाल झालेल्याही मिरच्या होत्या त्यांचाही नंबर लावला.
आता गॅसवर कढई किंवा तुम्ही ज्यात ही भाजी करणार आहात ते भांडे ठेवा. (नॉनस्टीक पॅन मध्ये चांगली होते ही भाजी). भांडे जरा गरम होउ द्या मग त्यावर तेल टाकुन अशी मस्त लसूण, मिरची, कढीपत्ता टाकुन दणदणीत फोडणी देउन त्यावर हिंग, हळद टाका (फोडणी दणदणीत द्यायची असली तरी ह्यात फोडणीचे साहित्य हळूच टाका नाहीतर तेल उडून आपल्यालाच दणका बसायचा.)
आता भेंडी घालून, मिठ, थोडी साखर, लिंबूरस टाकुन मस्त सर सर आवाज करत परता. आवाज भांड आणि कालथ्याचा काढा. तोंडाचा नको. नॉनस्टिक पॅन असेल तर हळूच आवाज काढा. नाहीतर नॉनस्टीक पॅन आपल खर रुप दाखवायला सुरवात करेल.
भेंडे शिजले की त्यावर ओल्या खोबर्याची बरसात करा. ही बघा मस्त परतलेली भेंडी तय्यार. लसुण आणी भेंडीच मस्त कॉम्बीनेशचा वास येतो आणि खात सुटतात सगळे.

वाचने
8540
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
जागु ताई, छानच गं! करुन
मस्त मस्त ! आज घरुन हाच डबा
आज घरुन हाच डबा आणलेला होता
In reply to मस्त मस्त ! आज घरुन हाच डबा by परिकथेतील राजकुमार
मस्त भाजी आहे.
भेंडीला
माझ्याकडे हिरव्या मिरच्या
भाजिचा कलर
माझी आई हिरव्या भाज्यांमध्ये
In reply to भाजिचा कलर by अजबराव
अजबराव, अनाम भेंडी जास्त
In reply to माझी आई हिरव्या भाज्यांमध्ये by अनाम
जागुतै, आजकाल फर्मास पाकृ
खुप खुप धन्यवाद रेवती.
In reply to जागुतै, आजकाल फर्मास पाकृ by रेवती
जरूर करून बघणार.
हेच म्हणते..
In reply to जरूर करून बघणार. by चिंतामणी
+२
In reply to हेच म्हणते.. by मस्त कलंदर
+३
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
चिंतामणी, मस्तकलंदर, आदिती
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं जागुतै, कधी येऊ जेवायला?
असुर कधी येणार आणि तुम्ही
In reply to बरं जागुतै, कधी येऊ जेवायला? by असुर
म्हणजे असं आहे बघा जागुतै
In reply to असुर कधी येणार आणि तुम्ही by जागु
हो नक्कीच.
In reply to म्हणजे असं आहे बघा जागुतै by असुर
या मलेशियन भेंड्या! काय
छान दिसतेय भाजी...मला भेंडीची
अहाहा ! जेवढी चटकदार पाकृ,
जागु ताईच्या धाग्यातुन
मस्त..
अपर्णा, शिल्पा, स्मिता,
:)
सात धारी भेंडे ही नविनच
मस्त गं जागू... मला आठवतंय की
घेतलेले चिमटे आणि भेंडे
ऋषीकेश, पक्या, दिपाली, अनामिक