Skip to main content

तुम्हाला इतिहास महत्वाचा वाटतो का ?

लेखक शाहरुख यांनी शुक्रवार, 27/08/2010 00:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 961
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

'अन्यला' दिलेले पहिले मत माझे आहे.;) इतिहासात काय झाले यावरून जोपर्यंत दंगे वर्तमानात होत नाहीत, इतिहासातल्या चुकांवरून शिकणे होते तोपर्यंतच इतिहास महत्वाचा!

In reply to by रेवती

अगदी असेच. Those who forget history are condemned to repeat the mistakes of the past. What we learn from history is that we don't learn anything from history अशी कुणीतरी म्हटलेली वाक्ये अविनाश धर्माधिकारींच्या भाषणात ऐकलेली आहेत.भारताच्या इतिहासात याची कित्येक उदाहरणे आहेत आणि त्याचा वाईट परिणामही भारताने पुरेपूर भोगलेला आहे. तसे परत होऊ नये म्हणून इतिहास शिकणे गरजेचे आहेच.पण त्यावरून सध्याच्या काळात भांडणे नकोत हे पण तितकेच खरे क्लिंटन

In reply to by क्लिंटन

पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या झालेल्या चुका घोकल्यामुळे माझ्या व्यक्तिगत जीवनात नक्की काय फरक पडणार आहे? ज्यांनी तो करायला हवा ते (लश्करी अधिकारी) करीत असतीलच. पण त्यासाठी यच्चयावत शालेय विद्यार्थ्यांनी तो का करावा?

In reply to by सुनील

पानिपतच्या पराभवाच्या कारणांचा अभ्यास लष्करी अधिकारी करत असले तरी इतिहास म्हणजे केवळ लढाया आणि मारामाऱ्या असे थोडीच आहे.भारताचे इतिहासकाळापासून भाऊबंदकीमुळे किती नुकसान झाले याविषयी वेगळे काही बोलायला नकोच. आजही राज ठाकरे, संभाजी ब्रिगेड आणि इतर अनेक मंडळी त्यांच्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत.जर शाळेत इतिहासाचे धडे मिळाले तर त्यातून या फूट पाडायच्या प्रयत्नांमुळे आपले पुढे नुकसान होणार आहे एवढे तरी कळले तरी या शक्तींचा नक्कीच पराभव होईल. अर्थात शाळेत ज्या पध्दतीने इतिहास शिकवतात त्यात कोणत्याही विश्लेषणापेक्षा सनावळ्या आणि घोकंपट्टीच जास्त असते आणि त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाविषयी आवड कधीच निर्माण होणार नाही. पण तो एकूणच आपल्या शिक्षणपध्दतीचा दोष झाला. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

आजही राज ठाकरे, संभाजी ब्रिगेड आणि इतर अनेक मंडळी त्यांच्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत तुम्ही दादुच्या सेनेतले वाटतं....

In reply to by प्रशु

इतिहास अभ्यासुन काय फायदा? त्याच त्याच चुका आपण करीत आहोत...त्याचा सुधारण्या साठी झाला तर फायदा .....राजकारणी व राजकारण नामक अक्राळ विक्राळ भुताने सारे समाज जिवन व निर्णय क्षमता व्यापली आहे...

In reply to by अविनाशकुलकर्णी

त्याच त्याच चुका आपण करीत आहोत
म्हणजे यातून दोन निष्कर्ष निघतात. एक तर आपण इतिहास नीट अभ्यासलेलाच नाही किंवा दुसरे म्हणजे अभ्यासलेला असला तरी त्याप्रमाणे सुधारणा करण्यासाठी काहीही पावले उचलली नाहीत. मग इतिहास शिकून काय फायदा असे कसे म्हणता येईल? म्हणजे आपल्याला वीजेचे नियम माहित नसतील-- उदाहरणार्थ: उघड्या वीजेच्या तारांना स्पर्श करू नये हे एक तर आपल्याला माहितीच नसेल किंवा माहित असेल तरी आपण तसा स्पर्श करणार असू तर त्याचा शॉक आपल्याला लागणार आहेच.पण म्हणून शॉक लागला याचा अर्थ वीजेचे नियम शिकूच नये असा थोडीच होतो? क्लिंटन

In reply to by क्लिंटन

माफ करा माझं या विषयातील ज्ञान कमी आहे; पण विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र, भाषा इ. विषयांचा practical life मध्ये निदान थोडा का होईना उपयोग होतो. उदा. गणित शिकल्यावर आपल्याला आकडेमोड करता येते. पण इतिहास आपल्याला कुठे उपयोगात पडतो?:puzzled:

In reply to by क्लिंटन

इतिहासातून शिकायच्या ज्या गोष्टींबद्दल तुम्ही आणि रेवती ताई बोलत आहात (बाकी तुमचं दोघांचं मत तसे अन्यला नसुन 'इतिहास महत्वाचा आहे' ला आहे असेच मला वाटतंय) त्या अशाही शिकता येण्यासारख्या नाहीत काय ? माझी 'व्हिजन' मर्यादित आहे हे मला मान्य आहे पण मी वैयक्तिकरित्या इतिहासातून तसे काहीही शिकलेलो नाहीय...उलट वर्षानुवर्षे चालणारे शिवाजी-दादोजी आणि असे इतर हजारो वाद म्हणजे मला लोकांच्या इतिहासाला अवास्तव (आणि भावनिक) मह्त्व देण्याचा परिणाम वाटतो. इतर महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्यासाठी हे वाद राजकारण्यांनी चिघळत ठेवलेत हे जर खरे असेल तर आपणच इतिहासाला फारसे महत्व न देणे हाच यावर उपाय नाही का ? माझे मत "छ्या.." ला आहे.

In reply to by शाहरुख

अशा गोष्टी ’अशाही’ शिकता आल्या तर उत्तमच. पण इतिहास शिकून आपल्याला अशा गोष्टींचे एक उदाहरण दिसते. आणि कोणतीही गोष्ट उदाहरणातून जास्त चांगली आणि लवकर समजते निदान तशी अपेक्षा तरी आहे. म्हणजेच नुसते ’भाऊबंदकीमुळे नुकसान होते’ असे हवेतले वाक्य म्हणण्यापेक्षा भाऊबंदकीमुळे संभाजीराजे पकडले गेले आणि मराठी दौलत फार मोठ्या संकटात सापडली हे उदाहरण दिले तर त्याचा शिकायला उपयोग जास्त होईल असे वाटते. क्लिंटन

नकी कोणता ? खरा की जेत्यांनी लिहिलेला ? बखरींमधे, ऐतिहासिक कागदपत्रांमधे लिहिलेला की सध्या द्वेषाच्या राजकारणातून नवीन लिहिला जात असलेला ?

In reply to by Pain

असा विषय ज्यात गुण मिळवण्यासाठी मेलेल्या लोकांचे पराक्रम पाठ करता करता जिवंत लोकांवर मरायची पाळी येते. :wink: पण एरवी इतिहास खासकरून शिवाजी महाराजांचा वाचण्यासारखा आहे.

इतिहास म्हणजे नक्की काय? (कौलातील प्रतिसाद अद्याप "शेवटचा वर" ह्या पद्धतीनेच येताहेत! संबंधितांनी लक्ष द्यावे!)

In reply to by सुनील

तशी इतिहासाची सर्वसमावेशक ( :-) ) व्याख्या देण्याइतकी माझी समज नाही. पेन यांना जे सांगितले तेच... जे काही शेकडो वर्षांपूर्वी घडून गेले आहे ते माहित होणे तुम्हाला आवश्यक वाटते का ?

कारण त्यात सर्व माणसे मेलेली असतात. ;) अपुर्‍या इच्छा राहीलेली माणसं मेली तर त्यांचा पिश्शाच्चयोनीत जन्म होऊन ती झाडांवर राहतात असे आजच वाचनात आले. असतील झाडे तिथे जमतील पिश्शाच्चे. ऐतिहासिक पिशाच्चांना वाचवण्यासाठी झाडांची गरज आहे यावरून इतिहास हा पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहे याचीही मला जाणीव झाली.

In reply to by प्रियाली

एका हॉटेलमधली काही जण म्हणे जीवंतपणीच झाडावर जाऊन बसतात... पॉपकॉर्न खातात... जीवंत पिश्शाच्चेच असावेत ते सगळे ;)

इतिहास नावाचा पिक्चर (चोता दोनसारखाच) तद्दन फालतु अन् टुकार होता!