छोट्या जाहिराती.
डिस्क्लेमर : हा धागा काढण्यामागचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवाव्यात असा नाही. त्यातून , कुणाला तसे (अकारण) वाटल्यास त्या सर्वांची आधीच घाऊक माफी मागत आहे.
एका वृत्तपत्रात अलिकडे वाचलेल्या छोट्या जाहिराती :
१. पाहिजे : पूर्वी सारखी टिकणारी मेंदी. रंग दोन दिवसांत जाऊन विचित्र दिसायला नको. पक्का हवा.
२. पाहिजे : पडल्यापडल्या झोप लागेल असा पलंग. झोप येईल अशी खोली. खोलीत जाऊन झोपावेसे वाटेल असे घर. घरात राहावेसे वाटेल अशी जीवनशैली. शैली परवडेल असे जीवन.
३. पाहिजे : श्री. पांडुरंग पंढरपूरकर यांच्याशी एकदा तरी भेट घडवून आणून देईल असा एजंट. (बळवंतबुवा नको. या प्रकारचा एजंट या संदर्भात उपयोगी नाही.)
४. गतकाळाच्या आठवणींच्या दु:खापासून मुक्ती मिळवण्याकरता अक्सीर इलाज येथे मिळेल. आजच मागवा : गावच्या झोळीच्या, खांबाच्या, मंदिराच्या, परिसराच्या , माणसांच्या, काळाच्या हुबेहूब रेप्लिकाज.
५. सेल ! सेल !! आजच चौकशी करा : कमीत कमी दक्षिणेत जास्तीत जास्त पुण्य मिळवून देणारे भटजी/पुरोहित/गुरुजी/आध्यात्मिक गुरु. मेगा सेल. मिलेनियम डील.
६. त्वरित हवेत : मराठी सायटींवर सर्वाधिक प्रतिसाद मिळवून देतील असे धाग्याचे विषय. मात्र ते कुठल्याही प्रकारे वादग्रस्त असता कामा नयेत. कुणाच्याही भावना दुखू नयेत. चर्चा व्हावी पण शक्यतो मतभेद नकोत.
७. आजच मागवा : सर्व हिंदू सणांचे माहात्म्य सदासर्वकाळ सर्व पिढ्यांना समजेल अशी समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था.
प्रतिक्रिया
'त्या' लिस्टकडे टाकलेले एक
छे!!! पार अपेक्षाभंग मुसु चे
हेच म्हणतो. त्याशिवाय जेष्ठ
क्रमांक ६ साठी आम्ही प्रयत्न
छ्या! तेवढ्यात दोन प्रतिसाद
देशपांडेअण्णा तसलेच ते..
आणि तू?
मी काय? मी तर आत्ता टाकलाय
(विषय दिलेला नाही)
नंबर ३ ...
=)) =)) =)) अरे शिंच्या
गल्लत होते आहे ...
स्वतःची ... अशी प्रतिमा
वास्तुपाठ काय असतो तो?
वा! रोचक प्रतिक्रिया! ;)
_/\_
प्रतिमाबदल
हा हा हा!
मोठे
छोट्या जाहिरातीचा प्रभाव
रोचक
:-)
:)