काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???
आपल्या संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण - भाऊ-बहिणीचा
स्नेह,प्रेम व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.
कृष्णाच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. द्रौपदीने साडी किनार फाडून बांधले होते. तेव्हापासून कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला व आजीवन तिचे रक्षण केले.
भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत.चित्तौढगडची राणीने बहादुरशाहपासून रक्षा करण्यासाठी हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. व हुमायूने राणीचे रक्षण केले !
"रक्षाबंधन"
या सणात काळानुरूप जरासा बदल झालेला आहे. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होते. लाडकी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारतो.
आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.
बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकते. सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा जानला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.
भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'
जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे म्हटले आहे.
बहिण भाऊरायास भक्तीभावाने ओवाळते व मनगटावर राखी बांधते. भाऊ तीला भेट देऊन संकटसमयी धावून येण्याचे वचन देतो. राखीपौर्णिमा आली की, बहिणीप्रती आपले प्रेम, स्नेह, आदर व्यक्त करण्यासाठी नेमकी कोणती भेट तिला देऊ ? हा माझ्या मते माझ्या सारख्याच बहुतेक भावांचा यक्ष प्रश्न ? तुम्हांला काय वाटते ? काय द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???
प्रतिक्रिया
बहिणीला विचारून बघा तिला काय
छान ...... सुरेख !! टोमना !
यत्र नार्यस्तु पू.......
काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ?
संजयराव....
अप्रतिम !!