मिपावर आलेल्या काही लेखांमध्ये धार्मिक संस्थाने कशी श्रीमंत आहेत याचा उल्लेख येतात. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी खरोखरच किती दक्षिणा आपण एक समाज म्हणून देत असतो याचा एक मिपासदस्यांपुरता अंदाज घ्यायचा आहे.
तुम्ही जर परदेशात असलात तरी भारतातील मागच्या वारीतील अशा भेटींमध्ये किती पैसे दक्षिणा म्हणून दिले असतील ते साधारण आठवत असले, तर त्याचा अंदाज दिला तरी चालेल.
कोणाला यावरून आपण कुठच्या देवस्थानाला/मठ/आध्यात्मिक गुरूंना देणगी/दान/दक्षिणा दिली, हे लिहायची इच्छा असली तर लिहीले तरी चालेल, पण आग्रह नाही. तसेच दान देण्यामागे काय भावना होती तेही लिहायचे असले तर लिहावे.
हिंदूंखेरीज अन्यधर्मिय मिपासदस्यांनीदेखील या कौलात मते दिली तरी चालतील.
बाकी कौलाचा उद्देश वर दिल्याप्रमाणे अगदी मर्यादित आहे. कौलात कुठच्याही प्रकारे भावना भडकवणारे लिहू नये ही विनंती. दुसर्याचे धर्म, श्रद्धास्थाने, यांवर टिपणी करू नये ही विनंती.
आपण समाजाच काही देण लागतो या उद्देशाने सामाजिक संस्थांना वस्तुरुप अथवा देणगी देणारे या प्रकारात मोडत नाहीत का? अशा प्रकारे देणगी/ मदत देणारे आम्ही हे धार्मिक भुमिकेतुनच करतो असे म्हणणारे असतील तर त्यांना कुठल्या प्रकारात टाकणार?
धरता येऊ शकतील, पण ते मुद्दाम धरलेले नाहीत. सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा वर्ग आहेत. जातींची मंडळे, शि़क्षणसंस्था, वृद्धाश्रम इ. इ. ह्या संस्थांना दान देण्याचे हेतू प्रासंगिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक असले तरी वेगळे असतात. त्यांची तुलना वगैरे विषयांत जायचेच नव्हते.
या कौलातून धार्मिक भावनांचे मोजमाप करायचे नाही आहे. तर निव्वळ पूजाअर्चा, आणि आध्यात्मिक गुरूंना वर्षभरात किती पैसे मिळत असू शकतील, याचा अंदाज घ्यायचा आहे. नक्की किती मिपासदस्य आपल्या वर्षभराच्या कमाईच्या किती पैसे वर्षभरात अशा ठिकाणी देतात असा अंदाजदेखील यावरून घेता येऊ शकतो.
इथे मत दिलेल्या बहुसंख्य सदस्यांनी (१२) शून्य असे उत्तर दिले आहे. बाकीच्यांनी (१०) आतापर्यंत सगळ्यात जास्तीत जास्त दिले असे समजले तरी दोघांनी ४०,००० रु दिले आहेत आणि बाकी आठजणांनी ५,९०० रु. दिले आहेत. (१००*४+५००+१०००+२०००+२०००). वरील रकमेमधली जी जास्त रक्कम आहे (२०,००० चा गट) हा खर्च बहुदा प्रासंगिक असतो/असावा असा अंदाज आहे. म्हणजे लग्न/मुंज अशा समारंभांसाठीच्या निमित्ताने केलेल्या खर्चांचा. अनेकदा असे प्रासंगिक खर्च चॅरिटीकडेही वळवले जातात - पण चॅरिटीकडे वळवलेले पैसे मुद्दाम वर उल्लेख केल्याप्रमाणे वगळले आहेत. प्रासंगिक खर्चांना वगळता वर आलेली ५,९०० रु. ही एकूण रक्कम त्यांच्या पगाराच्या अगदी क्षुल्लक असावी असाही अंदाज आहे. (आम्ही गेल्या वर्षात देवळात गेलो तेव्हा देवळाला दहाएक डॉलर दिले असावे.)
या कौलातील सहभाग मिपासदस्यांपुरताच मर्यादित राहणार आहे, तेव्हा फार ठोस निष्कर्ष काढता येतील असे वाटत नाही. तरी काही थोडे विचार मांडता येऊ शकतील जसे -
देवळाला/गुरूंना काही अगदी थोड्या लोकांकडून खूप अधिक आणि बर्याचशा लोकांकडून अगदी लहान अशी रक्कम मिळत असावी असे वाटते. अजून एक लक्षात आले ते असे की या डेट्यात आध्यात्मिक गुरूंना दिलेल्या रकमेचा उल्लेख विशेष आला नाही. याचा अर्थ कौलात भाग घेतलेले बहुसंख्य मिपा सदस्य गुरूंना दक्षिणा देत नसावेत, किंवा त्यांना आध्यात्मिक गुरू नसावेत, असा घेता येऊ शकतो. अर्थात ज्यांना असे गुरू आहेत त्यांनी या कौलात भाग घेतल्यास अधिक निष्कर्ष मिळतील, हे नक्कीच. पण सध्यातरी मिपावर असे आध्यात्मिक गुरू असलेले सदस्य संख्येने कमी असावेत का काय अशी शंका येत आहे.
जेवढे खर्च केले आहेत त्यात प्रचंड समाधान लाभलेले आहे. धर्मकार्य आणि समाजकार्य या दोन्हीही गोष्टीत केलेल्या खर्चाचा उल्लेख करणे ही मी राहतो त्या लोकात हलकी गोष्ट मानली जाते आणि मी स्वतःही तसेच समजतो त्यामुळे कौलाला मत देउ शकत नाही.
आनंदयात्रींच्या वरील म्हणण्याला एकच म्हणता येईल की कौलात भाग घ्यायची सक्ती कोणावरच नाही. ज्यांनी असा भाग घेतला आहे ते ज्या लोकांत राहतात ते लोक याला हलके समजत नसावेत. उलट त्यांनीही हे पैसे स्वतःच्या किंवा सुहॄदांच्या समाधानासाठीच दिले असावेत असा माझा अंदाज आहे.
त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या दान करण्याच्या प्रेरणेमध्ये विशेष अंतर नसावे.
आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी पैसे न देता समाजसेवी काम करणार्या संस्थांना देणग्या देतो, उदा. विद्यार्थी सहाय्यक समिती, ती लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारी मोठी संस्था ( एन. . . . काहीतरी) वगैरे.
र १ ते १००.. नक्की आकडा माहित नाहि. सवयीने दक्षिणापेटीत टाकलेले अथवा काहि सत्यनारायणाच्या पुजेला ठेवलेले र११ मिळून १०० च्या वर होऊ नयेत हा अंदाज
(अर्थात ह्यात लग्नखर्च धरलेला नाहि ;) )
(भारतातील किंवा परदेशातील) देवळात (देवदर्शनासाठी) गेलो नाही
घरगुती पूजा केली नाही
अध्यात्मिक गुरू कोणी नाही
शून्य या पर्यायाला मत दिले आहे.
एका घरी सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गेलो असता तेथे ठेवलेले रु १० धरले नाहीत कारण कौलाच्या क्याटेगरीत बसत नाही.
खाली लिहायला जागा नाही म्हणून इथेच...
घरचेच गुरुजी असल्याने कधी जास्त तर कधी कमी...
मी स्वतः अजून काही कार्य केले नाही पण घरातील इतर जेष्ठांनी केलेले आहे..
कौल लेखन प्रकारात प्रतिसाद देण्यासाठी कृपया खालचे चित्र बघा मग ह्या धाग्यात तो दुवा शोधा.
मागल्या वर्षी श्राद्धविधीनिमित्त ज्ञानप्रबोधीनीला बहुतेक ५०१ रु देणगी व बहुतेक गुरुजींचे २५० रु झाले होते. आता डोळे फाउंडेशनला देणगी दिली आहे की दरवर्षी त्या दिवशी गरीब आदिवासींचे डोळ्याचे ऑपरेशन होइल. त्यामुळे
आजकाल फार क्वचित मंदीरात जाणे होते (खिशात हात घातल्यावर जी काही हातात नाणी येतात ती दक्षीणापेटीत) व काही छान आठवणी (जसे लहानपणी आजी-अजोबांबरोबर, आईबाबां बरोबर, सारसबागेतनंतर बाहेर खाउ मिळणार म्हणून, नंतर तेव्हाची मैत्रीण आताची बायकोबरोबर) असल्याने मंदीरात जाणे मला बरे वाटते. जिथे अन्नदान चालते त्या मंदीर संस्थानाला देणगी द्यायला मला आवडते.
जेवढे खर्च केले आहेत त्यात प्रचंड समाधान लाभलेले आहे. धर्मकार्य आणि समाजकार्य या दोन्हीही गोष्टीत केलेल्या खर्चाचा उल्लेख करणे ही मी राहतो त्या लोकात हलकी गोष्ट मानली जाते आणि मी स्वतःही तसेच समजतो त्यामुळे कौलाला मत देउ शकत नाही.
>>जेवढे खर्च केले आहेत त्यात प्रचंड समाधान लाभलेले आहे.
+१, हेच म्हणतो.
पुर्वीही करत होत, अजुनही करतो आणि पुढेही करत राहणार.
किती करतो हे प्रमाण बदलत राहणार पण ते महत्वाचे नाही.
मत दिलेले नाही.
लहानपणापासुन घरी पाहतोय तसं, घरच्या मारुतीरायाच्या मुर्तीला दर अमावस्येला अभिषेक होतो. त्यामुळे त्या काळाआधीपासुन ते आजपर्यंत आमच्या पुरोहितांना केवळ त्या अभिषेकासाठी किती दक्षिणा दिली ते मोजणंही मला अशक्य आहे. त्याशिवाय इतर पुजाअर्चा असतातच. आता ह्यासाठी केलेल्या खर्चाची का कुठे नोंद ठेवतं कोणी?
त्यामुळे आकडा अंदाजेही सांगता येणं मला अवघड आहे. शिवाय, जे केलं ते आपल्या इच्छेनं केलं, समाधानासाठी केलं, मग त्याचा हिशेब तरी का ठेवा? असो.
मी आता गेले काही वर्ष दक्षिणा देणे, दक्षिणा टाकणे,बंद केले आहे. नाय तर वर्षाला हजार रुपये किंवा अधिकही टाकत असेन. पान-फुल,नारळ,अगरबत्त्ती, अभिषक, वगैरे साठी तर अज्याबात पैसे खर्च करीत नाही.
फक्त देवळाबाहेर बसलेले अपंग, ,लहान मुले, याकडे मला दुर्लक्ष करणे जमत नाही. इथे नकळत हात खिशात जातोच.
अवांतर : प्रतिसाद लिहायचा असला की, आपल्या सवयीने आपण धाग्याच्या थेट खाली प्रतिसादाचा बॉक्स पाहतो. [अपवाद उपप्रतिसादाचा] कौलाचा धागा असतो तेव्हा कौल जिथे संपतो तिथे अगदी सुरुवातीलाच. 'प्रतिक्रिया द्या 'असा पर्याय दिसतो तिथे प्रतिसाद लिहावा म्हणजे आपला प्रतिसाद अनुक्रमे पहिला दिसतो. :)
-दिलीप बिरुटे
आमच्या शहरात नवे देऊळ उभे केले तेव्हा मदतीचे आवाहन खूप जणांनी केले तेव्हा मदत केली होती. कालांतराने आमच्या ओळखीचे एकजण देवळाच्या कमिटीवर गेले आणि आत चालणारा गैरव्यवहार त्यांनी आम्हाला सांगितला.
देवळाच्या नावावर अधिकचे सामान मागवून ते स्वतःच्या घरी पोहोचते करणे, देवळात येणारी फळफळावळ स्वतःच्या घरी नेणे, देवळात काही कार्यक्रम असले की त्या नावावर स्वतः पार्ट्या करणे, सफाई कामगारांनी दर दिवशी येऊन सफाई करावी असे ठरले असताना त्यांना एक दिवसा आड यायला सांगून रोजचे पैसे अकांउंटमध्ये खर्च म्हणून जोडणे वगैरे वगैरे बरेच.
तसेच, घरी गृहप्रवेशाची पूजा केली होती ३ एक वर्षांपूर्वी तेव्हा भटजींचा जो काही खर्च आहे तो दिला होता. देवळाच्या नियमाप्रमाणे भटजींनी डायरेक्ट दक्षिणा देऊ नये असा नियम आहे. (या खर्चातला भाग कितीजणांच्या खिशात जातो ते माहित नाही आणि ते कळून घ्यायची मात्र गरज वाटली नाही)
हे सर्व कळल्यापासून मदत (दक्षिणा म्हणणे योग्य नाही) बंद झाली.
म्हणून दक्षिणेला शून्य असे लिहिले आहे.
देवळाच्या नावावर अधिकचे सामान मागवून ते स्वतःच्या घरी पोहोचते करणे, ....त्यांना एक दिवसा आड यायला सांगून रोजचे पैसे अकांउंटमध्ये खर्च म्हणून जोडणे वगैरे वगैरे बरेच.
अरे वा! आपले कल्चर टिकवून आहेत तर. ;)
बाकी जेंव्हा केंव्हा देवळात जातो तेंव्हा दक्षिणा ठेवली जाते पण ती अतिशय अल्प असते. मुलीला ठेवायला सांगतो - "देण्याची" सवय असावी म्हणून... मात्र सामाजीक कामांना शक्यतशी मदत नक्की केली आहे.
अवांतरः
या देशात राजकारण्यांना पण दक्षिणा देतो. मात्र एकदा अशीच राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीच्या वेळेस आग्रह झाला म्हणून एका पार्टीस दक्षिणा दिली. बरं ती फोनवरून देयची इच्छा नसल्याने ऑनलाईन पैसे दिले. अर्थात माझे नाव मी टाईप करून क्रेडीट कार्डने दिली. तरी देखील त्या पक्षाने नंतर माझ्या नावाची पार वाट लावली आणि तसे त्यांच्याकडून चुकलेले स्पेलींग वापरून नंतर जेंव्हा त्यातला चुकीचा उच्चार करत फोन करायला लागले, तेंव्हा त्यांना असल्या चुका करणार्यांना परत पैसे मिळणार नाहीत असे सांगितले...
मत १०००१ ते २०००० रू. ला दिले आहे. खरे तर दरवर्षी एवढी दक्षिणा देत नाही पण मुलाच्या मुंजीच्या निमित्ताने व त्या अनुषंगाने झालेल्या सत्यनारायण, लघुरुद्र, ग्रहमख, बोडण अश्या पुजांच्या निमित्ताने या वर्षी दिली गेली. नेहमी कुळाचाराच्या निमित्ताने जो लघुरुद्र केला जातो त्याची दक्षिणा ३५०० रू. ठरलेली असते ती द्यावी लागते. देवस्थानालाही शेकडो/ हजारो रू. देत नाही. कुणी प्रसादाला वगैरे बोलावलं तर पुजेत थोडेफार पैसे ठेवले जातात. तसेही देवळात जाणे आजकाल होत नाही. त्यामुळे पैसे देण्याचे कारण रहात नाही.
स्वतंत्र उत्तर देण्याची सोय दिसली नाही म्हणून इथे उत्तर देते आहे. वर्षभरात कमीत कमी $१०० ते $२०० देवळात नक्की दक्षीणा दिली जाते. खूप मनःशांती मिळते देवळात गेल्यावर. म्हणजे अतोनात!
आत्ताच अगदी हा लेख लिहीत असताना आत्ता देवळातून परत येतेय. नवीन जागी पहीलं अपार्ट्मेंट आणि दुसरं देऊळ शोधलं जातं. व्हरमाँट ला देऊळ नव्हतं. खूप कुचंबणा व्हायची. घरात रोज पूजा होत असे पण वेल ...
डेलावेअर च्या देवळातील एक सुंदर अनुभव सांगते - संध्याकाळी गेले, प्रत्येक देवाची आरती झाली. लक्ष्मीचं देऊळ होतं. मग एका वृद्ध गृहस्थांनी गुजराथी भाषेत "गाऊ गाऊ गोपाळा" म्हणून अतिशय सूदींग हलक्या आवाजात अंगाई गाणं सुरू केलं. एक एक दिवा मालवला गेला. फक्त लक्ष्मीचा दिवा आणि लक्ष्मीची भव्य रत्नजडीत काळीशार मूर्ती प्रकाशात होती. सगळे देव नीद्रीस्त झाले आणि मग सरते शेवटी एक महालक्ष्मी नीद्रीस्त होणार म्हणून पुढील श्लोक म्हटला गेला -
या देवी सर्व भूतेषु निद्रा रुपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
हा श्लोक म्हणेतो वातावरण नीर्मीती इतकी भावपूर्ण झाली होती की माझ्या डोळ्यातून अश्रूधारा लागल्या होत्या.
@प्रियाली - संस्था असली की काही प्रकारची दुखणी येतातच. त्या संस्थेचे काम ती कसे करते यावर त्या संस्थेचे टिकणे अवलंबून असते.
@शुचि- देवळातल्या वातावरणाने पवित्र, प्रसन्न वाटते हे तर अगदी खरेच आहे. महालक्ष्मीची मूर्ती तर विशेष सुंदर सजवतात, विशेषतः दाक्षिणात्य लोक, असे वाटते. आणि काही विशिष्ट वेळा देवळात गेले की इतर वेळांपेक्षा अधिक प्रसन्न वाटते.
आतापर्यंत कौलात भाग घेतलेल्या सर्वांना धन्यवाद. तरी बाकीच्या सदस्यांपैकी ज्यांना (मानवी) आध्यात्मिक गुरू आहेत त्यांनी या कौलात सहभागी झाले नसल्यास सहभागी व्हावे आणि तेथे दक्षिणा देत असल्यास त्या अनुभवावरून काही मोकळेपणे लिहावे अशी विनंती आहे.
कौलात सहभागी झालेल्या लोकांपैकी ५०% लोकांनी शून्य रक्कम धार्मिक रितीरिवाजांना दिली आहे, इतर ५०% नी काही एक रक्कम दिली आहे.. यावरून मिपा सदस्यांच्या वादाच्या विषयांबद्दल (आणि ते कधीच संपत नाहीत असे जे वाटते त्याबद्दलही) थोडा अंदाज बांधता येऊ शकतो असे वाटते. :)
कधीच दिलेले नाहीत आणि देणारही नाही. जिथे दिले आहेत त्या धर्मसंस्था नाहीत. उल्लेख केला असता पण असा उल्लेख केल्यास फाउल होतो असे काही जण मानतात. त्यामुळे करणार नाही.
असं काही होत असेल तर मी ही पैसे द्यायला तयार आहे. अनेक पुरातन वास्तूंमधे शिरण्यासाठी पाच आणि दहा रूपये तिकीट लावणं अतिशय हास्यास्पद आहे असं वाटतं. त्यापेक्षा या सर्व वास्तू, मंदीरं, गोपुरं, शिल्पं, गुहा, आणि इतर ऐतिहासिक वारसाही जतन करण्यासाठी नक्कीच पैसे देईन.
असे मत दिले आहे.
प्राचीन मंदिरे (किंवा अन्य प्रार्थनास्थळे) बघताना जर भारतीय पुरातत्त्व विभागाचे तिकीट असेल, तर ते अर्थात मोजलेले नाही. पुरातत्त्व-खात्याचा नव्हे, खाजगी व्यवहार करणारा मार्गदर्शक जरी असला (तो भक्त/भाविक/भटजी का असेना) त्याला ठरवलेले पैसे दिलेले आहेत. (१०० रु. पेक्षा अधिक.) पण तेसुद्धा मोजलेले नाहीत. देवळाबाहेर चपला ठेवायच्या ठिकाणी कधीकधी शुल्क नसून "दान" मागतात. ते दिलेले आहे. तेसुद्धा मोजलेले नाही.
हे सगळे सोडले तरी कुठेतरी पैसे ठेवल्याचे अंधुक आठवते. पण पैसे ठेवण्याची वेळ कशी काय आली होती ते नीट आठवत नाही.
मागे कधीतरी देवळात आईने "पेटीत टाक" म्हणून तिच्याकडचे पैसे दिले होते, तेव्हा पेटीत पैसे टाकले होते. मुंजीच्या समारंभात बटूला आहेर "दक्षिणा" नावाने द्यायची वेळ आली, तर ती देईन, असे नक्की वाटते. हे दोन्ही जर मागच्या वर्षी झाले असते, तर कौलासाठी मोजले नसते.
माझ्यापुरते उत्तर म्हणजे मी आपण होऊन देवळात जात नाही.
कधीकधी कोणाबरोबर जाणे होते. उदा. मार्च महिन्यात कंपनीची टीम पिकनिक माऊंट अबूला गेली होती तेव्हा परत येताना दिलवाडा मंदिरात सर्वजण गेले. त्यांच्याबरोबर मीही गेलो होतो. ते प्रसिद्ध मंदिर होते म्हणून पहायला म्हणून गेलो. नंतर मंडळी डोंगरावरील आणखी एका देवळात गेली होती तिथे मात्र खालीच थांबलो होतो.
माझ्या काकूसाठी मध्यंतरी बिवली येथे लक्ष्मी केशवाच्या देवळात गेलो होतो.
(१६ वर्षांपूर्वी लग्न झाले त्यानंतरही -लग्न झाल्यावर जोडीने देवळात जायचे असते तसे- गेलो नाही).
सारांश स्वतःहून जात नाही.
ज्यांनी शून्यला मत दिले आहे ते देवळात जातात का असे कुतूहल निर्माण झाले आहे
देवाची आराधना करायला जात नाही.
काहीही मागायला जात नाही.
प्रयत्नांत यश येत नाही म्हणुन जात नाही.
आशिर्वाद मागायला जात नाही.
पुजा अभिषेक करायला जात नाही. वगैरे.
थोडक्यात, प्राचिन वास्तु/शिल्पकला/ प्रसिद्ध मंदिरे वगैरे सोडली तर मंदिरात जात नाही. इथे परदेशात आल्यापासुन मंदिरात फक्त मंदिरे कशी आहेत हे पाहण्यास जातो.
तुम्ही कोणता भाव वगैरे मनात ठेवून देवळात जाता याचे कुतूहल नव्हतं मला ;-)
जे देवळात जातात (कोणत्याही हेतूने) त्यांनी तिथली देखभाल होण्याच्या दृष्टीने मदत करावी असे मला वाटते. उदा. देवळं स्वच्छ असावीत, तिथं काम करणार्यांना थोडेफार पैसे मिळावेत असे वाटत असल्याने मी कधी देवळात गेल्यास पेटीत पैसे टाकतो.
अर्थात जिथं धंदा चालू आहे असं मला वाटतं तिथं मी कधी जात पण नाही.
मधे पंढरपूर बद्दल २ बातम्या वाचल्या.
- देवळाच्या कळसाला सोन्याचा मुलामा करायचा देऊळ वाल्यांचा विचार चाललाय.
- एकादशी नंतर मानवी मैला गोळा करुन वाहून न्यायला लोकांना नेमले जाते.
अर्थातच मी कधी पंढरपूरच्या विठोबाच्या देवळात कधी गेलो तर पाच पैसे पण नाही टाकणार पेटीत. त्या पैशाचे संडास बांधले असते तर केली असती मदत.
जे देवळात जातात (कोणत्याही हेतूने) त्यांनी तिथली देखभाल होण्याच्या दृष्टीने मदत करावी असे मला वाटते. उदा. देवळं स्वच्छ असावीत, तिथं काम करणार्यांना थोडेफार पैसे मिळावेत असे वाटत असल्याने मी कधी देवळात गेल्यास पेटीत पैसे टाकतो.
अशी जी बरीचशी देवळे खाजगी असतात,(आमच्या आजोळाच्या बाजुनेही असे एक मंदिर आहे भीमेच्या काठावर) गेल्या काही वर्षांत बांधलेली. खाजगी रितीने सांभाळलेली, तिथे मी सहसा जात नाहीच. नगरचा असुन शिर्डीला, शिंगणापुरला गेलेलो नाही, मद्रासात राहुन तिरुपतीला गेलेलो नाही.
जावीशी वाटणारी जुनी देवळे वगैरेची काळजी पुरातत्व खाते वगैरे कोणी घेत असेल, पण तिथे देण्यात येणारे पैसे कौलात बसत नाहीत असे वाटते.
मी पूर्वी भारतात वगैरे असताना दानपेटीतून दक्षिणा दिलेली आहे पण काही वर्षांपूर्वी शिकागो मंदिरात चालणारी दूध-दही-मध आणि इतर पदार्थांची नासाडी पाहून आणि मग आमच्या मंदिरात चालणारा गैरव्यवहार पाहून फुकटचे काही देणे बंद केले. भूतकाळातील आकडे देण्यापेक्षा वर्तमानातील आकडे द्यावेत म्हणून शून्य असे म्हटले.
तशीही स्वतःहून मी देवळात जात नाही पण याचा अर्थ देवळात जातच नाही असा नाही. पर्यटनासाठी मी देवळात जाते/ जाईन. वास्तुच्या जीर्णोद्धारासाठी मी पैसे देईन (हे देवावरील श्रद्धेने दिलेले दान नाही) काही समारंभ असेल तर मी देवळात जाते परंतु त्यावेळेस मी दक्षिणा वगैरे देत नाही. मात्र विकत घेऊन खायचे पदार्थ वगैरे मिळाले तर हमखास घेते.
माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ३ वर्षांपूर्वी गृहप्रवेशाचा खर्च दिला होता. त्यानंतर कोणतीही पूजा, अर्चा वगैरेसाठी मी स्वतःहून दान दिलेले नाही.
इथे माझ्या नवर्याचा प्रश्न आला तर मी डॉ. १-१० प्रमाणे टाकेन.
आतापर्यंत फक्त 40 जणानीच मते दिल्याने हा कौल प्रातिनिधिक समजावा की नाही ते माहिती नाही. मात्र 50% जण शून्याला कौल देतात ही आशादायी बाब आहे.
ही जी ५० % आहेत ना ते पैशाचा व्यय योग्य कामालाच करीत असतील अशी खात्री आहे का?
या ५० % पैकी कोणिही लाच देत नाही?
या ५० % पैकी कोणिही वाईट गोष्टीवर पैसे कर्च करत नाहीत?
या ५० % पैकी कितीजण सामाजीक उपक्रमास तनाने, धनाने मदत करीत असतात?
देवावर भले श्रध्दा नसेल. पण कोणा नेत्यावर, मीत्रावर, मार्गदर्शकावर विश्वास असतोच ना. याला काय नाव द्यायचे?
देवळात/धार्मिक कार्यास पैसे न देणार्यांनी पैशावा व्यय योग्यच ठिकाणि करायला हवा वगैरे पुढचे प्रश्न तसे गैरलागू आहेत. कारण ते देवधर्मावर असा खर्च करणार्यांसाठी ही आहेत.
चौथ्या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी होकारार्थी आहे.
तिसर्या प्रश्नाचे उत्तर वाईट गोष्ट कशाला म्हणायचे यावर अवलंबून आहे. पण त्याचेही उत्तर (दारू पिणे ही वाईट गोष्ट असेल तर) खर्च करतो असे आहे. एकाने गावच्या दत्तमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी मागितली होती. त्याला मी दुसर्या कशालाही पैसे देईन असे सांगितले होते.
दुसर्या प्रश्नाचे उत्तर - लाच कधीच देत नाही असे नाही. पण टाळण्याचा 'प्रामाणिक प्रयत्न करतो' एवढे नक्की.
अवांतर : कौलाचे एक वर्षाचे टाईम लिमिट दिशाभूल करीत असावे असे वाटते. म्हणजे मी समजा ३ वर्षांपूर्वी मुलाची मुंज केली असेल तर टेक्निकली मी शून्य असे उत्तर या कौलाला देईन. पण अजून एक वर्षाने वास्तुशांतीसाठी खर्च करणार असल्याचे कौलातून सूचित होत नाही. (To have the cake and eat it too). :)
देवळात/धार्मिक कार्यास पैसे न देणार्यांनी पैशावा व्यय योग्यच ठिकाणि करायला हवा वगैरे पुढचे प्रश्न तसे गैरलागू आहेत. कारण ते देवधर्मावर असा खर्च करणार्यांसाठी ही आहेत.
अरे मित्रा, येथील ५० % वाल्यांच्या प्रतिक्रीया चाचल्यावर असे दिसते देवळात/धार्मिक कार्यास पैसे खर्च करणारे पैशाचा अपव्यय करीत आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश येथे करायची गरज नाही. "आम्ही देवळात/धार्मिक कार्यास पैसे खर्च करत नाही" म्हणजे आम्ही "लै भारी" आहोत असे दर्शवणारे जे आहेत त्यानांच हा प्रश्ण लागु आहे हे नक्की.
कौल या विशिष्ट मुद्द्याशी सम्बन्धित आहे. अन्यथा इतर अनाठायी खर्चा बद्द्ल ही माझे असेच मत राहिले असते. उदा. सध्याच्या काळातले विवाह समारम्भ... तो एक वेगळ्या कौलाचा विषय होईल ....
आतापर्यंत दोन्ही गट (पैसे देणारे, न देणारे) हे संख्येने तुल्यबळ आहेत (या कौलाच्या सुरूवातीला असलेला लीड सोडला, तर नंतर सातत्याने अगदी नेमके अर्धे सदस्य हे पैसे न देणारे असे राहिले आहेत हे किंचित आश्चर्याचे आहे). कदाचित पैसे न देणार्या गटातच थोडे अधिक सदस्य भविष्यकाळात असू शकतील असे दिसते आहे. कारण वर ज्यांनी पैसे ठेवले आहेत त्यातील बरेचसे सदस्य हे "सवयीने" दान/दक्षिणा ठेवणारे या गटात मोडतील असे वाटते. मिपावरील बहुसंख्य सदस्य या प्रकारचे असावेत असा माझा अंदाज आहे (सवयीने मदत करणारे, आणि श्रद्धेने थोडीफार मदत करणारे). त्यात श्रद्धापूर्वक मदत करणारे कमीच असावेत. सवयीने पाकिटाकडे हात जाणारे किंवा घरच्यांसाठी करणारे अधिक आहेत.
या कौलातील निष्कर्ष फारसे शास्त्रीय नसले तरी मला एकंदर पाहून असे वाटते आहे की जे खर्या अर्थाने मनापासून सश्रद्ध आहेत, असे सदस्य मिपावरच कमी संख्येने असण्याची शक्यता आहे (मायनॉरिटी). कदाचित त्यामुळेही आपल्या श्रद्धांवरून मिपावर बोलणे त्यांना प्रशस्त वाटत नाही, असे होत असेल का? असे होत असल्यास ते होऊ नये.
कदाचित त्यामुळेही आपल्या श्रद्धांवरून मिपावर बोलणे त्यांना प्रशस्त वाटत नाही, असे होत असेल का? असे होत असल्यास ते होऊ नये.
अगदी सहमत.
जोपर्यंत कुणा बाबा/अम्माच्या नादी लागून तीव्यक्ती आयुष्यातून उठणे/ कुटुंब उध्वस्त होणे असे काही होत नाहिये......फक्त मनात श्रद्धा आहे, बरे वाटते, आधार वाटतो इथपर्यंतच मर्यादित आहे तोपर्यंत कोणाच्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवली जाउ नये असे वाटते. तसे करणे हे त्या सश्रद्ध व्यक्तीच्या वैयक्तीक गोष्टींमध्ये ढवळाढवळ ठरू शकते. आपल्याला ज्या बद्दल आदर वाटतो त्याची कुचेष्टा होण्याच्या भितीने अनेकजण उल्लेख करणेच टाळतात.
मला वाटते, या खुलाशामुळे आता विशेष फरक पडणार नाही. ज्यांना समजायचे आहे ते बहुदा मस्जिद, चर्च, गुरद्वारा असे सगळे समजले असतीलच. कौल दोन दिवसांपूर्वी टाकला आहे :) नवीन कौल तुम्हाला हवे तर हिंदू नसलेल्या अन्यधर्मियांसाठी अजूनही सुरू करता येईल.
दुसरे एक असे कारण आहे की स्पष्टीकरण कौलात लिहायला जागा कमी पडते. असा तांत्रिकी प्रश्न तुमच्या लक्षात आला नसावा कारण कदाचित तुम्ही कौल काढला नसावा.. याला काही करता येते का हे मला तरी माहिती नाही.
घरगुती पूजेसाठी भटजींना किंवा आध्यात्मिक गुरूंना हे शब्द कटाप करुन 'धार्मिक कारणास्तव' इतकेच लिहिले असते तर अजून जागा मिळाली असती. अर्थात हा छिद्रान्वेषीपणा झाला, पण राहावलं नाही म्हणून दिलं.
अर्थशास्त्रीय चर्चा करण्याचा विचार सुयोग्य आहे.
इंग्रजीत म्हणतात : पुट युवर मनी ह्वेर युवर माउथ इज!
जोवर पैसा ठेवत नाही, तोवर तोंडातली वाफच असते.
जोवर हा कौल प्रातिनिधिक आहे, तोवर टक्केवारीबाबत निष्कर्षही सुयोग्य आहेत. (४० जणांचा कौल प्रातिनिधिक नसावा, असे मत कोणी खाली दिलेच आहे. ते असो.)
मात्र :
जे खर्या अर्थाने मनापासून सश्रद्ध आहेत, असे सदस्य मिपावरच कमी संख्येने असण्याची शक्यता आहे (मायनॉरिटी). ----> कदाचित त्यामुळेही आपल्या श्रद्धांवरून मिपावर बोलणे त्यांना प्रशस्त वाटत नाही,
इथे जाताना तार्किक झेप फार मोठी आहे. सवयीने पैसे देणारे लोक तशाच सवयीने श्रद्धावंतांची मते काही प्रमाणात ऐकून घेतील.
शिवाय एक वेगळी गोष्ट मनात आली. कदाचित पैशाच्या व्यवहाराच्या साहाय्याने श्रद्धेचा खरेपणा मोजायची कल्पना (मला पटली तरी) अनेक सश्रद्ध लोकांना पटणार नाही. असे असल्यास या कौलाचे निष्कर्ष कितीका प्रातिनिधिक असोत, त्यांच्यातून सश्रद्ध व्यक्तींच्या मनातील हेतूंचा वेध घेता येणार नाही. लोकांना थेट विचारून त्यांच्या हेतूंच्या चौकटीत प्रशस्त/अप्रशस्त काय वाटते, असे विचारावे लागेल.
कौल प्रातिनिधिक आहे, असा दावा नाही. कौलातील निष्कर्ष फारसे शास्त्रीय नसले तरी.. हे म्हणण्यातच सगळे आले! सदस्यांमध्ये सवयीने पैसे देणारे मात्र जास्त आहेत असे वाटते.
इथे जाताना तार्किक झेप फार मोठी आहे. सवयीने पैसे देणारे लोक तशाच सवयीने श्रद्धावंतांची मते काही प्रमाणात ऐकून घेतील.
जरी हा कौल ४० मतांपुरता मर्यादित असला तरी साधारणपणे "बोलक्या" सदस्यांचे दोन ढोबळ गटांत वर्गीकरण इतपत तरी कौलामधून निष्कर्ष काढता येतील असे वाटते :)
जे लोक शून्य पैसे देणारे आहेत त्यांचे यासंबंधीचे विचार एका ठिकाणी स्थिर झाले आहेत. सवयीने पैसे देणार्यांचे विचार असे स्थिर झाले की तेही या गटात जातील. सध्या ते कुठच्या पारड्यात आपले मत घालतील याची खात्री नाही - पैसे देताना हात राखून देत आहेतच. त्यामुळे खरे श्रद्धावान निदान या सदस्यांमध्ये भाग घेतलेल्या सदस्यांमध्ये कमीच आहेत असे वाटते. http://misalpav.com/node/13993#comment-228562
लोकांना थेट विचारून त्यांच्या हेतूंच्या चौकटीत प्रशस्त/अप्रशस्त काय वाटते, असे विचारावे लागेल.
असा थेट प्रश्न विचारता आला असता हे खरेच, पण जे त्या वेळी मला प्रशस्त वाटले, ते मी केले. वेळ वेगळी असती, तर कदाचित थेट प्रश्न विचारले असते.
सर्वात कमी संपत्ती असलेले पन्नास टक्के लोक - (जवळपास) शून्य खर्च
सर्वाधिक संपत्ती असलेले वीस टक्के लोक - सुमारे पंच्याण्णव टक्के खर्च
सर्वाधिक संपत्ती असलेले आठ टक्के लोक - सुमारे नव्वद टक्के खर्च
सर्वाधिक संपत्ती असलेले पाच टक्के लोक - सुमारे पंच्याहत्तर टक्के खर्च
हे तर टिपिकल चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याचं चित्र आहे. उद्या मी जर 'तुम्ही हिऱ्यांवर आत्तापर्यंत किती खर्च केला आहे?' असा कौल घेतला तर त्याचं गुणात्मक चित्र असंच दिसेल.
मग आपल्याला असं म्हणता येईल का की निम्म्या लोकांचं हिऱ्यांवर प्रेम नसतं? मग तोच निष्कर्ष श्रद्धेविषयी कसे काढू शकतो? फारतर देवावरचा खर्च ही सर्वसाधारण लोकांना चैन वाटते, व काहींना ती परवडते, काहींना परवडत नाही असं म्हणता येईल.
मिपावर कौल देण्यासाठी लागत असणार्या इंटरनेट-केबल इ. चे खर्च परवडतात हे गृहित धरले आहे. आणि मराठी लोक माझ्या माहितीप्रमाणे देवळांत जातात तेव्हा साधारण १, ११, २१, ५१, १०१ अशा पटीत पैसे दिले जातात, (बाकी धर्मिय/भाषिक कसे देतात हे माहिती नाही). याउलट तुम्ही म्हटला आहे तो हिर्यांचा खर्च मोठा असतो.
शिवाय लहान रकमांचा ऑप्शन दिलेला आहेच. श्रद्धा आणि दिलेले पैसे याचे थेट कोरिलेशन नसले तरी वर बघितले तर श्रद्धा नसणे आणि दिलेले पैसे (०) याचे मात्र चांगलाच संबंध दिसतो. शून्य पैसे दिले जातात तेव्हा त्यामागे हा खर्च मला करायचा नाही, असा ठाम विचार असतो. म्हणजे त्या हिशेबाने उरलेले सश्रद्ध किंवा सवयीने पैसे ठेवणारे.
हिऱ्यांचं मी रूपक दिलं होतं, पण हेच आकडे दहापटीत मांडले, तर साधारण अशीच उत्तरं येतील.
मला म्हणायचं असं आहे की हिरे आवडणं, हा एक भाग झाला, व त्यावर खर्च करणं हा दुसरा भाग झाला. परवडणे हा त्या मानाने गौण मुद्दा होतो. गाडी परवडणारे व हिरे आवडणारेही हिरे घेतीलच असं नाही. कशावर खर्च करायचा याच्या प्रत्येकाच्या प्रायॉरीटीज वेगळ्या असू शकतात...
तेच श्रद्धेच्या बाबतीत लागू होतं असं वाटतं. पैसे न टाकणारे हे अश्रद्ध असतीलच असं नाही. अर्थात या कौलाच्या बाहेरची माहिती वापरून तुम्ही ते कोरिलेशन बळकट करत आहात, पण मग या कौलाचा उपयोग काय असाही प्रश्न पडतो.
मिपावर असलेले या कौलात भाग घेणारे सदस्य वर्षाकाठी त्यांच्या पगाराच्या मानाने अतिशय कमी रक्कम धार्मिक कार्याला देतात, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत नाही का? असो.
अजून एक -कौलाच्या बाहेरची माहिती कसे म्हणता? कौलाला आलेली उत्तरे ही देखील माहितीत भर घालतात. बहुसंख्य लोकांनी आपले अनुभव, विचारही लिहीले आहेत.
तरी कौल हा मी खूप विचार करून काढला होता, असे विधान करत नाही.
हवे तर अधिक शास्त्रीय कौल काढायला असे करता येईल -
१. अश्रद्ध - पैसे देता - किती पैसे देता (पर्याय)
२. अश्रद्ध - पैसे देत नाही
३. सश्रद्ध - पैसे देता - किती पैसे देता (पर्याय)
४. सश्रद्ध - पैसे देत नाही असे पर्याय देऊ.
यात पैसे किती देता यासाठी वरीलप्रमाणे पर्याय काढता येतील, कौल बहुपर्यायी, विस्तृत करू. हरकत नाही.
इथे मत दिलेले नाही. मोजदाद ठेवत नाही. ज्याला द्यावे वाटतात, जिथे द्यावे वाटतात तिथे जमल्यास हातभार लावण्याचा प्रयत्न करतो.
बाकी देणारा तोच आहे (परमेश्वर) हा भाव मनात नेहमी ठेवतो...
प्रतिक्रिया
कारण
०
In reply to कारण by चित्रा
हेच म्हणतो.
In reply to ० by पिवळा डांबिस
५००-१००० ला मत दिले आहे.
In reply to हेच म्हणतो. by तिमा
आतापर्यंत
In reply to हेच म्हणतो. by तिमा
शून्य ला मत दिले
In reply to ० by पिवळा डांबिस
+१
In reply to ० by पिवळा डांबिस
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
समाजाच देण?
In reply to कारण by चित्रा
नाही ते धरायचे नाहीत
In reply to समाजाच देण? by प्रकाश घाटपांडे
मत
In reply to समाजाच देण? by प्रकाश घाटपांडे
आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी
In reply to कारण by चित्रा
१ ते १००
र१ ते १००.. नक्की आकडा माहित नाहि. सवयीने दक्षिणापेटीत टाकलेले अथवा काहि सत्यनारायणाच्या पुजेला ठेवलेलेर११ मिळून १०० च्या वर होऊ नयेत हा अंदाज (अर्थात ह्यात लग्नखर्च धरलेला नाहि ;) )मत दिले आहे. कौलाचा निश्चित
शून्य
शुन्य
खाली लिहायला जागा नाही म्हणून
In reply to शुन्य by विलासराव
कौल लेखन प्रकारात प्रतिसाद
हा..ते कौलात गेल्यावरच दिसतंय
In reply to कौल लेखन प्रकारात प्रतिसाद by सहज
जेवढे
+१
In reply to जेवढे by आनंदयात्री
+२
In reply to +१ by छोटा डॉन
मी आता गेले काही वर्ष
हम्म!
संस्कृती जपून आहेत...
In reply to हम्म! by प्रियाली
मत १०००१ ते २०००० रू. ला दिले
स्वतंत्र उत्तर देण्याची सोय
In reply to मत १०००१ ते २०००० रू. ला दिले by रेवती
खरे आहे
In reply to स्वतंत्र उत्तर देण्याची सोय by शुचि
कधीच दिलेले नाहीत आणि देणारही
शून्य!
शून्य
In reply to शून्य! by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to शून्य by मिसळभोक्ता
त्यापेक्षा
In reply to शून्य by मिसळभोक्ता
१-१००
१ - १०० रु.
माझ्यापुरते उत्तर म्हणजे मी
In reply to १ - १०० रु. by शाहरुख
सहमत
In reply to माझ्यापुरते उत्तर म्हणजे मी by नितिन थत्ते
माझे उत्तर
In reply to १ - १०० रु. by शाहरुख
आपल्याशी 100% सहमत आहे
In reply to माझे उत्तर by Nile
तुम्ही कोणता भाव वगैरे मनात
In reply to माझे उत्तर by Nile
जे देवळात जातात (कोणत्याही
In reply to तुम्ही कोणता भाव वगैरे मनात by शाहरुख
माझे उत्तर
In reply to १ - १०० रु. by शाहरुख
व्यक्तीगत पणे १ - १००
आतापर्यंत फक्त 40 जणानीच मते
ही जी ५० % आहेत ना
In reply to आतापर्यंत फक्त 40 जणानीच मते by उपेन्द्र
देवळात/धार्मिक कार्यास पैसे न
In reply to ही जी ५० % आहेत ना by चिंतामणी
देवळात/धार्मिक कार्यास पैसे न
In reply to देवळात/धार्मिक कार्यास पैसे न by नितिन थत्ते
देवावर भले श्रध्दा नसेल. पण कोणा नेत्यावर
In reply to ही जी ५० % आहेत ना by चिंतामणी
काय दिसते?/माझी मते
कदाचित त्यामुळेही आपल्या
In reply to काय दिसते?/माझी मते by चित्रा
एक शंका
In reply to काय दिसते?/माझी मते by चित्रा
मुळीच नाही
In reply to एक शंका by आमोद शिंदे
वाचले होते पण अन्य धर्मियांनी
In reply to मुळीच नाही by चित्रा
विशेष फरक नाही
In reply to वाचले होते पण अन्य धर्मियांनी by आमोद शिंदे
घरगुती पूजेसाठी भटजींना किंवा
In reply to विशेष फरक नाही by चित्रा
अर्थशास्त्रीय चर्चा सुयोग्य
In reply to काय दिसते?/माझी मते by चित्रा
तसा तो आहे
In reply to अर्थशास्त्रीय चर्चा सुयोग्य by धनंजय
श्रद्धेचा काय संबंध?
तुलना नको
In reply to श्रद्धेचा काय संबंध? by राजेश घासकडवी
पण इथे दोन व्हेरिएबल्स आहेत
In reply to तुलना नको by चित्रा
ठीकच
In reply to पण इथे दोन व्हेरिएबल्स आहेत by राजेश घासकडवी
इथे मत दिलेले नाही. मोजदाद
दान सत्पात्री असावे असे मला
In reply to इथे मत दिलेले नाही. मोजदाद by मदनबाण