Skip to main content

बंडखोरी

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 23/08/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
रुढींची भिंत त्याने पाडली मनाची बंडखोरी वाढली उरे माझे अभागी झोपडे पुरी वस्ती जरी ओसाडली चला, बोली करा, भगवंत घ्या इथे श्रद्धा विकाया काढली जरासे स्वच्छ, हलके वाटले, मनाची ओसरी मी झाडली जगाचे ऐकले अन् वागले, तरी तोंडे किती वेंगाडली! व्यथे, आता तरी तू हो सुखी, तुझ्यासाठी सुखे लाथाडली विठू, दे घोंगडी, आताच मी कुडीची जीर्ण चादर फाडली
लेखनविषय:

वाचने 1356
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

चला, बोली करा, भगवंत घ्या इथे श्रद्धा विकाया काढली सुंदर... जगाचे ऐकले अन् वागले, तरी तोंडे किती वेंगाडली! वा...