Skip to main content

शिवनेरीवर....महाराजांच्या जन्मस्थळी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 23/08/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज घाटात जाउन आलो. तिथून येतांना सीतेवाडी-गणेशखिंड मार्गे १९ किमी असलेल्या जुन्नरला आलो. गणेशखिंडीतूनच दिसणारा शिवनेरी आता त्याच्या कोरीव लेण्यांसह पूर्णपणे समोरच उभा ठाकला होता. शिवनेरी....एक बळकट, बुलंद, अभेद्य किल्ला....जवळजवळ २००० उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहीलेला, सातवाहनांचे राजकुल अंगाखांद्यावर मिरवणारा. नंतर चालुक्य, राष्ट्र्कूट, यादव अश्या राजवटी पाहिलेला नंतर मात्र ३०० वर्षांच्या काळरात्रीत झाकोळून गेलेला. एका दिवशी हळूच भोसल्यांचे सुनेचे, जाधवरावांच्या लेकीचे पाउल गडावर पडले. गडाचे भाग्य उजळले आणि फाल्गुन वद्य तृतीया-१९ फेब्रुवारी १६३० रोजी उषःकाल झाला. मातोश्री जिजांउच्या पोटी सुपुत्र जन्माला आला. शिवनेरी धन्य धन्य झाला. स्वराज्याचा छ्त्रपती शिवनेरीवर जन्मला. प्राचीन काळी नाणेघाटासारख्या प्रमुख व्यापारी मार्गावर लक्ष्य ठेवण्यासाठी इकडे बळकट किल्ल्यांची फळीच उभारण्यात आली. तसेच व्यापारी, बौद्ध भिक्षू यांच्या विश्रांतीसाठी, ध्यानासाठी इथले अनेक डोंगर अक्षरशः कोरून काढण्यात आले व लेण्या निर्माण केल्या गेल्या त्या आपल्याला जुन्नर परीसरात बहुसंख्येने पहावयास मिळतात. तर शिवनेरीला आलो. गडाला ७ भक्कम दरवाजे आहेत. गडाची अलीकडेच डागडुजी झाली आहे. मध्ये एका कड्यात शिवाई देवीचे मंदीर आहे. मातेचे दर्शन घेतले व पुढे निघालो. अंबरखाना पार केला. आता गडाची नैसर्गिक अभेद्य कातळभिंत दृग्गोचर होत होती. लांबूनच शिवजन्मस्थानाची पवित्र वास्तू लक्ष वेधून घेत होती. गंगा-जमुना ह्या सातवाहनकालीन टाक्यांवरून पुढे निघालो. शिवकुंजापाशी आलो. जिजामाता व बालशिवाजी पुतळ्याचे दर्शन घेतले. कमानी मशिद मागे टाकून हमामखान्यावरून शिवजन्मस्थानाच्या दुमजली इमारतीपाशी आलो. येथेच खालच्या खोलीत महाराजांचा जन्म झाला. वरच्या खोलीत नक्षीदार ओवर्‍या आहेत. धन्य होउन तिथून निघालो. बदामी टाके मागे टाकले. व पुढे कडेलोट टोकावर गेलो. सुमारे १००० फूत उंचीचा हा कडा छातीत धडकी भरवतो. येथून जुन्नर शहराचे दृश्य फारच सुरेख दिसते. परत निघालो. बालेकिल्यावर एक कोळी चौथरा व इदगाह आहे. संध्याकाळ होत होती. झपाट्याने पायर्‍या उतरू लागलो. पुन्हा ते सात दरवाजे पार केले व शिवनेरीचे परत एकदा डोळे भरून दर्शन घेतले व पुण्यासारख्या रू़क्ष ठिकाणी येण्यासाठी निघालो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6165
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

Politicians are the same all over. They promise to build a bridge even where there is no river. Nikita Khrushchev आश्वासन देणे हि एक कला आहे, पण आश्वासन देउनहि काम न करणे हि त्याहुन महान कला आहे!!!

फारच छान आहेत फोटो.

जाऊन आलोय.. छान आहेत फोटो.