माझे नांव- सिंधू वडाळकर.
राहाणार- मालेगांव
वय-६६
संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही.
आता मुलींची लग्ने झाली.
थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते... तेव्हा मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा.
जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच.
मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण.
१९७५ च्या आसपासचा काळ. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देता देता आमच्या काळचे उखाणे ही आठवतात.
***
(१) सुदाम्याचे पोहे केले कृष्णाने भक्षण...
--- राव म्हणतात, संकटकाळी मी करीन देशाचे रक्षण.
(२) रामनामाने समुद्रावर दगड तरंगले...
--- रावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले.
(३) प्रभू रामचंद्राला बोरे अर्पून, शबरीने जीवन केले कृतार्थ...
--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवनाला नाही उरत अर्थ"
(४) संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक...
--- रावांना आवडतात खुप मोदक
(५) निसर्ग्सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट...
--- रावांनी धरली परमार्थाची वाट.
(६) कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष...
--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवन रुक्ष"
(७) श्रावणात प्राजक्ताला येतो बहर...
--- राव म्हणतात, "महाराष्ट्रात पावसाने केला कहर"
(८) ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद...
--- रावांना आहे पुस्तके वाचनाचा छंद.
(९) महादेवाच्या गळ्यात नगाचा वेढा...
--- रावांना आवडतो केशरी पेढा.
(१०) वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी
--- रावांनी आणली आणली मला ५ तोळ्याची सरी
(११) जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष
--- रावांचे नाव घेते, आहे कुलदेवतेची साक्ष
(१२) खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे
--- रावांना आवडतात कांदे पोहे
(१३) अर्जुन व कृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी...
--- रावांना आहे परमार्थाची गोडी.
(१४) महाभारतात एकलव्याची आहे गाथा...
--- राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा.
(१५) कोल्हापूरची मिरची आहे झणझणीत...
--- रावांचा आवाज आहे खणखणीत
(१६) कमळाभोवती भ्रमराचे गुंजन...
--- राव करतात हरीचे भजन
(१७) आम्रतरूवर कोकिळेचे गुंजन...
--- राव करतात गणेशाचे पूजन.
(१८) राधा होती हरिभजनात तल्लीन...
--- राव म्हणतात आपण व्हावे ईश्वराशी लीन
(१९) कृष्णाने केले कालीयामर्दन...
--- राव धरतात रामाचे चरण
(२०) सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी आप्ल्या करतुत्वाचा उमटवलाय ठसा
--- राव म्हणतात अविरत प्रयत्न करण्याचा तू घे वसा
(२१) गणेशाला प्रिय दूर्वांची जूडी...
--- रावांना आहे परमार्थाची गोडी
(२२) संत जनाबाईने दळीता कांडीता विठ्ठलाल आळविले...
--- रावांच्या चरणी मी जीवनपुष्प वाहिले
(२३) श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य...
--- राव म्हणतात, प्रभू राम विश्वामित्राचे शिष्य.
(२४) हिरडा, आवळा, बेहेडा याची असते आयुर्वेदात भरती
--- रावांची राहूदे निरंतर किर्ती
काव्यरस
वाचने
10019
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान...लग्नाळू मुलीनी वाचनखुण
उखाण्यांवरून...
बालगंधर्वांना काही
In reply to उखाण्यांवरून... by राजेश घासकडवी
सर्व
समानता
In reply to सर्व by तिमा
हे घ्या रा.घासाहेब काहीच्या
In reply to समानता by राजेश घासकडवी
कबीराचे दोहे आणि कांदा पोहे
सर्व उखाण्यांमधे --- रावांना
>>सरकारने व कायद्याने सोय
In reply to सर्व उखाण्यांमधे --- रावांना by अविनाशकुलकर्णी
वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे
In reply to >>सरकारने व कायद्याने सोय by नावातकायआहे
मिपावर स्वागत आहे. उखाणे
लिव्ह इन टाकुन गुगळा.....
हम्म!!!
त्यांनी आधी तिकडे लेख टाकला
In reply to हम्म!!! by पिवळा डांबिस
काकांचा इतरांना वयोवृद्ध
In reply to हम्म!!! by पिवळा डांबिस
अगदी अगदी!
In reply to काकांचा इतरांना वयोवृद्ध by अर्धवट
अगदी अगदी!
In reply to अगदी अगदी! by चतुरंग
खोक्यात खोका
लै भारी...अशक्तराव, लै जाडजूड
In reply to खोक्यात खोका by अशक्त
राग मानू नका, पण हा उखाणा मला
In reply to खोक्यात खोका by अशक्त
नाही मानत...
In reply to राग मानू नका, पण हा उखाणा मला by विश्वनाथ मेहेंदळे
मुलालाही उखाणा घ्यावा लागतोच !
शाबास, डॉक्टर!!!
In reply to मुलालाही उखाणा घ्यावा लागतोच ! by डॉ.प्रसाद दाढे
कोल्ह्याला काकडी, सशाला
In reply to शाबास, डॉक्टर!!! by पिवळा डांबिस
एक ऑलटाइम इरसाल उखाणा
In reply to कोल्ह्याला काकडी, सशाला by राजेश घासकडवी
जोडीत जोडी, लक्ष्मी-नारायणाची
वा मावशी !