मंडळी श्रावण पाळणार्यांची जाम पंचाईत झाली असेल नाही, कधी श्रावण सरतोय आणि कधी घासासोबत तो वास येतोय असं झालं असेल ना !! मग एक उपाय आहे ती म्हणजे ही पाकृ, श्रावण पाळल्याचं समाधान आणि मासळी खाल्ल्याचं सुख (काहीजणं दुधाची तहान ताकावर म्हणतील याला). तसा आमचा बाराही महिने श्रावण पण पाकृ आहे ती खास मछलीबिन सावन के पानी में तडपने वालों के लिये. आज पहिल्यांदाच मिपावर पाकृ डकवत आहे त्यामुळे जरा भीती आहे मनात (मिपाकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया वाचत असतो )
तर साहित्यः कच्ची केळी ३
हळद, लाल तिखट, बारीक रवा, मीठ, तळणासाठी तेल.
कृती:
कच्ची केळी (म्हणजे काप करण्यासाठी वेगळी केळी मिळतात, आकाराने लहान असतात) घ्यावीत.
त्यांची साल सुरीने नीट सोलून काढावी.
आणि मग पातळ काप करुन ते काप पाण्यात टाकावे.
हे पाण्यात न टाकल्यास काप काळे पडतात.
त्यानंतर ते काप पाण्यातून नीट निथळून त्याला हळद व मीठ लावून ५ ते १० मिनीटे मुरत ठेवावे, म्हणजे केळ्याचा चिकटपणा निघून जाईल.
त्यानंतर एका भांड्यात बारीक रवा, तिखट, हळद, मीठ एकत्र करुन घ्यावे. मीठ बेताचे घालावे कारण आधीच आपण हळद व मीठात काप मुरत ठेवले आहेत.
तर हे मुरत ठेवलेले काप वरील रव्याच्या मिश्रणात घोळवून तव्यावर मंद आचेवर तळावे.
काप छान तळून जेवणासोबत तोंडी लावायला किंवा असेच चहासोबतही छान लागतात.
मंडळी फोटो पण डकवत आहे, दिसत नसल्यास कृपया डकवण्याची योग्य पद्धत सांगणे.

वाचने
11441
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
फ्लिकर किंवा पिकासा
खाल्ली आहेत.
आम्ही आमच्या एका मित्राला
पाकृ खमंग असणार यात शंका
फोटो?
खेचरबुवा फोटो डकवत आहे
In reply to फोटो? by विसोबा खेचर
भौ, फोटु लावल्याबद्दल लै धन्यवाद.
In reply to खेचरबुवा फोटो डकवत आहे by सूड
फोटो नाही.. सबब लेखातल्या
पाकृ गच्चीवर वाळत टाकलेली
In reply to फोटो नाही.. सबब लेखातल्या by अर्धवट
त्यांची साल सुरीने नीट सोलून
केळ्याची साल सुरीने ?
In reply to त्यांची साल सुरीने नीट सोलून by परिकथेतील राजकुमार
केळ्याचे काप
नीरफणस
In reply to केळ्याचे काप by पैसा
नीरफणस
In reply to नीरफणस by सूड
उत्तर द्यायला जरा उशीर झाला>>
In reply to नीरफणस by पैसा
जरा..
In reply to उत्तर द्यायला जरा उशीर झाला>> by दिव्यश्री
नीरफणस बाकी भारी दिसतो आहे.
In reply to जरा.. by ब़जरबट्टू
धन्यवाद. इथं मंडईत कुठं
In reply to नीरफणस by पैसा
फोटो
खुप सुन्दर लागतात.
सुधांशू मस्तच रेसिपी. असे
ठांकु ठांकु,
In reply to सुधांशू मस्तच रेसिपी. असे by जागु
धन्यवाद. रेसिपी ज्यांना
अरे व्वा ...मस्त पाककृती .
अर्र!! हे मी लिहीलंय यावर आता
मिळमिळीत वगैरे काही नाही.
In reply to अर्र!! हे मी लिहीलंय यावर आता by सूड
छान आहे की पा.कृ. ! दुसरी
हम्म !! प्रयत्न करायला हरकत
In reply to छान आहे की पा.कृ. ! दुसरी by अजया
मस्त