आमच्या इथे समर सुरु झाला की गावागावातून जत्रा भरतात. पूर्वी या जत्रा म्हणजे आपल्याजवळ्च्या गुराढोरांचे तसेच शेतीमालाचे प्रदर्शन करण्याची संधी असायची. आता त्या जोडीला मनोरंजनासाठी अनेक गोष्टीही असतात. या जत्रांचा एक अविभाज्य घटक म्हणजे वेगवेगळे फूड स्टॉल. बुढ्ढी के बाल पासून ते एलिफंट ईअर पर्यंत वेगवेगळे प्रकार इथे खायला मिळतात. या जत्रेतला माझा आवडता प्रकार म्हणजे फ्राईड ग्रीन टोमॅटो.
साहित्यः
४ कच्चे टोमॅटो
१ अंडे
१/४ कप कॉर्नमिल(नसल्यास मैदा आणि ब्रेड क्रंब्ज एकत्र करुन)
चवी प्रमाणे मीठ आणि मिरेपूड(किंवा तिखट)
तळण्यासाठी तेल
कृती:
टोमॅटो धुवून त्याच्या १/४ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात. छोट्या बोल मधे अंडे फोडून फेटून घ्यावे.
कॉर्नमिल मधे मीठ आणि मिरेपूड(मी तिखट वापरते) नीट मिसळून घ्यावे. फ्राईंग पॅन मधे साधारण १/४ इंच येइल इतपत तेल तापत ठेवावे. टोमॅटोच्या चकत्या फेटलेल्या अंड्यात बुडवून नंतर कॉर्नमिल मधे घोळवाव्यात. जास्तीचे कॉर्नमिल झटकून टाका. तापलेल्या तेलात या चकत्या तळा. गरमा गरम फ्राईड ग्रीन टोमॅटो तयार आहेत.

वाचने
6571
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधीच न ऐकलेली/ पाहिलेली
अगं आम्ही नुसतेच खातो. कच्चा
In reply to कधीच न ऐकलेली/ पाहिलेली by रेवती
दिसतायत तर भारी. एकदा गिळुन
परिकथेतील राजकुमार
हटके
अरे वा!
झकास...
मस्त ग स्वाती तै...
तोंडाला पाणी सुटले
छान दिसतोय पदार्थ...ग्रीन
नाव ऐकून आहे...याच नावाचा
ही पाकृ छान आहे.
परिकथेतील राजकुमार
कच्चे टोमॅटो
छान
मस्त !
एलिफंट इअर्स म्हणजे यीस्ट
In reply to मस्त ! by प्राजक्ता पवार
मस्त..
+१
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
धन्यवाद!
छान..