यंत्रांचा प्रभाव किती?
मी लहान असताना फोन ही नवीच गोष्ट आली होती. एखाद्याकडे छान अपडेटेड टेलिफोनची डायरी हा जितका चर्चेचा विषय असे तितकाच जास्तीतजास्त नंबर पाठ असणे हा होता. माझे स्वतःचे अनेक नंबर्स तोंडपाठ होते व घरात सगळे जण नंबर डायरीत शोधण्याआधी मला विचारत. तेव्हा काय मजा यायची. तर ते असो. पुढे मोबाईल आले आणि नंबर लक्षातठेवणे बंद झाले. आणि आता अशी वेळ आली आहे की ना डायरी मेंटेन्ड आहे आणि मोबाईल नसला तर फारसे नंबर्स लक्षातही नाहित.
------------
माझी आई सांगत होती. आम्ही "तरी बरं तुम्ही नुसते पाढे पाठ केले. आम्हाला पावकी, निमकी, पाऊणकी, दिडकी, अडिचकी वगैरे असायचं शिवाय उभे पाढे आडवे पाढे पाठ नसले तर तुमच्या आजोबांचा बसलाच रट्टा पाठीत." मात्र सध्या मुलांना पाढे पाठ करणे नकोसे झालेय. पुर्वी आमचा भाजीवाला, वाणी, केमिस्ट तोंडी हिशोब करायचे, आता प्रत्येकाकडे "कॅल्क्युलेटर" आले आहेत. किलोचा भाव दुप्पट करतानाही त्यांची बोटे क्यॅल्क्युलेटरकडे वळतात.
------------
आजी सांगते पूर्वी की नाहि कोंबडा आरवला की जाग यायची आता लोकांना घड्याळाचा गजर झाला नाही तर सकाळ झाल्यासारखंच वाटत नाही.
------------
बाबा म्हणतात " टाईपरायटर असताना प्रत्येक गोष्ट विचार करून टंकावी लागायची. चुक करणे महागात पडत असे. पुढे कंप्युटर आले आणि चुक सुधारणे सोपे झाले. पण याचा फायदा झाला का तोटा? आता लोक एखादी गोष्ट टंकण्याआधी जराही विचार करत नाहीत आधी टंकतात आणि मग चुका शोधून काढत बसतात. हे टंकनापर्यंत होतं तिथपर्यंत ठिक होतं.. आता नव्या पिढीच्या आचारातही ते उतरू लागलंय. आधी बिनधास्त कृती करायची आणि मग चुकांबद्द्ल हळहळायचं. प्रत्यक्ष जीवनातल्या सगळ्या चुकांना 'अन् डु' बटण थोडेच असते?"
-------------
तर तुमच्याही आयुष्यातल्या सवयींवर, कामांवर, नैसर्गिक शक्तीस्थळांवर (जसे स्मरणशक्ती, पाककला, शिवणकला) यंत्रांनी कुरघोडी केलीय का?
कित्येक गोष्टी यंत्रांशिवाय तुम्ही करू शकणार नाहीत का? तुमच्या रोजच्या सवयींवर, शक्तीस्थानांमधे यंत्रांचा सहभाग किती?
आणि टोकाचा प्रश्न विचारायचा तर तुमचे आयुष्य यंत्र नसतील तर थांबेल असे तुम्हाला वाटते का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आयुष्य थामनार नाय. कामाचा येग
रोजच्या सवयींवर आणि एकूणच
तुम्ही तात्याराव सावरकरांचा
च्यायला ॠषीबॉय किती विचार
चालायचच.. काळानुसार हे बदल
कुरघोडी - कुरघोडी नाही पण
निषेध!!
अरे ! झालं ?
मी लहान असताना फोन ही नवीच
सुखासिनतेकडेच झुकण्याचा
सही
एकदम बरोबर
सहमत
किंचित असहमत
+१
असेच काहीसे पण तरीही
डेटा वॉल्यूम
कालाय तस्मै नम:
छान...
खुलासा
कुरघोडी
तारतम्य..
चांगली चर्चा आणि चिंतन
८०च्या आसपास चित्रपटसंगीतात
चांगला चर्चा प्रस्ताव
सहमत आहे. पण..
सल
संकल्पना
खरं आहे....
छान लेख.........
नक्कीच
प्रतिसाद
येस्स
अरेरे.. परत कशाला आणला त्याला
रेडीओ अॅस्ट्रॉनॉमर झाल्याचा
आधि होते .मंत्र..मग आले
वाचनीय चर्चा, वाचतो आहे...
हाहाहा... म्हणून मी तर ऑफिसचे
हॅ हॅ हॅ हॅ!
हा हा हा
यंत्रांच्या रोजच्या जीवनातला
यावरून आठवलं
रस्त्यावर देखिल बरेच अपघात आजकाल मोबाईल
थांबणार नाही
गीझर