वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....
आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपण हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते. एकदा का आपले मत पेटीमध्ये गेले कि आपण परत लोकशाहीचे गुलाम होतो. नंतरची पाच वर्षे सरकार विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. फार फार तर आपण आंदोलने, चर्चा सत्रे, जनहित याचिका दाखल करू शकतो. पण परिणाम सर्वांना माहित असतात. पैसा कुठे, कसा व किती खर्च करायचा हे आपण सरकारला ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच CWG ला 1 हजार करोड काय नि १५ हजार कोरड काय, पैसा द्यायचा का नाही हे आपण ठरवू शकतच नाही. आपला वर्षाआखेर जमा होणार कर एकदा कर एकदा सरकारच्या घशात गेला कि सरकार म्हणेल तीच पूर्व दिशा. आपण फक्त घाम गाळून कर भरायचा पण खर्च ठरविण्याच्या बाबतीत आपले मत शून्य, असे का ?
ह्यावरून एक विचार मनात आला
कि दर पाच वर्षांनी सरकार जसे आपले धोरण जाहीर करते तसे सरकाने एक यादी सुद्धा प्रसिद्ध करावी. जसे कि,
खेळ विभाग, रस्ते विभाग, धरणे विभाग, संरक्षण विभाग, अन्य (आणि जे काही अन्य विभाग जिथे सरकार पैसे खर्च करते वा करणार आहे असे सगळे विभाग)
आणि दर वर्षी कर भरताना मला एक सवलत देऊ केली कि मी माझा कर भरताना वर सर्व दिलेले विभाग यांचा विचार करून माझा कर कुठे खर्च व्हावा ह्याची टक्केवारी मी त्यासोबत द्यावी.
म्हणजे जर मला वाटत असेल कि सरकारने खेळ विभागात पैसा खर्च करू नये तर त्या विभागासाठी मी कमीत कमी (शून्य) टक्केवारी माझा कर भरतेवेळी नमूद करीन, कदाचित क्रीडाप्रेमी आपले कर भरताना खेळ विभागासाठी १०० % नमूद करतील. आणि जेणे करून सरकारकडे खेळ विभागासाठी लोकांनी ह्या प्रकारे नमूद केलेलीच रक्कम खर्च करण्याचा अधिकार असेल. अश्या प्रकारे सरकारकडे प्रत्येक विभागासाठी ठराविक रक्कमच हाथी राहील. त्यामुळे सरकार अवाजवी खर्च करण्यास (कदाचित) परावृत्त होऊ शकेल.
आणि मला माझा कररुपी पैसा कसा खर्च व्हावा ह्याचा निर्णय तरी घेता येईल.
मग देऊ दे क्रीडाप्रेमींना हवा तेवढा कर क्रीडेसाठी आणि भरवू द्यात हजारो करोडोचे खेळ. काय म्हणताय ?
प्रतिक्रिया
सविस्तर प्रतिसादासाठी जागा
OOPS
आता मला कळलं.. हलकट ला
संसदीय लोकशाही
शब्दाशब्दाशी सहमत आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मनमोहन सिंघ यांनी "मोफत धान्य
आपली सुचना एक कल्पना म्हणून
दोनदा झाला म्हणून काढून
एक शंका
फक्त २०%
व्हॅट कशात येतो?
विक्रीकराचा वंशज
हम्म
नॉन टॅक्स रेव्हेन्यू
काही गडबड
अर्रर्रर्रर्र
सुचना पटली नाही
जागतीक स्पर्धांचे काही दृश्य परिणाम
विचारले असते तर?