पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे.
भारतानेही काही लाखांची मदत देण्याची तयारी दाखविली आहे. आता जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी मदत दिली जात आहे,'' असा दावा "नवा-ए-वक्त' या पाकिस्तानातील ऊर्दू वर्तमानपत्राने केला आहे.
पहा कुत्र्यांचे (शेपुट) वाकडे ते वाक डेच !॒!
(आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांना क से काय सुचले दान करायला ?
आधी आपल्या विकासाकडॆ ध्यान द्या !! )
वाचने
4466
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय हिन आणि हिणकस प्रकार
अतिशय हिन आणि हिणकस प्रकार !!
हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !!
हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो???
In reply to अतिशय हिन आणि हिणकस प्रकार by परिकथेतील राजकुमार
अहो ! परिकथेतील राजकुमार ?
तुम्ही ख्ररेच परिकथेतील राजकुमार दिसता ! बरं का ?
हा सगळं पाकिस्तान चा डाव आहे ! हिंदुस्तानाला बदनाम
करण्याची एक ही संधी पाकडे सोडत नाहित !
पाकडे म्हणतात हे पाणीयुद्ध आहे ! किव येते ह्यांची !!
निसर्ग आणि मानवातला दुरावा वाढत चाललेला आहे.
त्यामुळे मानव आत्मघात ओढवून घेत आहे !
ह्या पुराला हिंदुस्तान जबाबदार नाही !
हिंदुस्तानाचा काहीहि सबंध नाही !
हिंदुस्तानाला बदनाम करु नये !
आणि
हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो???
वाह वाह !! असे ओरडून
In reply to हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो??? by संजयशिवाजीरावगडगे
वाह वाह !! असे ओरडून बोलल्याने खोटे खरे होते का ?
कुठे बाँबस्फोट झाला की तुम्ही पाकिस्तानच्या नावानी गळे काढणार.
कुठे अपघात झाला की लगेच अपघातामागे परकिय ताकदीने घडवलेला घातपात म्हणुन आरडा ओरडी करणार.
काश्मीर मध्ये तर कोणाला हार्ट-अॅटॅक आला तरी पाकिस्तानला जबाबदार धरतात म्हणे.
हे सगळे गळे काढणे योग्य ? आणि आम्ही जरा कुठे शंका व्यक्त केली तर तुम्ही 'बदनामीचा डाव' म्हणुन शंख करणार होय ??
लेह मधली ढग फुटी चिनच्या
लेह मधली ढग फुटी चिनच्या "बादल बम" मुळे झाली म्हणायला बरे वाटते का?
अहो कळलं. चीनच्या बादल बम
In reply to लेह मधली ढग फुटी चिनच्या by अविनाशकुलकर्णी
अहो कळलं. चीनच्या बादल बम मुळे झाली ते.
"कळलं" असं म्हणेपर्यंत
In reply to अहो कळलं. चीनच्या बादल बम by llपुण्याचे पेशवेll
"कळलं" असं म्हणेपर्यंत सांगितलं त्यांनी. :)
उचलली जिभ लावली टाळ्याला
"उचलली जिभ लावली टाळ्याला "
पाकिस्तान "स्वत: वरुन दुसर्र्याची परिषा "करतोय.
तेच ना? !! ?? ! ?
आणि अहो! यावेळी को णी उपोषण कराय लाही नव्ह तं बस लं ! बरं का?
वक्त वक्त की बात...
In reply to तेच ना? !! ?? ! ? by राजेश घासकडवी
आणि अहो! यावेळी को णी उपोषण कराय लाही नव्ह तं बस लं ! बरं का?
अहो पुर्वी त्या गांधींच कोणी ऐकायच नाही, दाद द्यायच नाही म्हणून त्यांना उपोषण करायला लागायच...
हल्लीच्या गांधींचा वचक दाणगा..... त्यांच्या इशार्यावरच हे दान दिले गेले असणार बघा....
पाकिस्थान / आय . ए . एस.
पाकिस्थान सरकार आय . ए . एस च्या हातामधले बाहुले आहे व आय . ए . एस ही " फंडामेंटलीस्ट "अतिरेक्यांच्या तालावर नाचणारी संघटना आहे आणि मेरा "महान" भारत सो कॉल्ड "सेक्युलर" आहे.
ह्या त्रैराशीकात अनेक प्रश्नांची ऊत्तरे आहेत.
अहो आय. ए. एस. नव्हे हो....
In reply to पाकिस्थान / आय . ए . एस. by तर्री
अहो आय. ए. एस. नव्हे हो.... आय. एस. आय. !!!! :(
भारतीय नोकरशाही
In reply to पाकिस्थान / आय . ए . एस. by तर्री
पाकिस्तान सरकार हे भारतीय नोकरशाहीच्या हातातले बाहुले आहे हे वाचून अतीव आनंद झाला. पण मुळात भारतीय नोकरशाही ही मूलतत्त्ववादी अतिरेक्यांच्या तालावर नाचणारी संघटना असेल, तर ही मात्र चिंतेची बाब आहे.
भारतीय नोकरशाहीला नाचवणारे मूलतत्त्ववादी नेमक्या कोणत्या धर्माचे, याचा मात्र उलगडा झाला नाही. अर्थात, सेक्युलर भारतात याने कदाचित फरक पडू नये.
बाकी, भारत महान आहे याबाबत वाद नाहीच. अशी महान त्रैराशिके मांडणारे महान गणिती ज्या देशात आहेत, त्या देशाला महान असण्यावाचून गत्यंतर नाही.
_/\_ उचला आता आम्हाला.
In reply to भारतीय नोकरशाही by पंगा
_/\_
उचला आता आम्हाला. डायरेक्ट निवर्तलोच..
काय च्यायला समिकरणाचं प्रमेय सोडवलंय! लढ बाप्पू.... =)) =))
वैयक्तिक प्रश्नः आर्किमिडीज आपले कोण? :D
वैयक्तिक उत्तर
In reply to _/\_ उचला आता आम्हाला. by धमाल मुलगा
मानसशिष्य.
वस्त्रांना (ऑकॅमचा) वस्तरा* लावण्याची संकल्पना त्यांनी आमच्याकडूनच घेतली, असे आमचे प्रांजळ दृढमत आहे.
(* Entities must not be multiplied beyond necessity.)
आम्ही आणि रा. रा. श्री. आर्किमिडीज यांजमधील वैयक्तिक संबंधांत व्यक्तिगत रस घेतल्याबद्दल आम्ही आपले व्यक्तिशः आभारी आहोत. (रा. रा. श्री. आर्किमिडीज यांच्या वैयक्तिक मताबद्दल मात्र कृपया व्यक्तिशः त्यांच्याकडेच थेट चौकशी करावी, ही व्यक्तिगत विनंती.)
तुम्हाला प्लॅन्चेट करता येते
In reply to वैयक्तिक उत्तर by पंगा
तुम्हाला प्लॅन्चेट करता येते का?
पाकिस्थान / आय . ए . एस.
पाकिस्थान सरकार आय . ए . एस च्या हातामधले बाहुले आहे व आय . ए . एस ही " फंडामेंटलीस्ट "अतिरेक्यांच्या तालावर नाचणारी संघटना आहे आणि मेरा "महान" भारत सो कॉल्ड "सेक्युलर" आहे.
ह्या त्रैराशीकात अनेक प्रश्नांची ऊत्तरे आहेत.
आयला... ही बेनी कधी सुधारायची
आयला...
ही बेनी कधी सुधारायची नाहीत बा. आता पासष्ट वर्षं होत आली तरी ह्यांचं तेच गुर्हाळ...
च्यायला....ह्यांच्या कुठं एखाद्या लष्करशहाला पोर झालं तरी 'ह्या खोडसाळपणात भारताचाच हात आहे' अशी बोंब मारणार हे येड**.
आता सगळ्या जगालाही कळलंय ह्यांच्या कोलांट्या कशा असतात ते.
पाकिस्तानात
पाकिस्तानात जे जे काही वाईट होते त्यामागे भारताचेच कारस्थान असते हो !! समजून घ्या हो.....
हा हा!! मस्त.
In reply to पाकिस्तानात by अरुंधती
हा हा!! मस्त.
मला वाटायचं काळेकाकाच फक्त
मला वाटायचं काळेकाकाच फक्त पाकिस्तानी पेप्रं वाचतात.
खुलासा.
मला आय. एस. आय. म्हणायचे होते.
क्षमा असावी.
समजून घेतल्याबद्दल बिकांचे आभार.
मस्त आहे
विचार करायला लावणारा लेख.
+१
In reply to मस्त आहे by गोगोल
असेच म्हणतो
अतिशय शरमेची गोष्ट............
पाणी पाणी म्हणुन विदर्भातील आंध्रातील व कर्नाटकातील शेतकरी ओरडत असताना तेच पाणी पाकिस्तानात फुकट सोडुन देणारया भारत सरकारचा जाहिर निषेध. हे फुकटची चैन आपल्याला परवडते कशी?
अहो, अशी भारत सरकारवर टिका
In reply to अतिशय शरमेची गोष्ट............ by वेताळ
अहो, अशी भारत सरकारवर टिका करणे योग्य नव्हे! तुमचा निषेध.. आपण पाणी-पाणी करून मेलो तरी चालेल, पण तिकडे पाकिस्तानात पाणी सोडून पूर आणला ना आपण? शत्रू राष्ट्राचे नुकसान हाच आपला फायदा! मी तर म्हणेन आता एखादा सुधारीत नद्याजोड प्रकल्प करून भारतातील सर्वच नद्यांचे पाणी पाकिस्तानात सोडून देऊ.. च्यायला, जाऊ दे ना पाकिस्तान एकदाचा पाण्यात.. काय म्हणताय?
प्रशंसनीय
In reply to अहो, अशी भारत सरकारवर टिका by भारतीय
प्रशंसनीय !! शत्रू राष्ट्राचे नुकसान हाच आपला फायदा !!
या अल्लाह ! दुसर्याचे वाईट
In reply to प्रशंसनीय by संजयशिवाजीरावगडगे
या अल्लाह !
दुसर्याचे वाईट चिंतण्याची हि कुठली प्रवृत्ती ?? वरचे प्रतिसाद वाचुन आज एक मिपाकर व भारतीय म्हणुन शरम वाटली.
!!पाणी पाणी म्हणुन विदर्भातील
!!पाणी पाणी म्हणुन विदर्भातील आंध्रातील व कर्नाटकातील शेतकरी ओरडत असताना तेच पाणी पाकिस्तानात फुकट सोडुन देणारया भारत सरकारचा जाहिर निषेध. हे फुकटची चैन आपल्याला परवडते कशी?
इथे जो मुद्दा उपस्थित केला आहे तो सुद्धा महत्वाचा आहे.. विधार्भानंतर बाभळीचा मुद्दा सुद्धा ताजाच आहे...
पण इथे जे भारताचे, हिंदुत्वाचे निषेध करून वाभाडे काढले जातायत ते जरा खटकलं...
हे अगदी दुसर्याच्या बापासाठी आपण मिशा काढण्यासारखा वाटता...