आंतरराष्ट्रिय बातम्या आणि भारतिय वृत्तपत्रे
पाकिस्तानात सध्या पुरानं थैमान घातलंय. पंधरा दशलक्ष म्हण्जे जवळ जवळ नऊ टक्के लोक विस्थापित झालेत. आणि हे घडतंय ते आपल्या शेजरी राष्ट्रात, ज्याच्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा आपल्या देशावर थेट परिणाम होतो. या अशा आपत्तीतही भारताने देऊकेलेली पाच्दशलक्ष डॉलर्रची मदत स्विकारावी का नाही यावर त्या देशात खल चल्लय. स्वाभाविकच ही एक प्रचंड महत्वाची बातमी आहे पण दुर्दैवाने टाइम्स सारख्या प्रमुख वृत्तपत्र समुदायाने याची तितकिशी दखल घेतलेली दिसत नाही. याला अपवाद मात्र मद्रासच्या हिंदूचा. या पार्श्वभुमीवर बी बी सी आणि सी एन एन सारख्या कंपन्यांचं कव्हरेज मात्र उठून दिसतं.
टाइम्स बाबत तर हल्ली काही नं बोललेलंच बरं. पेज ३ न्यूज पेक्षा इथे इतर बातम्यांना काही महत्व दिसत नाही. आणि हे असं नेहमीच जाणवत राहतं.
भारतीय मिडीया या कोषातून केंव्हा बाहेर पडणार देवजाणे. तुम्ह्हाला याबाबत काय वाटतं?
प्रतिक्रिया
चु. भू. द्या घ्या
पाच्दशलक्ष डॉलर्रची
हो हिंदु खुप चांगलं असतं
पाकिस्तान जर जगाच्या नकाश वरुन पुसले
माझे मत
होय
स्वतः जागतिक बॅंकेकडुन कर्ज
हिंदू आणि टाईम्स?
सहमत
+१ पण तरीही एवढी रक्कम जरा
अहो पण हे लोक आपल्या पैशातुन बंदुका विकत घेवुन
मेरा भारत महान...
"पैसा हा जनतेचा आहे" हे फक्त टाळ्या खाऊ वाक्य आहे.
भारतानं देऊकेलेली मदत ही
मोठ्ठा गैरसमज
३% ने दिलेत म्हणे.