नमस्कार मंडळी,
आज येथे देत आहे एक खास कोकणी पदार्थ - खांडवी. आमच्याकडे हा पदार्थ नागपंचमीच्या दिवशी करतात.

" alt="" />
साहित्यः-
१ वाटी तांदुळाचा रवा (इडली रवा)
२ वाट्या दूध
दीड वाटी गूळ
अर्धी वाटी ओलं खोबरं
आवडीप्रमाणे काजू, बदाम, बेदाणे यांचे तुकडे
प्रत्येकी अर्धा चमचा, वेलची पावडर, जायफळ, किसलेलं आलं
चिमूटभर मीठ.
कृती:-
एका कढईत तूप घालून त्यावर तांदुळाचा रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा. त्यात उकळते दूध घालून २ दणदणीत वाफा आणाव्यात. रवा चांगला शिजला पाहिजे, नसेल तर जरा दुधाचा हबका मारुन परत एक वाफ आणावी. आता त्यात गूळ मिसळून चांगले ढवळावे. त्यात काजू, बदाम, बेदाणे यांचे तुकडे तसेच वेलची पावडर, जायफळ, किसलेलं आलं मिसळावे. त्याचा शिर्यासारखा गोळा झाला की गॅस बंद करावा.
१ ताटाला तुपाचा हात लावून त्यावर तयार गोळा काढून घ्यावा आणि ताटभर सारख्या जाडीचा थापावा. त्यावर ओलं खोबरं पसरवून ते दाबून घ्यावे. आता आवडीप्रमाणे हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्यात. गार झाल्यावर वड्या काढून डब्यात ठेवाव्यात. ताज्या ताज्या असतानाच ताव मारावा. :)
हा पदार्थ नाजूक असल्याने फार टिकत नाही. एका दिवसातच संपवावा. वरील साहित्यात साधारण आकाराच्या २५ वड्या होतात.
--शाल्मली.

वाचने
5162
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाळ लाळ लाळ लाळ
ख ल्ल्ला स !!!
कधी भेटायचं?
मस्त मस्त
नविन पाकक्रूति
(विषय दिलेला नाही)
भन्नाट पाककृती आहे कुणी आयत
मस्त..
अरे वा!
अगगग! आले आले! पदार्थ तयार
मस्त !!!