फ्लॉवर मुगडाळ आमटी
फ्लॉवर मुगडाळ आमटी हा प्रकार अगदी सोप्पा त्यातुन वेगळी भाजी नको करायला आणि घरात सगळ्यांच्या आवडीचा त्यामुळे आठवड्यातुन एकदा तरि मी करतेच.
लागणारे साहित्य:
फ्लॉवर मोठे तुकडे करुन
मुगडाळ
बटाटा १ तुकडे करुन
फोडणी : राई, जिर, कढीपत्ता, हिंग, हळद, मसाला
मिठ चविपुरते
मोडून मिरची, कोथिंबिर
लिंबु रस छोटा अर्धा.
थोडा गुळ
तेल
हे काही आमटीचे सामान :
हे फोडणीचे सामान :
फोडणीचे सामान (कढीपत्ता) कंटीन्यु आणि धुतलेले फ्लॉवर्,त्यात आत गायब बटाटे आणि मुगडाळ:
तयार आमटीचा फोटो माझ्या कॅमेर्यातुनच गायब झालाय.
क्रमवार पाककृती:
प्रथम प्लॉवर, मुगडाळ, बटाता एकत्र धुवुन घ्या. आता गॅसवर टोप / कुकर ठेवा व त्यात तेलावर वरील फोडणी द्या. आता लगेच धुतलेल जिन्नस घाला. पटकन घाला नाहितर मसाला करपेल. मग त्यात उरलेले सगळे साहित्य घाला म्हणजे मिठ, गुळ, लिंबुरस, मोडलेली मिरची, कोथिंबीर. जर टोपात करत असाल तर हे सगळ आमटी शिजत आल्यावर घाला म्हणजे स्वाद चांगला येतो. कुकर असेल तर कुकरच्या ३ शिट्या द्या. झाली आमटी तयार.
अधिक टिपा:
ह्या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात. पण त्या घालायच्या असतील तर टोपातच करा. खरतर टोपातच ह्या आमटीचा स्वाद चांगला येतो.
तुम्हाला आवडत असल्यास आल लसुण पेस्ट, गोडा मसालाही घालु शकता.

अरे वाह!!! छान पाकृ.. करायला
+१
टोप म्हणजे काय? माझ्याकडे
In reply to टोप म्हणजे काय? माझ्याकडे by पर्नल नेने मराठे
पातेलं
In reply to टोप म्हणजे काय? माझ्याकडे by पर्नल नेने मराठे
पातेलेच हो.
तयार आमटीचा फोटो माझ्या
वा!! जागुतै, आमटीची वेगळीच
सोपी पाकृ
माया, चिंतामणी कॅमेर्याने