हॅ हॅ हॅ, हे मुंबईतले लोक म्हणजे! यांच्यासमोर हातच टेकले बुवा. आम्लेट खावा म्हणावं... आणि पाव तरी घ्या बरोबर
हा प्रजासत्ताक दिन मिपावर साजरा व्हायला हवाच... रोज बाय एनी नेम...
हेच म्हंतो, [जाहीर] साला वरील फोटुत रडाय सारख काय आहे साला? ([खाजगी] ह्या पर्याला हलकटाला बरे १०० प्रतिसाद खेचणारे फोटु मिळतात!)
बाकी सद्ध्याच्या भ्रष्ट देशात कुणीतरी झेंडा फडकवतो आहे हे विसरुन नुस्ता दिवस चुकला तर रडणार्यांचे प्रतिसाद पाहुन खेद वाटला ([खाजगी] पर्या लेका लक्षात ठेव, मी देतोय तितकेच प्रतिसाद पुढे माझ्या धाग्यावर मिळवुन द्यायचे आहेत तुला)
तो प्रजासत्तक दिन नाही ..
पण यावर जास्त काही लिहिण्याआधी ही चेपु वर वाचलेली एक कॉमेंट इथे देतो ...
ती जास्त सुचक आणि बोलकी आहे असे वाटते
काही अपरिहार्य कारणामुळे यंदा प्रजासत्ताक दिन १५ ऑगस्ट ला घेण्याचे कॉंग्रेस ने ठरवलेले आहे , तरी सर्व भाविकानी तिर्थ प्रसादासाठी ९ -३० ला उपस्थित रहावे .. तसेच स्वातंत्र्य दिनही पुढे ढकलण्यात आला असुन मॅडम ना ज्या दिवशी सवड मिळेल त्या दिवशी ठेवण्यात येईल
मुळ प्रतिक्रिया - मिलिंद शिंत्रे
=)) =))
यांच्यावर एक राष्ट्रदोहाचा खटला भरा ...
चलताय हो पेशवे.. बरेच जण रिक्षावाल्यांच्या/पुस्तक विक्रेत्याच्या आडमुठे स्वभावावरुन संपुर्ण पुण्याला नाव ठेवतात इथे तर चक्क मुंबईच्या खासदाराच(?) नाव बोर्डावर छापलय ;)
अस्सल मुंबईकराचे लक्षण म्हणजे कुणी मुंबईला एक शिवी घातली तर मुंबईकर आणखी दहा घालेल.
गर्दीला, उकाड्याला, असल्या पाट्यांना शिव्या दिल्याने त्याची अस्मिता दुखावत नाही. त्याचा जाज्ज्वल्य अभिमान सहसा उफाळून येत नाही. तो प्रकार पुण्यातच जास्त. असो.
काय यडपट लोक आहेत. येवढंही माहित नसावं?
अस्सल मुंबईकराचे लक्षण म्हणजे कुणी मुंबईला एक शिवी घातली तर मुंबईकर आणखी दहा घालेल.
खाजगीमध्ये पुणेकरसुद्धा घालतो. (म्हणजे पुण्याला / पुणेरी मानसिकतेला. मुंबईला तर घालतोच, पण ते सोडा.) फार कशाला, अनेक पुणेकर जाहीरसुद्धा घालतात. (पुण्याला / पुणेरी मानसिकतेला शिव्या.) पण म्हणून बाहेरच्यांकडून काय म्हणून ऐकून घ्यायचे?
त्याचा (मुंबईकराचा) जाज्ज्वल्य अभिमान सहसा उफाळून येत नाही. तो प्रकार पुण्यातच जास्त. असो.
ठीक. एक प्रयोग करून पाहू.
फाळणीच्या सुमारास मोठ्या शहरांच्या वाटणीत कलकत्ता शहर हे पाकिस्तानला मिळावे म्हणून मुस्लिम लीगने खूप निकराचे प्रयत्न केले, असे वाचल्याचे आठवते. (किंबहुना एका वेळी कलकत्ता पाकिस्तानला आणि त्याऐवजी लाहोर भारताला मिळाले असते तरी तेही लीगला एक वेळ चालू शकले असते, असेही कुठेतरी कधीतरी वाचल्याचे आठवते. या क्षणी नेमका संदर्भ हाताशी नाही. पण नेमके याउलट झाले. पण ते एक असो.) याला कारण, कलकत्ता हे मोठे आणि महत्त्वाचे बंदर आणि औद्योगिक केंद्र असल्यामुळे पाकिस्तानकरिता ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते, वगैरे वगैरे.
खरे तर मुंबई हेही मोठे आणि महत्त्वपूर्ण बंदर आणि औद्योगिक केंद्र आहे. आणि योगायोगाने मुंबईतील मुस्लिम वस्ती बहुसंख्येच्या जवळपासही नसली तरी बर्यापैकी मोठी आहे. (कलकत्त्यात तरी मुसलमानांची बहुसंख्या कोठे होती? २३% म्हणजे बहुसंख्या नव्हे. पण तरीही कलकत्त्यावर लीगचा दावा होताच ना?) शिवाय पाकिस्तानचा मुख्य भाग जे पश्चिम पाकिस्तान राहिले असते, त्याला मुंबई बर्यापैकी जवळही आहे आणि म्हणून अधिकच फायदेशीर राहिले असते.
एवढे सगळे असून आणि मुख्य म्हणजे खुद्द मोहंमद अली जीनांचे अर्धे करियर मुंबईत गेले असूनसुद्धा पाकिस्तानसाठी मुंबईची मागणी करावी ही साधी गोष्ट लीगला सोडा, खुद्द जीनांना सुचली नाही, त्यांच्या डोक्यातसुद्धा हे आले नाही, हे लक्षणीय आहे. (की कदाचित अर्धी करियर मुंबईत घालवल्यामुळेच मुंबई जीनांना नकोशी झाली होती? अनायासे टळती आहे भारतात, तर टळू द्या!)
आता, एवढे सगळे मी म्हणू लागलो, आणि असल्या तर्काच्या आधारावर* 'पाकिस्तानलासुद्धा नको असलेले शहर' म्हणून मुंबईची संभावना जिथेतिथे करू लागलो (आणि माझ्यापाठोपाठ आणखी पंचवीस जण** करू लागले), तर मुंबईकरांचा जाज्ज्वल्य अभिमान जागृत होऊन माझा गळा घोटायला ते येणार नाहीत काय?
(* मुळात या तर्काला आधार कितपत आहे, हा प्रश्न विचारायचा नसतो. एखाद्याची संभावनाच करायची झाली, तर त्यासाठी लढवलेल्या तर्काला आधाराची फारशी गरज नसते. काहीतरी तर्क - बहुधा स्वतःच्या समाधानासाठी - केल्याशी कारण. कन्क्लूजन अगोदरच काढलेले असले, की मग त्यामागचे लॉजिक कोणी फारसे तपासत बसत नाही. मग ज्याची संभावना करायची तो पक्ष त्याबद्दल कितीही शंख करो. पुण्याच्या बाबतीतसुद्धा काहीसे असेच होत नाही काय?)
(** एक जण म्हणू लागला की त्याच्याच पार्टीतले पंचवीस जण म्हणू लागायला फारसा वेळ लागत नाही. कारण शिव्या घालण्याचे उद्दिष्ट महत्त्वाचे असते, त्यामागची कारणमीमांसा महत्त्वाची नसते. मग पंचवीस जणांना कारणमीमांसा सांगण्याचीही गरज राहत नाही. पंचवीस जणांचे उद्दिष्ट साध्य होत असेल तर कारणमीमांसा अगोदरच पटलेली असते, मग ती कितपत बरोबर आहे किंवा मुळात काय आहे हे माहीत नसले तरी.
शिवाय, 'An oft-repeated lie soon becomes the Gospel Truth' अशा धर्तीवरचे काहीतरी गोबेल्समहर्षी म्हणून गेलेलाच आहे.)
+१
शब्दाशब्दाशी सहमत!
-- (त्या '२५' मधला एक) असुर
एक अवांतर प्रश्न : जे १९४७ साली दिलंय, ते परत घ्यायची वेळ आता तरी आली आहे काय?
-- (आसेतुहिमाचल अखंड हिंदुभुमीचा रहिवासी) असुर
अभिमान वगैरे ..................................................शिवाय, 'An oft-repeated lie soon becomes the Gospel Truth' अशा धर्तीवरचे काहीतरी गोबेल्समहर्षी म्हणून गेलेलाच आहे.)
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ !!!
जरा उकलुन सांगाल काय ?
हो हो. मुंबई हे पाकिस्तानलाच काय पण अफगाणिस्तान, इराण, इराक, नेपाळ, चीन, बांग्लादेश, म्यान्मार आणि श्रीलंका यांनाही नकोसे असणारे शहर आहे. अगदी खरे हो. काही अर्थ नाही या शहरात!
दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पुण्याला वाचवा माहिती प्रमाणे तुमच्या कडे पण लोंढे च्या लोंढे कोसळतायत. (ममता बनर्जी) पुण्याचे मुंबई व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईच्या जवळ असणारे हे शहर पण बिहारीबाबू घाण करतील. नाहीतर हूप हूप करीत नावाप्रमाणे नुसत्या माकडउड्या मारत बसाल.
आठवणीप्रमाणे, पंतप्रधान झाल्यावर पहील्याच वर्षात राजीव गांधींनी हा गोंधळ घातला होता.
बाकी माझे लक्ष एक राजकीय पक्ष जाहीर निवेदन करत झेंडावंदन करतो आहे याकडेच जास्त गेले आणि आनंद झाला! किमान पहीली पायरी गाठली आहे. ;)
कोणा एका राजकिय पुढार्याच्या चुकीसाठी संपूर्ण मुंबईकरांचा उद्धार सुरु आहे हे मात्र योग्य नाही... नसेल कळले त्या राज्किय पुढार्याला त्यात आम्हा मुंबईकरांचा काय दोष?
बिहारमधील एक अशिक्षीत माणुस आहे तो असं समजुन चुक दुर्लक्षीत करावी....
मुंबईकर - पुणेकर - बिहारी - भैय्या - मराठी :-(
१५ ऑगस्टला दोन दिवस आहेत इकडे अजुनही असाच भेदभाव करत रहाणार?
१९८२ मधे मनमोहन देसाईने साद घातली होती सगळ्यांना अमिताभ- महंमद रफीकरवी
कोणा एका राजकिय पुढार्याच्या चुकीसाठी संपूर्ण मुंबईकरांचा उद्धार सुरु आहे हे मात्र योग्य नाही... नसेल कळले त्या राज्किय पुढार्याला त्यात आम्हा मुंबईकरांचा काय दोष?
(१) भारतात लोकशाही आहे.
(२) लोकशाहीत खासदार किंवा अन्य राजकीय प्रतिनिधी हे लोकनियुक्त असतात.
(३) लोकनियुक्त प्रतिनिधी आपल्याला निवडून देणार्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात. (मग अशा व्यक्तीने संबंधित प्रतिनिधीस मत दिले असो वा नसो, अथवा मतदान केले असो वा नसो, अथवा मतदानास पात्रही असो वा नसो.)
(४) नुकत्याच हाती आलेल्या माहितीप्रमाणे, मुंबई हे शहर अजूनही भारतातच आहे.
पण तरीही आपले म्हणणे बरोबर आहे. समस्त मुंबईकरांचा उद्धार करणे हे या परिस्थितीत चूकच आहे. संबंधित खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघाचा (वरील (३)ला अनुसरून) उद्धार करावा फार तर.
१५ ऑगस्ट हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे असं तिथं कुठंही लिहीलेलं नाही. त्यांनी फक्त एवढंच लिहिलय की प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांना फक्त सात महिने उशीर झाला आहे असं वाटतंय. पुढच्या २६ जानेवारीला ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम नक्की करणार असावेत.
(भलत्या वेळेला भलतं करण्याची सवय मुंबैकराना आहे हे कदाचित यावरुन पुन्हा सिद्ध होईल.)
(पोलिटीकली करेक्ट) नगरीनिरंजन
२६ जानेवारी १९५० च्या नंतरच्या प्रत्येक २६ जानेवारीला 'प्रजासत्ताक दिन' असतो का प्रजासत्ताक दिनाची अॅनिव्हर्सरी (मराठी शब्द?) असते?
हाच बोर्ड पुण्यात लागला असता तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या?
>>'प्रजासत्ताक दिन' असतो का प्रजासत्ताक दिनाची अॅनिव्हर्सरी (मराठी शब्द?) असते?
हाहाहा! आपल्या वाढदिवसाला आपण 'जन्मदिन' समजता की जन्मदिनाची अॅनिव्हर्सरी ? ;)
१५ ऑगस्ट हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे असं तिथं कुठंही लिहीलेलं नाही. त्यांनी फक्त एवढंच लिहिलय की प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांना फक्त सात महिने उशीर झाला आहे असं वाटतंय. पुढच्या २६ जानेवारीला ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम नक्की करणार असावेत.
(भलत्या वेळेला भलतं करण्याची सवय मुंबैकराना आहे हे कदाचित यावरुन पुन्हा सिद्ध होईल.)
(पोलिटीकली करेक्ट) नगरीनिरंजन
त्यांनी फक्त एवढंच लिहिलय की प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांना फक्त सात महिने उशीर झाला आहे असं वाटतंय.
असे कसे? मग 'मुंबईकराच्या हाताला घड्याळ बांधलेले नसून घड्याळाच्या काट्यांना मुंबईकर बांधलेले असतात' अशा आशयाचे वाक्य भाईकाकांनी लिहिलेच कसे? (संदर्भः 'काही अप, काही डाऊन', संग्रहः 'हसवणूक'. वाक्य शब्दशः मुळाबरहुकुम नाही, मात्र आशय तोच आहे. गरजूंनी मूळ वाक्य पडताळून खात्री करून घ्यावी.) भाईकाकांना काय कळतबिळत नव्हते की काय?
इतकी दिरंगाई मुंबईकरांकडून अपेक्षित नव्हती. हे पुण्यात झाले असते तर गोष्ट एक वेळ समजण्यासारखी होती - शेवटी पुणेकरच ते, दिरंगाई ही चालायचीच. वेळच्या वेळी कोठले काम कधी पुणेकराने केलेय? दुपारची वामकुक्षी पूर्ण करायची सोडून प्रजासत्ताक दिन वेळच्या वेळी साजरा करण्यासाठी उठेल तो पुणेकर कसला? वगैरे वगैरे. पण मुंबईत?
मुंबईचे नाव बदलून आख्ख्या बृहन्मुंबईस पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करावे काय?
जोरदार प्रयत्नांबद्दल पंगाभाऊंना नक्कीच काहीतरी मेडल वगैरे द्यायला पायजे या प्रजासत्ताक दिनी! काही ठेवलं नाही - तीन चार छोटे छोटे प्रतिसाद पण देऊन बघितले (लांबलचक नेहेमीप्रमाणे कोणीच वाचले नसतील म्हणून) पण फुसकेच निघाले हो बार! कोणी मुंबईकर खवळून वगैरे उठले नाही. आहेच आमची मुंबई रद्दड, नकोच होती पाकिस्तानला. तुम्ही म्हणताय का देऊन टाका म्हणून? अहो, पाकिस्तानला जाऊ देत, गुजरातला सुद्धा दिली नाहीत...
मुंबईचे नाव बदलून आख्ख्या बृहन्मुंबईस पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करावे काय?
जरूर करा की. तसं केल्याने काय पुणेकर मुंबईत राहायला येत नाहीत ना? मग मुंबईकरांचं काय बिघडतंय?
बरं शिवाय मग ही पाटी आणखीन एक पुणेरी पाटी म्हणून खपेल, ते वेगळंच.
आहेच आमची मुंबई रद्दड, नकोच होती पाकिस्तानला. तुम्ही म्हणताय का देऊन टाका म्हणून?
अहो मी देऊन टाका म्हणून काय होणारेय? घेणार्याने घेतली पाहिजे ना! इथे घेतेय कोण? (शिवाय घेतलीच चुकून, तर मुंबईकरांसकट घेणारेय काय? किंवा मुंबईकरांसह घेतली, तरी मुंबईकर जाणारेत काय? म्हणजे पुन्हा मुंबईकरांना स्वतःच्या दारी झेलणे आले. पिंपरी-चिंचवडला 'यूएसए' वसवण्यापेक्षा मुंबई भारतात राहिलेली परवडली.)
अहो, पाकिस्तानला जाऊ देत, गुजरातला सुद्धा दिली नाहीत...
गुजरातची हरकत नसेल तर माझे व्यक्तिशः काहीच म्हणणे नाही*. पण मग तुमचेच 'सुंदर-मुंबई-मराठी-मुंबई-महापौर-मुंबई**'वाले पेटतात.
* उलट मुंबईविना विभक्त महाराष्ट्र - किंवा सध्याच्या महाराष्ट्रात अनेक छोटीछोटी प्रादेशिक राज्ये - झाली तर उत्तमच. मग मुंबईकरांनी कोणत्या गटात सामील व्हायचे ते आपले आपण ठरवावे. आमच्यात यावे असा आग्रह नाही. उलट नकोच.
** अशी पाटी मुंबईत पाहिलेली आहे.
जरूर करा की. तसं केल्याने काय पुणेकर मुंबईत राहायला येत नाहीत ना? मग मुंबईकरांचं काय बिघडतंय?
अहो ठेवलेय काय त्या मुंबईत? पूर्वी आयटीवाल्यांना परदेशी जायच्या संधीसाठी केवळ स्टेपिंग स्टोन म्हणून मुंबईची गरज असायची. कारण बाहेर पाठवणार्या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या मुंबईतच असत म्हणून. मग त्यासाठी नाइलाजास्तव आपापल्या संधीची वाट पाहत मुंबईत ताटकळत कसेबसे राहत - नाहीतर बाहेरून येणार्या आणि मुंबईत स्वतःचे घर नसणार्या माणसासाठी नव्याने स्थायिक होण्याच्या दृष्टीने मुंबई अत्यंत निरुपयोगी (पक्षी: यूसलेस)! (आमच्या एका अशाच आपल्या संधीची वाट पाहत मुंबईत ताटकळत राहिलेल्या तत्कालीन - आणि बाय द वे हैदराबादी - मित्राकडून ऐकलेले, 'मुंबई ही एखाद्या वेश्येसारखी. तिच्याबरोबर झोपावे, हवे तितके झोपावे. पण तिच्याशी लग्न कधी करू नये.' हे मत चिंत्य आहे. ही गोष्ट साधारणतः १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धातली. तेव्हा हैदराबादला आयटी इंडस्ट्री फोफावलेली नव्हती.) पण आता असे मुंबईवर अवलंबून राहावे लागण्याइतकी परिस्थिती राहिली आहे असे वाटत नाही. मुंबईला अनेक पर्याय - काही पुण्यातसुद्धा! - उपलब्ध आहेत असे वाटते.
आयटीखेरीज अन्य क्षेत्रांत, मुंबईत राहावे लागण्याइतकी मुंबईवर अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती पुण्यात तेव्हासुद्धा सर्रास होती असे वाटत नाही.
तेव्हा, पुण्यात स्वत:चे राहते घर आणि बर्यापैकी नोकरीधंदा असलेला मनुष्य सध्याच्या काळात उठून मुंबईत राहायला कशाला झक मारायला जाईल?
उलट मुंबईकर मात्र पुढेमागे पुण्याला येऊन स्थायिक होण्याचा विचार मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. परांजप्यांच्या पुण्यातल्या अनेक स्कीम्स केवळ मुंबईकरांच्या जिवावर खपल्या, असे कळते. असो.
बरं शिवाय मग ही पाटी आणखीन एक पुणेरी पाटी म्हणून खपेल, ते वेगळंच.
छ्या:! ती क्वालिटी नाही. मुंबईकरांच्या पाट्या म्हणजे फार फार तर 'सुंदर मुंबई, मराठी मुंबई, महापौर मुंबई' इतपतच. याहून अधिक विनोदी पाट्या काढणे ही मुंबईकरांच्या बस किंवा लोकलची बात नाही.
मुंबईकरांना उचकवायला गेलं की स्वतःच उचकायला होतं हे अठरा इंची काळ्या-पांढऱ्याच्या विविध छटांनी नटलेला प्रतिसाद देऊन सिद्ध केलंत, यातच सगळं पोचलं. धन्यवाद.
।।मुंबादेवी प्रसन्न।।
नशीब समजा, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन ह्यापैकीच एक निवडलंय..
नाहीतर, 'ड्रायडेनिमित्त..' अशी मुक्ताफळंही येऊ शकली असती की. ;)
बाकी, "हे आकाशातल्या प्रभु, माझ्या मेंढपाळा, तुझ्या ह्या वेड्या कोकरांना क्षमा कर. का, की ते काय करत आहेत हे त्यांनाच कळत नाही....आमेन!" एव्हढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो.
गॉड ब्लेस यु.
-फादर धमाल दि ब्रेटो.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यां नेमका काय फरक आहे?
>>
कोणीतरी चपला द्या रे मला !! (माझ्या चपलीची अंगठ्याची बक्कल तुटली आहे ) निघालो मी आंतरजाल सोडुन !!
@ सुनील,
खालील लिंक वरील माहिती पहा:
स्वातंत्र्य दिन: http://en.wikipedia.org/wiki/Independence_Day_(India)
प्रजासत्ताक दिन: http://en.wikipedia.org/wiki/Republic_Day_(India)
(एखाद्या सदस्याने आपली शंका विचारली तर त्याचा अपमान होऊ नये असे मला वाटते.)
...म्हणून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्ही हलवून २५ डिसेंबरला ठेवावेत काय?
(पाकिस्तान उलटा लावते म्हणून आपल्याच झेंड्याचे डिज्जायन बदलण्याच्या धर्तीवर?)
पुणेरी पाट्यांप्रमाणे असे बोर्ड गल्लोगल्ली दिसत नाहीत यार. पुणेरी पाट्या आणि मुंबईतील बोर्डात हा फरक आहे. असाही पुणेरी पाट्यांना मी नावे ठेवत नाही........त्या पाट्या कितीही स्ट्रेंज वाटल्या तरी ........कारण अशा पाट्या लावतात म्हणजे काहितरी लॉजिक असणार हे नक्की. असो.
स्वातंत्र्यदिन = ब्रिटिशांच्या कडक कायदा व सुव्यवस्थेपासून नेत्यांची सुटका
आणि प्रजासत्ताकदिन = अजासत्ताक दिन कारण या प्रजेला हल्लीच्या नेत्यांनी, अज = बकराच केले आहे.
प्रतिक्रिया
प्रजासत्ताक
हेच म्हंतो, [जाहीर] साला वरील
नाही
हा मुंबईचा विक्षीप्तपणा
चलताय हो पेशवे.. बरेच जण
त्या पाटी वरचे एक महाशय
पुलंचे उत्तर
अभिमान वगैरे
+१
अभिमान वगैरे
मुंबईकराची प्रतिक्रिया
माकडउड्या
या विनोदी प्रयोगातून काय
आठवणीप्रमाणे
बिहारमधील एक अशिक्षीत माणुस आहे तो असं समजुन चुक दुर्लक्षीत करा
पाटी लावणारी दोघेही नम्र
अरेरे
असेच म्हणते....
दोष
१५ ऑगस्ट हा भारताचा
॥ ... ॥
हेच स्वातंत्र्यदिनाबद्दलही
>>'प्रजासत्ताक दिन' असतो का
"वाढ"दिवस समजतो. त्यामुळे
योग्य काय?
१५ ऑगस्ट हा भारताचा
असे कसे?
जोरदार प्रयत्न
काही जमले नाही बुवा!
अरे काय विषय काय, काय चाललंय
वा
उचकायला?
राजकिय लोक असाच घोळ घालत
हॅ हॅ हॅ!!!
@ ध मु
फरक काय?
खल्ल्लास!
क आणि ह आणि
स्वातंत्र्यदिन आणि
मेल्लो...................
@ सुनील, खालील लिंक वरील
डोळ्यांचे पारणें फिटलें हों !!
यावर उपाय...
पुणेरी पाट्या आणि हा बोर्ड ह्यातील मुलभुत फरक....
प्र.का.टा.आ
संतापाने अंगाचे लाही लाही होत आहे
अर्र, तुम्ही प्रजासत्ताकच दीन
अ कारान्त शब्दाचा उपांत्य शब्द दीर्घ असतो
माझ्या मते
(विषय दिलेला नाही)
Pagination