का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे?
कोण अज्ञातातुनी निर्यातले काहूर आहे?
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की!
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?
दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे?
बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे
गीत जे तो गात आहे बेसुरे आहे खरे ते
(शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे)
पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2583
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो कुणी माझ्यातला तो
आरती प्रभु/पाडगांवकर
In reply to तो कुणी माझ्यातला तो by शरद
मस्त !
छान
मस्त...
आवडली
आवडली. थोडा दीर्घ प्रतिसाद
आवडली
आवडली
मस्तच.....!
कविता
छान!
सर्व वाचकांचे आभार
वा .. गजल आवडली.
खूप आवडली.
तेवणारी ज्योत नाही तो
In reply to खूप आवडली. by राघव
सुंदर गजल!
सुरेख