Skip to main content

वरंधा घाट

लेखक येडाखुळा यांनी गुरुवार, 12/08/2010 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता. पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं? तिथे जाऊन आम्ही नुसती धमाल केली. आमच्या साथील हे देखील होते...नंतर आमच्या मानव चेष्टा पाहून त्यांनीही काढता पाय घेतला. काही जण गाडीचे निरिक्षण करण्यात दंग झाले होते. आणि त्यांचं आवडतं खाद्य आम्ही त्यांना पुरवत होतो, त्यामुळे मस्त पोझेस सुद्धा देत होते. हा शिलेदार पहा... हिरवीगार शिवारं.. कितीही वेळा इथे या...दर वेळी निसर्ग नवीच कमाल दाखवतो... जय जय रघुवीर समर्थ! धबाबा आदळे तोय... या शनिवारी कदाचित पुन्हा जाणार आहे..( पुन्हा तेच तेच फोटो टाकणार नाही, काळजी नसावी ) अवांतर : राजगड ते शिवथर घळ जायचा योग कधी येणार???
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10369
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

आषाढ-श्रावण यंदा जोरदार दिसत आहेत. अशी नयनरम्य प्रकाशचित्रे पाहून निदान या घाटांसारख्या काही ठिकाणी ते दरवर्षीच तसे असतील, यात शंका नाही. (ओलाचिंब)बेसनलाडू

सर्वच फोटो जबरा.. शेवटचा तर खासच.

फोटो खरच खुप छान आहेत... पहिला फोटो खुप आवडला.....

In reply to by शिल्पा ब

वरंधा घाट भोर आणि महाडच्या मधे आहे; रंधा धबधबा भंडारदरा धरणाच्या जवळ आहे, नगर जिल्ह्यात! (लिंक दिसावी म्हणून रंगकाम केले आहे.)

शेवटचा फोटो तर वॉलपेपरच वाटतोय

येडाखुळा! पार येडा अन खुळा करून टाकलंस राव! बाकी शिवथर घळीचं पाणी कमी झाल्यासारखं वाटलं.. एकदम सुरवातीला गेला होता का? त्या धबाब्याच्या खाली एक झाड होते ते आहे का अजून? (फोटोत दिसले नाही)

In reply to by ऋषिकेश

शिवथर घळीचं पाणी कमी नाही झालेलं. ते कंट्रोल केलंय वरती बांध घालून. गेल्याच महिन्यात जाउन आलो.

शेवटच्या फोटो मध्ये धबधबा शंकराच्या जटांसारखा दिसतो आहे. इव्हन सगळ्यात वरचा फोटो पण अतिशय सुन्दर! थँक्स टु कलादालन ट्रेकिंग सुटुन इतके दिवस झाले पण नयन सुख मात्र तस्सच राहिल.

ऋषिकेश , गेल्या जुलई महिन्यातले फोटोज आहेत. झाडाचं काही समजलं नाही. आता या वेळी नीटपाहतो.

पावसाळ्यातला सह्याद्री हा माझा एक वीक पॉईंट आहे. इतके पर्वत बघूनही ह्याची सर येत नाही असे वाटते. सुरेख फोटो. आभारी आहे. >>कितीही वेळा इथे या...दर वेळी निसर्ग नवीच कमाल दाखवतो... १००% सहमत!