शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.
बीजिंग ओलम्पिक (८/८/८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर,
शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०, १ मे ला जगासाठी खुले झाले, जगातील १७५ पेक्षा जास्त देशांनी भाग घेतला आहे. हंग्पू नदीच्या काठी, ५ पेक्षा जास्त चौरस किलोमीटर मध्ये बसलेले हे प्रदर्शन जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. चांगले (कि सुंदर ?) शहर, चांगले जीवन (BETTER CITY, BETTER LIFE) ह्या तत्वावर असलेल्या ह्या प्रदर्शनाच्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीत जगभरातून अंदाजे ७ करोड लोक भेट देतील अशी चीन ची अपेक्षा आहे. ह्या प्रदर्शनाची तारीफ करावी तेवढी कमीच.
प्रदर्शनाचे अधिकृत संकेत स्थळ :
मागे माझ्या एक मित्राने सहकुटुंब ह्या प्रदर्शनास भेट दिली. त्याने काही काढलेले फोटो (त्याच्या सहमतीने) डकवत आहे.
जागतिक प्रदर्शन १
जागतिक प्रदर्शन २
जागतिक प्रदर्शन ३
जागतिक प्रदर्शन ४
त्याच्या कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रदर्शन एकदम झक्कास आहे. खूप गर्दी असते, त्यामुळे दिवसभरात ३-४ च विभाग (नावाजलेल्या देशांचे) पाहून होतात. सर्व देशांनी उत्तम कलाकुसरी तसेच आपापले तंत्रज्ञान दाखविण्याचा प्रयत्न केला आहे (भारत वगळता).
भारताने जे प्रदर्शन जगापुढे ठेवले आहे ते बघता आपले प्रदर्शन किती दरिद्री आहे हे आपणास प्रत्यक्ष बघितल्यावरच कळेल. (अशी काही उदाहरणे दिली आहेत त्यांनी कि ती इथे सांगणे ठीक नव्हे).
चक्क धंदा मांडला आहे काही ठिकाणी. तंदुरी काय, सामोसे काय, ररस्त्यावर जसे विकायला ठेवतात तसे ठेवले आहे. नट नट्यांचे फोटो, मुर्त्या, योगा दाखविणारी मंडळी ते व्यवस्थित करत नव्हती, एखाद्या नवख्या प्रमाणे सारखा तोल जात असे त्यांचा. बाकी आपल्या पाटलीन बाई सुद्धा जाऊन तारे तोडून आल्या तिथे.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर पाकिस्तानचे प्रदर्शन सुद्धा चांगले होते भारतापुढे.
बाकी वरील फोटो चघळता चघळता हे लेख देखील तोंडी लावणे.
शांघायचा सामोसा!
India's shoddy samosa & shawl show at Shanghai World Expo
प्रतिक्रिया
लोकसत्तातला लेख वाचल्यावर आणि
असं
हम नही सुधरेंगे... हे सगळं
>> राष्ट्रभावना आहे का
लोकशाही एक अतिसामान्य समाज
गांधीवादी असे आदर्श सदस्यनाम
माफ करा.
काहीही चुकले नाही
अगदी थोडक्यात सांगायचे झाले
मला आवडले
+१
+२
मलासुद्धा देवनागरीत लिहिलेलं
खर्च