महाभारत
टू,
संपादक मंडळ.
हा लेख थोडा जरी असभ्यते कडे वळणारा वाटला तर खुशाल काढून टाकणे. ही माझ्या आयुष्यातली घटीत घटना आहे.
महाभारत.
मंडळी, पुस्तकी भाषेपेक्षा बोली भाषा कशी श्रेष्ठ आहे याच कालच एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर घडल.
कधी कधी अशी काही विदुषकी समस्या आपल्यासमोर उभी राहते की सांगताना स्वत:चा अन दुसऱ्याचा आब राखून कस बोलाव असा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा रहातो. पण यातून तोड निघते ती आपल्या खेळकर बोलीभाषेतून. अगदी हसत हसत दुसऱ्याची चुक त्यालाही तेव्हढंच हसवत सांगावी तर या 'बाजीराव' भाषेतच!
बघा केव्हढ विषयांतर झालं !
तर महाभारत.
महाभारत हे एक प्राचीन एपिक आहे, आणि ते भारतात लिहिल गेलं आहे याचा आपण सर्वांना अभिमान ही वाटतो.
पण हा एव्हढा उच्च दर्जाचा ग्रंथ लहाणांसाठी कितीही सोपा करून लिहायचा प्रयत्न केला तरी ते अशक्यप्राय आहे. अहो मुळची कथाच एव्हढी 'घनगंभीर' आहे ती सोप्पी सोप्पी अशी किती सोप्प्प्पपी करणार? या सोप्पी करण्याच्या भानगडीत आधीच 'सोपी' ( soapy ) असलेल्या त्या कथेवरून आपण घसरुन पडायचीच शक्यता जास्त !
तर सांगायचं म्हणजे आम्ही लहाण होतो. एकदम भरगच्च एकत्र कुटुंब! काका , काक्या , चुलत भावंड असा मोठ्ठा पसारा! म्हणजे बघा चार भाऊ, त्यांच्या प्रत्येकी एक पकडून चार बायका, अन मग ही उतरंड चिल्ल्या पिल्ल्यांवर जवळ जवळ प्रत्येकी डबल वां तिबल पकडा. घरात टेबल खुर्च्या अन पितळी फुलांचे पाट हे दोन्ही भोजन व्यवस्थेत अजून वापरले जात होते. अन टी व्ही नावाचा भान हरपवणारा प्रकार फक्त मुंबै व दिल्लीत असतो हे ऐकून माहिती होत.
मला वाटतंय उन्हाळ्याची वां दिवाळीची अशी सुट्टी असावी, कारण घरात चार आत्या त्यांच्या चार मामांसह आपापली उतरंड घेवून उपस्थित होत्या. मी अगदी लहाण होते. साधारण पाच वर्षाची वां सहा म्हणा! वाचायला मी कशी काय जाणे, पण फार म्हणजे फारच लवकर शिकले होते. कदाचित घरात एव्हढ्या सगळ्या भावंडांना जे काही शिकवलं जाई ते ऐकून ऐकून असाव, पण वाचन एकदम फर्डा !
शाळेत मास्तर जेंव्हा सगळ्यांना वाचायला शिकवत, तेंव्हा मला हात जोडून 'गप्प रहा' म्हणून सांगत.
पण पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचायला येत म्हणून ते सार समजतच असं नाही ! मग जे काही समजत नाही ते विचारायचा प्रयत्न ! बहुतेकदा 'गप्प बस' असा ओरडा ही मिळायचा.
तर अश्याच एका दुपारी आम्हा बच्चे कंपनीची जेवण झाल्यावर, बाकी सारे काही बाही udyogan मध्ये रमून गेले. माझ्या हाताला मात्र एक छोटस , ते नाही का साधारण दोन रुपयान पर्यंत मिळायचं? तसलं ,कदाचित "महाभारतातल्या कथा" वां असच काही तरी; पण महाभारताच्या कथा लहाणांना सुलभ करून सांगणारे पुस्तक लागल.
वाचनाचा झपाटा असल्यान, आणि , ते फुकट आरडा ओरडा करून घेण्या ऐवजी असं अद्र्श्य होता येत असल्यान मी बघता बघता त्यात रमून गेले.
कुंती पंडू सह वनात गेली , ठीक आहे . तिला देवांच्या वरान तिन पुत्र झाले ठीक आहे. मग माद्रीला पण झाले. मग राजा मेला....च च .. वारला. माद्री सती. कुंती परत हस्तिना पूर... वाईट्ट दुर्योधन..माझ्या एखाद्या मोठ्या भावासारखा..ठीक आहे.
मग लाक्षागृह , बकासुर, खांडव वन इथ पर्यंत भाषा तशी सोपी वाटली म्हणजे फारसा प्रश्न नाही पडला , पुढे मागे जे संदर्भ होते ते धरून उमजत होत. शेवटी आल युद्ध ! आता इथ मात्र माझी गाडी अगदी कर्णाच्या रथ चक्रा सारखी अडली. प्रसंग होता दु:शासन वधाचा! तो पर्यंत कदाचित मला पण वीरश्री चढली असावी ! तर भीमाने त्या अतिशय अतिशय वाईट्ट दु:शासनाचे वक्षस्थल फोडून त्यातले रक्त तो गटागटा प्याला इथे माझी गाडी अडली! आता पर्यंतच्या सहा वर्षाच्या आयुष्यात हा शब्द नव्हता आला हो ! अगदी भीमा शप्पथ! त्यान कहि तरी फोडलं अन रक्त प्याला, पण नक्की काय? कसा त्या दुष्ट दु:शासनाला त्रास झाला असेल हे समजून घ्यावास वाटल.
झालं!! निघाले अस्मादिक विचारायला! आता प्रसंग असा... स्वयंपाक घरात सारे जण पाटावर बसलेत सारे म्हणजे मोट्ठे . आम्हा बच्चे कंपनीला खायला घालून ही मंडळी आरामात जेवून ताटावर तशीच पाय बाजूला सोडून निवांत गप्प मारीत होती. किती जण? चार चक सोळा! अन अस्मादिक स्वयंपाक घराच्या उंबऱ्यावर !!
मी आमच्या पिताश्रींना अगदी बाल सुलभ बेधडकपणे विचारलं, 'पप्पा वक्ष स्थल म्हणजे काय?"
काय सांगू तुम्हाला? एव्हढ्या लहानपणी घडलेला प्रसंग पण त्या वेळच्या त्या सारया मोठ्ठ्या मंडळींच्या रिअक्शनन तस्साच्या च्या तसा माझ्या डोळ्या समोर आहे. सारे अवाक ! हातातले घास, हातात! तोंडातले वाक्य तोंडात ! साऱ्यांचे चेहरे असे बदलले की मला शंभर टक्के खात्री पटली ' आज आपल काय खर नाही'. बर पण आपण असं काय विचारलं म्हणून ही एव्हढी अश्शी रिअक्शन उमटावी हे ही समजेना !
आज आठवल की वाटत त्या भर सभेत मी काय अवस्था केली सगळ्यांची !! अहो तिथे सारे बहिण भावंड, वहिण्या नणंदा, अन घराचे मेहुणे पाहुणे होते की हो !! अन अस्मादिक त्या दु:शासनाच्या काळजीत?
शेवटी कसा बसा पप्पांना कंठ फुटला, त्यांनी विचारलं ' कुठ वाचलास हा शब्द ?'
आता हा प्रश्न विचारण्याच कारण अस्मादिक हाताला जे लागेल ते वाचतात अशी आमची ख्याती होती. काय वाट्टेल ते समोर दिसलं की वाचलं हा अस्मादिकांचा खाक्या !
मी पाच सहा वर्षाच्या पोराला वां पोरीला म्हणा जमेल तेव्हढ्या निरागसपणे सांगितलं ' हे इथ, भीमान दु:शासनाचे वक्ष स्थल फोडून रक्त प्याला असं लिहिलंय'.
सारे जण जे जे काय समोर होत त्यात पडलेले मला अगदी लख्ख दिसले.अडकलेले श्वा:स मोठ्यान सुटलेले ही दिसले. चला म्हणजे मार नाही तर? मग पप्पांनी अगदी हसऱ्या चेहऱ्यान मला," अग त्याची छाती फोडून, ते रक्त तो प्याला" असं सांगितलं.
आज मला विचाराल तर माझी पोर 'विन्ग्लीश' मध्ये म्हाभारत वाचात्यात, तवा हे मी जे पेरून ठेवलय ते माझ्यासमोर उगवायची भिती या विन्ग्लीश मूळे टळली आहे म्हणायला हरकत नाही.नसावी .
प्रतिक्रिया
वक्षस्थळाचे महाभारत गमतीदार
>>आता मुलांना शिकवताना अक्षय
:-)
वाचनप्रेम
मजेदार आठवण.
:-)
>बाकी वयाच्या पाच/सहाव्या
हाहा
माझा परक्रम`
मी असेच प्राथमिक शाळेत असताना
पण त्याचा अर्थ काय?
संकृत-मराठी शब्दकोशाप्रमाणे
ओह..!!!
हा हा हा, मजेशीर अनुभव
हा हा हा !
एकेक धमाल किस्से आहेत
वीर्यचा एक अर्थ "शौर्य" असाही
भलताच अर्थ
वीर्यवान
हाहाहा ....गमतीदार
फारच अवखळ / निरागस किस्सा
सह्ही. लय भारी किस्सा आहे.
"लाक्षागृह"