दोन मिनिट... :-)
अमित, मी पंडित काकुंकडे चालली आहे. दोन मिनिटात येत्ये! तेवढ्यात दूध वर आले तर गॅस बंद कर!" असे सांगून आई गप्पा मारायला गेली, तिचा दोन तास झाले तरी पत्ता नाही. आमच्याकडे हे असे नेहमी घडते. आईचे दोन मिनीट कधी संपतच नाहीत. "केवढा वेळ लागला तुला!" ती परत आल्यावर मी नाराजीने म्हणालो. "अरे त्याना लग्नात मिळालेल्या साड्या दाखवत बसल्या त्या. बराच वेळ गेला त्यात". एकूण आपल्या लोकाना वेळेची काही किम्मत नाही. मी व्यथीत झालो. आपला देश कधी सुधारणार? छे! दोन मिनिटे म्हणे! मराठीत "दोन मिनिटे" हे नुसते दोन शब्द नसून तो एक वक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ "मला कितीही वेळ लागू शकतो" असा समजावा. दोन मिनिट असे म्हणून दोन मिनिटात होणारी एकच गोष्ट मला ठाऊक आहे. ती म्हणजे म्यागी नूडल्स. मी ठरवले की ह्या वाक्प्रचारावर मौलिक संशोधन करावे. म्हणजे ह्याचा पहिला प्रयोग कुठे झाला? त्यानंतर तो कोणी कोणी आणि किती किती वेळा वापरला ई. त्यातून मला अतीशय धक्कादायक माहिती मिळाली. ती १००% खरी आहे.
"दोन मिनिट" ह्याचा सर्वप्रथम उपयोग रामायणात झाल्याचा दाखला आहे. तो प्रसंग असा.
"अहो! तो सुवर्णमृग काय छान आहे ना! मला त्याच्या चामड्याची चोळी पाहिजे बाई! आणा की त्याला पकडून!" सीता.
"तुला काय करायची ही असली चोळी? आपण बरे आणि आपली वल्कले बरी!" राम (तो त्यावेळी अयोध्याटाईम्स वाचत होता.) "सारखं मेलं ते पेपर वाचत असता". सीता.
"आता अरण्यात अजून काय करणार?" राम.
"हुं! लग्नाच्या आधी मारे शिवधनुष्य तोडलंत. आता मेलं एक हरीण नाही मारता येत!" सीता रागावून म्हणाली.
"काय कटकट आहे!" असे म्हणून राम उठला आणि लक्ष्मणाला म्हणाला "जरा पर्णकुटीचे संरक्षण कर. मी आलोच दोन मिनिटात" अशा पद्धतीने तो सुवर्णमृगाची शिकार करायला बाहेर पडला. त्यापुढील रामायण सर्वाना माहीत आहेच.
ह्याचा लिखित पुरावा आहे आमचाकडे. गरजूनी पडताळून पहावा. (आम्ही मी चे आम्ही झालो हा सूक्ष्म फरक चाणाक्ष वाचकानी ओळखला असेलच. वाङमयीन संशोधक मी नसून आम्ही असा शब्दप्रयोग करतात त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे वजन वाढते असा साहित्यिक समज आहे. हा कितपत खरा आहे ह्यावर आम्ही पुढचे संशोधन करणार आहोत. पण तोपर्यंत आम्ही हा शब्दप्रयोग करण्यास हरकत नसावी).
महाभारतातही लोक "दोन मिनिट" हा वाक्प्रचार वापरत होते ह्याचा दाखला आहे आमच्याकडे. आर्थात त्याचाही पुरावा आहे आमच्याकडे. तो प्रसंग पुढीलप्रमाणे.
"धर्म्या! द्यूत खेळायचा काय?" दुर्योधन.
"नको रे बाबा! खूप टाईमपास होतो. द्रौपदी चिडेल" युधिष्ठीर.
"काय राव! बायकोला किती घाबरतोस? तिला पणावर लावायला नाही सांगितले तुला. दोन तीन डाव खेळू. चल ना दोन मिनिटे खेळू फक्त! ठीक आहे?"
"दोनच मिनिटे. ठीक आहे! भीम, अर्जुन, नकुल, सहदेव....चला दोन मिनिटे द्यूत खेळूया!"
ह्या दोन मिनिटामुळे पुढचे महाभारत घडले.
(स्थळ: कुरुक्षेत्र)
"अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण.
"दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन.
(अर्ध्या तासाने)
"अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण.
"दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन.
"दोन मिनीट, दोन मिनीट म्हणून अजून किती वेळ घालवणार आहेस? युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. थांब लेका! तुला आता गीतोपदेश केलाच पाहिजे"
प्रतिक्रिया
छान.. नविन फॉर्म आहे.. चांगला
:)
छान.
दोन मिनीट.....
छान........
लेख छान आहे. मोठी प्रतिक्रिया
या प्रतिसादात...
ऑबॉबॉ
३_१४तै, तुमी पण का??
हे बघा काय वाट्टेल ते बोला पण
छान लेख. पण मी वाचायला नको
व्व्वा...झक्कास....
प्रस्तुत लेख या आधीच
मस्त
मस्तच आहे..
ही ही ही .. मजेदार ! "नको रे
नुडल्स .. सिर्फ टू मिनिटस्
मजेशीर..
काल आपली टीम पण असच म्हणत
आवडला लेख..
छान... आवडलं.
खूप छान!
२ मिनिटात लेख वाचुन झाला...
असेच म्हणतो
मॅगीपण होत नाही २ मिनिटात...
@ बिका शेठ... अहो हा धागा
अहो मनीताई