✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

ख
खालिद यांनी
Sun, 08/08/2010 - 11:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8991 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

छान परिचय,

बबलु
Sun, 08/08/2010 - 13:58 नवीन
खालीद साहेब.... छान परिचय करून दिलात. माझेही ते अत्यंत आवडते पुस्तक. >>ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते. अगदी बरोबर. >>एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. सो टके की बात. असो.... अजून विस्ताराने लिहा की. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

+१

अर्धवट
Sun, 08/08/2010 - 14:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

आपल्या अकलेच्या जोरावर आणि

अवलिया
Sun, 08/08/2010 - 15:07 नवीन
आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्‍याचा काटा काढणे स्वसंपादित (संपादकीय आदेशानुसार)
  • Log in or register to post comments

गप्प बसा

नितिन थत्ते
Sun, 08/08/2010 - 17:45 नवीन
शूऽऽऽऽऽऽ. इथे परिस्थिती काय आहे आणि तुम्ही आपलंच रेटताय पुढे !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अवलिया आणि नितिन थत्ते...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/08/2010 - 17:57 नवीन
@ अवलिया: ओसीडी? @ नितिन थत्ते: या अनुषंगाने काही आले की तिथे लिहिलेच पाहिजे का? हा विषय (ज्याला इतर सगळ्याच विषयांप्रमाणे दोन बाजू आहेत) सतत जागृत रहावा असे काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अजून हे पुस्तक वाचले नाहीये

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/08/2010 - 17:52 नवीन
अजून हे पुस्तक वाचले नाहीये पण या पुस्तकाबद्दल खूप वाचले आहे. तुम्ही पण अतिशय सुंदर आणि चपखल लिहिले आहे. मजा आली वाचायला. शेवट तर फारच आवडला.
  • Log in or register to post comments

नक्की वाचेन

बेसनलाडू
Wed, 08/11/2010 - 05:50 नवीन
बिकांशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ओळ्ख

मुक्तसुनीत
Sun, 08/08/2010 - 18:30 नवीन
पुस्तकाची ओळख आणि त्यावरचे विवेचन आवडले. अ‍ॅनिमल फार्म हे कोपरखळ्या देत लिहिलेले पुस्तक आहे. "१९८४" या पुस्तकाचा आशय , त्यातली वर्णने ही अत्यंत विमनस्क करणारी. "बिग ब्रदर" चे , "न्यूस्पीक" चे भूत आपल्याला झपाटून टाकते. त्यामानाने प्रस्तुत पुस्तक खूपच हलकेफुलके. साम्यवादावर पन्नासेक (?) वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकांमधले भाष्य कुठल्याही व्यवस्थेला लागू होते. नोआम चॉम्स्की यांसारख्यांचे विचार पाहिले तर ऑर्वेल किती द्रष्टा होता हे समजते.
  • Log in or register to post comments

मुसु, तुम्ही अ‍ॅनिमल

विंजिनेर
Sun, 08/08/2010 - 20:32 नवीन
मुसु, तुम्ही अ‍ॅनिमल फार्मच्या संदर्भात १९८४चा उल्लेख करावा हे मजेदार आहे. अ‍ॅनिमल फार्म जसं साम्यवादाला हाताळते तसे १९८४ म्हणजे भांडवलशाहीच्या अतिरेकावर जळजळीत भाष्य करणारी कादंबरी आहे. मूळात १९८४च्या लेखनावेळी ऑरवेलची प्रकृती क्षयाने (चूभुद्याघ्या)खालावली होती. त्या मानसिकतेचा परिणाम म्हणून कादंबरीतलं वातावरण विषण्ण चित्रित झालेले आहे. जरा अवांतरः १९८४च्या शीर्षकावरून काही लोकांनी कादंबरी प्रकाशनाच्या वेळी (१९५०चं दशक) डूम्सडे भाष्य वर्तविलं होतं की बिग ब्रदर १९८४साली येणार आहे. पण खरं म्हणजे ऑरवेलचा तसा काही उद्देश नव्हता. त्याने कादंबरी लेखनाच्या सालातल्या आकड्यांची केवळ अदलाबदल केली होती (४८ <-> ८४)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

१९८४ सुद्धा साम्यवादाच्याच

नितिन थत्ते
Mon, 08/09/2010 - 07:54 नवीन
१९८४ सुद्धा साम्यवादाच्याच अतिरेकाचे वर्णन आहे. 'पार्टी'ची सर्वंकश सत्ता, सर्वदूर पसरलेली हेरगिरी, बुद्धीभेद हेच कथासूत्र आहे. फक्त अ‍ॅनिमल फार्म सारखा थेट रेफरन्स नाही. अर्थात दोन्ही कादंबर्‍या साम्यवादाखेरीज बहुतेक सर्व परिस्थितीत लागू होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

उत्तम

तिमा
Sun, 08/08/2010 - 19:34 नवीन
खालिदसाहेब, उत्तम परिचय करुन दिला आहे पुस्तकाचा. जोपर्यंत मानवी स्वभावातला स्वार्थ नाहीसा होत नाही तोपर्यंत कुठलीही व्यवस्था आदर्श होऊ शकणार नाही. साम्यवाद, भांडवलशाही, खरी लोकशाही, तथाकथित (भारतासारखी) लोकशाही यातले कुठलेच १०० टक्के यशस्वी होऊ शकत नाही. भारतापुरते बोलायचे तर स्वातंत्र्यानंतर काही वर्षे तरी, आतून काही चालत असले तरी, बाहेर साधनशुचितेचा आव आणला जात होता. नंतर सामान्य जनतेला सगळेच समजुन चुकले आहे हे कळल्यावर आता तर सर्व निलाजरे झाले आहेत.
  • Log in or register to post comments

जेमतेम १०० पानी - साध्या

विंजिनेर
Sun, 08/08/2010 - 20:33 नवीन
जेमतेम १०० पानी - साध्या भाषेतले पण अत्यंत असं प्रभावी पुस्तक. माझं आवडत्या पुस्तकांपैकी वरच्या नंबरावर असणारं खोडसाळ प्रतिक्रिया द्यायचीच झाली तर: पूर्वीच्या 'मनुष्य' मालकाला पळवून लावण्यात आलेले आहे. तांत्रिक सल्लागार मन लावून काम करता आहेत. पुर्वी केवळ संपादनात धन्यता मांडणारे संपादक मंडळ आता सदस्यांच्या प्रवेशप्रक्रियेत सुद्धा भाग घेऊ लागलंय. ऑरवेलच्या गोष्टीत साम्य नजरेत भरल्याशिवाय राहत नाही ;)
  • Log in or register to post comments

उत्तम पुस्तक परिचय

राजेश घासकडवी
Mon, 08/09/2010 - 00:18 नवीन
एका अतिशय सुरेख तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन, त्यावर व ते पुढे करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवून जनता क्रांती करते. आधीच्या सत्तांध राजांना हाकलून लावते. पण राज्य ताब्यात आल्यावर हेच नेते तसाच सत्तांधपणा करतात. जनतेला जी स्वप्न दाखवली होती त्यांचा आधीच्या राजांसारखाच चुराडा करतात. तितक्याच बेमुर्वतखोरपणे त्यांची दडपशाही करतात. आणि हे सगळं मूळ तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ असल्याचा बहाणा करत. मूळ वचनांमध्ये थोडा थोडा बदल करून त्यांच्यातली सत्वच काढून घेणं किती सहजपणे होतं हे अॅनिमल फार्ममध्ये दाखवलं आहे. रशियाच्या समाजवादी क्रांतीनंतरच्या घटना आराखडा म्हणून घेतलेल्या आहेत. लेनिन, ट्रॉट्स्की, तिथला कामकरी वर्ग, राज्यकर्त्यांनी पाळलेली दडपशाहीची यंत्रणा, समाजवादातून समर्थ व्यवस्था उभारण्याचं स्वप्न यांना एकास एक प्रतीकं येतात. मात्र तयार झालेला ढाचा अधिक व्यापक आहे यात प्रश्नच नाही. पारायणं करण्यासारखं पुस्तक.
  • Log in or register to post comments

उत्तम पुस्तक परिचय!

चतुरंग
Mon, 08/09/2010 - 01:42 नवीन
मी फार पूर्वी हे पुस्तक थोडेफार वाचले होते त्यावेळी बराचसा भाग डोक्यावरुन गेला होता आणि कंटाळवाणा झाला होता त्यामुळे पूर्ण केले नाही. परंतु आता हा परिचय वाचून नव्या दमाने हे पुस्तक वाचावे असे वाटते आहे. अतिशय संयत भाषेत परिचय दिल्याबद्दल धन्यवाद! शेवटचे वाक्य फारच आवडले :) (संवादी)चतुरंग
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख रसग्रहण

शहराजाद
Mon, 08/09/2010 - 07:48 नवीन
अतिशय सुरेख रसग्रहण. > एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर >संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्‍हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो. >एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू >लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी >म्हणून घेणार्‍यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच. सहमत. माझ्या एका आवडत्या पुस्तकावर लिहिल्याबद्दल धन्यवाद. १९८४ वरही येऊद्या.
  • Log in or register to post comments

छान

समंजस
Mon, 08/09/2010 - 10:48 नवीन
एका छान पुस्तकाची ओळख करून दिली आहे. पुस्तकातील विचारांशी आणि खालिदसाहेबांच्या विवेचनाशी पुर्णपणे सहमत. मानवी प्रवृत्ती ही सदासर्वकाळ अशीच आहे. त्यामुळेच ईतिहासाची पुनरावृत्ती होताना आढळून येते.
  • Log in or register to post comments

तेजाचे तारे तुटले ..मग मळेची सगळे पिकले

वाहीदा
Mon, 08/09/2010 - 13:23 नवीन
खालिद, तुमचे पुस्तकाचे विवेचन खुप आवडले अन सध्या वाचनखुण साठवून ठेवण्याची सोय नसल्या कारणाने प्रिंटआउट घेऊन वाचले. वाचताना शेवटी , लहानपणी वाचलेली अन अजूनही काहीशी स्मरणात राहीलेली एक कविता आठवली कोणाची आहे ते नक्की असे आठवत नाही कदाचित कवी 'बी' यांची असावी - डंका हे कवितेचे शिर्षक असावे (चूक- भूल घेणे-देणे) तेजाचे तारे तुटले, मग मळेची सगळे पिकले | लागती दुहीच्या आगी, राष्ट्राच्या संसाराला .. अति महामूर पूर येते, ढोग्यांच्या पावित्र्याला | कोंडिले स्वार्थकोंड्यात, जल सडले ते निभ्रांत , तरी धूर्त त्यांस तीर्थत्व , देऊनी नाडती भोले , तेजाचे तारे तुटले || कर्तव्य आणि श्रेयाची हो दिशाभूल जेव्हां ती, आंधळा त्याग उपजोनी डोहळे भिकेचे पडती; अतिरेक पूज्यभावाचे फुंकिती विवेकेज्योती; मग जुन्या अप्तावाक्याते भलतिशीच महती येते, राणीची दासी होते, बुद्धीचे फुटती डोळे , तेजाचे तारे तुटले || घन तिमिरी घोर अघोरी, विक्राळ मसण जागवती, ती ' परंपरा ' आर्यांची, 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती, 'धर्मांदी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती; सत्तेचे फक्त पुजारी उरले, तेजाचे तारे तुटले ||
  • Log in or register to post comments

उत्तम कविता.

अर्धवट
Mon, 08/09/2010 - 13:36 नवीन
उत्तम कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

तुझी निवड आणि स्मरणशक्तीचे कौतुक करावे तितके थोडेच!

सुधीर काळे
Tue, 08/10/2010 - 21:34 नवीन
वा वाहीदा, तुझी निवड आणि स्मरणशक्तीचे कौतुक करावे तितके थोडेच! Keep it up! काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

उत्तरार्ध

विकास
Tue, 08/10/2010 - 21:58 नवीन
सर्वप्रथम उत्तम पुस्तक परीचय. चतुरंगने म्हणल्याप्रमाणेच माझे देखील झाले: ज्या वयात इंग्रजी वाचनाची सवय नव्हती तेंव्हा वाचायचा प्रयत्न केला आणि सोडून दिले... आता परत वाचायचा हुरूप आला आहे! त्या बद्दल धन्यवाद. वाहीदांनी वर उर्धृत केलेली ही कविता बीं चीच आहे. खूप सुंदर कविता आहे, फक्त त्या कवितेत त्या नंतरची जी कडवी आहेत ती निराशाजनक नसून प्रेरणादायी आहेत (विशेष करून शेवटचे) म्हणून येथे लिहीण्याचा मोह टाळत नाही: (आठवणीतून, चु.भू.द्या.घ्या.) ...'धर्मांदी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;सत्तेचे फक्त पुजारी उरले, तेजाचे तारे तुटले || हि दंगल जेंव्हा होते ना कळेची कोठूनकी ते येतात बंडवाले ते जग हाले स्वागत बोले तेजाचे तारे तुटले या बड्याबंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहीला मोठ्यांच्या सिद्धांताचा घेतला पुरा पडताळा डांगोरा फोलकटांचा पिटवीला अलम दुनीयेला झुंजोनी देवादैत्या, अमृतामधे न्हाली जनता उजळला मराठी माथा, सत्तेचे प्रत्यय आले, तेजाचे तारे तुटले हिमतीने आपुल्या प्रांती उत्क्रांती शांतीमय केली प्रेमाच्या पायावरती समतेची इमारत रचली अंगची करामत ज्यांनी खल्विदा समर्पण केली आम्ही त्या दिल्जानांचे, साथी ना मेलेल्यांचे हे डंके झडती त्यांचे, ऐकोत कान असलेले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

विकास सर कविता पूर्ण केल्याबध्द्ल धन्यवाद !

वाहीदा
Tue, 08/10/2010 - 22:15 नवीन
मी खरेच कविता कोणाची आहे या बाबतित साशंक होते. आता कवि 'बी' शिक्का मनावर ठसला . पुनश्च धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चांगली ओळख

क्रेमर
Mon, 08/09/2010 - 18:10 नवीन
पुस्तकाची, त्यातील आशयाची ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

आभार

खालिद
Tue, 08/10/2010 - 05:31 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्व सभासदांचे मनापासून धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा