Skip to main content

आजचा शहाणपणा..........

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
***"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही." *** --------------------------------------------------------------------- "ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार करण्यात वेळ न घालवता, ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा." --------------------------------------------------------------------- *लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर......... तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात... --------------------------------------------------------------------- आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत आम्हाला ते शिकवतात की , ' प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना ' ठिक आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण आपल्या वडीलांची बिघडेल त्याचं काय ? - आचार्य अत्रे --------------------------------------------------------------------- हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?... .... अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!! --------------------------------------------------------------------- यशाच्या मार्गावर नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते...... --------------------------------------------------------------------- * ' सदैव' आणि 'कधीच नाही' हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा. --------------------------------------------------------------------- * पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!! --------------------------------------------------------------------- * माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत.... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा.... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!! * *--------------------------------------------------------------------- का? का? का? १. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? २. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात? ३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का? ४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का * *99 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते! --------------------------------------------------------------------- आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो. आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो. आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!! --------------------------------------------------------------------- जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी
लेखनविषय:

वाचने 2330
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का? हे एकदम भारी आवडले आपल्याला

>>जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी म्हंजे काय???? बाकी ह.

In reply to by मी-सौरभ

>>जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी हे अर्धवट टाईपलंय. मलाही हे ढकलपत्र आले होते. पूर्ण वाक्य आहे... जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी, मग ती दुसर्‍या जुन्या कारच्या डिलरकडे न्यावी. तो जी किंमत द्यायला तयार असेल ती खरी किंमत !!

हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?... .... अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!! लय भारी ! ! ! व्हिस्किचा कॅन नव्हता. म्हणजे अजून बरेच ताळतंत्र शिल्लक आहे म्हणायचे ! ! !