अजुन एक "स्वयंपाक आणि तु-तु-मी-मी"
काल संध्याकाळी बाहेर गेलो होतो. नेहमीचे घरी लागणारे सामान आणायचे होते. आम्ही दोघं नवरा बायको आणि माझी एक मित्र मैत्रिण जोडपं असे मिळुन गेलो होतो. बाहेर पडायला जवळ जवळ ७ वाजले होते. लीस्ट प्रमाणे एकेक वस्तु ट्रॉली मध्ये टाकत टाकत सगळी खरेदी निवांत चालु होती. तेवढ्यात नवर्याचा फोन वाजला .आणि असे कळले कि कि त्याला एक अर्जंट कॉन्फरन्स कॉल जॉईन करावा लागणार आहे. तो म्हणाला कि मी घरी जातो आणि काम करतो..तुमच झालं कि तुम्ही या. त्याप्रमाणे तो घरी गेला. आमची खरेदी संपायला जवळ जवळ ३ तास लागले नन्तर बिलींग च्या रांगेत २०-२५ मिनिटे.आधीच विकान्त ...त्यात हा वीकेंड म्हणजे इथली गटारी होती (रमादान चालु होइल ना....बाहेर खाणे -पिणे सगळे महिनभरासाठी बंद) त्यामुळे आख्खी दुबई काल बाहेर होती..पोरं,बायका,म्हातरी-तरणी ताठी सगळी यथेच्छ हादडुन घेत होती. मॅक डी, कें.फ्रा.चि.,पिझ्झा झोपडी सग्ळं सग्ळ्ं अ़क्षरशः ओसंडुन वाहत होतं. तिथे खायला मिळे पर्यंत खुप वेळ झाला असता. त्यामुळे घरी जाउन काहीतरी बनवावे असा विचार आला. म्हणुन घरी आलो.
रात्रीचे पावणेबारा तरी झाले होते.फिरुन फिरुन पाय थकले होते.आता जाउन काय स्वयंपाक करावा या विचारात दार उघडले.दार उघडतात एक मस्त ,खमंग वास नाकात शिरला. आत आलो तर पाहिले कि डाइनिंग टेबल वर व्यवस्थित प्लेट्स्,वाट्या,पाण्याचा जार्,ग्लासेस मांडुन ठेवलंय. त्याबरोबर एका ट्रे मध्ये मीठ्,तुपाचे भांडे,लिंबाचे आणि कैरीचे लोणचे ठेवलेले आहे. दोन भांडी झाकुन ठेवलेली आहेत. पुढे होउन एकेक उघडुन पाहिले .एका मध्ये मस्त वाफा येणारी गर्रम गर्रम मुगाची खिचडी आहे.अगदी व्यवस्थित हं.. म्हणजे वर अगदी खोबरं-कोथिंबीर पेरलेलं. आणि दुसर्यामध्ये मस्त कढी!
आणि दार उघडल्याबरोबर जो खमंग वास नाकात शिरला ना तो पापडाचा होता. किचन मधे जाउन पाहिले तर साहेब पापड भाजत होते. म्हणाला "जा पटकन चेंज करुन या...जाम भूक लागलिये.जेवून घेऊ."
त्या क्षणाला इतकं बरं वाटलं...आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. चेंज करुन त्यानी प्रेमाने वेळ आणि जीव ओतुन बनवलेले साधेच पण अप्रतिम चवीचे जेवण खाताना जे पोट आणि मन तृप्त झालं ना त्याला तोड नाही..!
हं पण..त्याने हे केलं म्हणून आश्चर्य नाही वाटलं कारण हे काही त्याने पहिल्यांदा नव्हतं केलं. अनेक वेळा कधी त्याचा मूड आहे म्हणुन्...कधी मला विश्रांती द्यावी म्हणुन्,तर कधी मी बाहेरून थकून आले असेन म्हणून अनेकदा तो स्वयंपाक करतो.आणि हे कधीहि त्याला मी किंवा अन्य कोणी सांगितले आहे म्हणुन करतो असं नाहिए.स्वतः जाणुन करतो. तुमच्यापैकी अनेक जणांना वाटेल की मी अतिशयोक्ती करते आहे.काहिंना असेही वाटेल कि हॅ काय्....पुरुष असुन स्वयपाक! काहींना तर वाटेल कि मी फारसा बरा स्वयपाक करत नसावी आणि सोयीसाठी बिच्चारा नवरा शिकला असावा स्वयंपाक! तर त्यावर मी इतकंच म्हणेन कि तो फक्त जाण ठेवतो.. माझी,मी रोज त्याच्यासाठी प्रेमान बनवलेल्या चार घासांची..त्याच्या कायम जपलेल्या आवडीनिवडींची! आणि मुख्य म्हणजे त्याला स्वतः ला खाणं बनवायची आवडही तितकीच आहे. काही काही पदार्थ तर मी बनवायचेच नसतात्.जसे कि कढी.अप्रतिम बनवतो. माझ्या घरी कढी बनते ती त्याच्याच हातची.शुक्रवारी किंवा सुट्टी असेल त्यादिवशी चहा,तर कधी कधी नाष्ता ही बनवतो.
हे सारं करण्यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही किंवा पुरुषी अहं त्याच्या आड येत नाही. सुरुवातीला मला कधी कधी खुप अवघडल्यासारखं व्हायचं.कि काय म्हणतील कोणी पाहिलं तर नावं तर ठेवतीलच पण त्याआधी माझ्यावर शंका. कि बायको काही करते कि नाही (तुम्हालाही वाटलं असेल ना..किंवा असंही वाटलं असेल कि बायको आय टी तली आहे की काय)
मागच्या काही आठवड्यांपासुन मि.पा.वर जो काही सावळा गोंधळ चालु आहे ना या विषयावर्..त्यांच्यामुळे अक्षरशः डोकं बधिर व्हायची वेळ आली आहे. बायको आणि स्वयंपाक काय्.. नवरा बायको आणि स्वयंपाक काय्,आय टी तली बायको ..तम्क्यातली बायको आणि स्वयंपाक काय्.कट इट यार!
भोजन्,खाणं.. अन्नग्रहण ही एक इतकी तृप्त करणारे क्रिया आहे. आपला आत्मा तृप्त होउन जातो. पोटात भूक्,विचार आणि कामाच्या श्रमाने थकलेलं शरीर घेउन घरी आलं आणि साधा वरणभात जरी मिळाला तरी आत्मा तृप्त होउन जातो. आणि ते जेवण बनविण्यात कसला आला आहे कमी पणा...कसला स्त्री-पुरुष भेद्..कसला इगो?
सार्याचे नवरे किंवा समस्त पुरुष जात अगदी माझ्या नवर्यासारखी व्हावी हा भाव नाहीये हे लिहिण्याचा. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. सगळे पुरुष सारखे नसतात. पण त्या मागची त्याची जी मानसिकता आहे ना तिचा थोडाबहुत विचार जरी सार्यानी केला तरी खूप आहे.
बायको जॉब करणारी असो किंवा नसो. घरकाम्,मुलांना सांभाळणे,त्यांच्या ट्युशन्स्/ क्लासेस यांमागे पळताना तिचीही कसरत होतेच ना.तरीही ती आपल्या परीने झटत असते. मग कधी तरी जर या सार्यामुळे कधी स्वयंपाकामध्ये किंवा चवीमध्ये कमी जास्त झाले तर काय बिघडलं? तिला कधीतरी थोडेशी मदत केली तर काय मोठा लॉस होणार आहे?.
आणि जर जॉब करणारी असेल..७-८ तास घराबाहेर राहुन तुमच्या बरोबरीने,तुम्ही करता तेच काम ती करत असेल तर कधी तिला आवडतो म्हणुन्..तिचा थकवा जाणुन तिला थोडासा हलकेपणा द्यावा म्हणुन एखादे दिवशी काय हरकत आहे एखादा पदार्थ करायला? तिचाही विचार करा ना..कुठल्या कुठे शहराच्या एका टोकाला असलेल्या ऑफिसमधुन्,घरापर्यंत ट्रॅफिक मधुन गजबजाटतुन घरी येते.वाटलं तिला कि आज घेउया विश्रांतील्/जाऊया काहीतरी खायला बाहेर तर काय मोठे नुकसान होणार आहे?
इतके सारे दमून भागुन घरी येताना ती सामान घेउन येते.या विचाराने कि आज त्याला काहितरी वेगळे,नविन खायला घालावे. कोणत्यातरी पुस्तकातुन किंवा गूगल वरुन रेसिपी शोधते आणि त्याप्रमाणे करते.यात चर्चा होण्यासारखं काय आहे बरे. तिला त्याच्यासाठी काहीतरी छान करायची इच्छा का लक्षात घेत नाही कोणी? काय तर म्हणे गूगल वर का शोधतात रेसिपी? इतका वेळ ,मेहनत करुन जर तिनं विचारलं जेवताना कि कसं झालंय? तर त्यात काय चुकतं तिचं? कोणीही विचारेल्.आपण जे बनवलय ते त्याला आवडलं आहे की नाही हे नाही का जाणवसं वाट्णार? दुसरी कॉमन वादाची गोष्ट्."माझ्या आईच्या हातची किंवा ताईसारखी किंवा वहिनी सारखं नाही जमत तिला.!" हे एक वाक्य कोणाच्याही बाबतीत ऐकलं ना कि डोकं फिरतं माझं. अरे ती एक पुर्ण वेगळी व्यक्ती आहे.पाची बोटं सारखी असतिल का.तिच्या हाताला देखिल तिची अशी वेगळी चव असेल्. काही पदार्थ बनव्ण्यात तिची ही खासियत असेल्.आणि जरी नसेल तर येइल्..बनवून सवयीने येइल तिच्या पण हाताला तुम्हाला आवडेल अशी चव्.तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या आई ला पाहिलय करताना तिच्या हातचे खाल्लं आहे. तिनं तिच्या आईच्या हातच्! तिच्या लक्षात तिच्या आईने बनवलेले.शिकवलेले पदार्थ असतिल ना! व्यक्तिपरत्वे बदलतात या गोष्टी.करा ना हे डाय़जेस्ट..!
कधी तिच्या बरोबरीने हसत..मजा करत बनवून पहा एखादा पदार्थ् त्याची चव कायम जिभेवर आणि मनात रेंगाळत राहील..दोघांच्याही.मग ते साधं मॅगी जरी पोट्भर बनवलं तरी मस्त लागतं.साधं खाणं तर आहे. त्यात तु तु-मी-मी करुन काय आहेत ते क्षण वादात घालवायचे? जे क्षण आत्त आपण महत्वाची बोलण्यात किंवा काहीतरी आनंद देणारे ठरवू शकतो ते या जेवणावरच्या वादात वाया घालवाय्चे? अशा वादानंतर ,तिला दुखवून तुम्हाला अगदी सुन्दर जेवण मिळालं तर चवीच वाटेल का ते?
जेवण ,खाण्,इगो यापेक्षा खुप काही सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात चर्चा करण्यासाठी! याचा थोडा विचार जरी प्रत्येक पुरुषाने स्त्री ने केला आणि त्यांची मानसिकता किंचित बदलवली तर दोघांचही जेवण आणि अनुषंगाने जीवन सुखकर होइल. जेवण हे निव्वळ उदरभरण न राहता एक सहज आणि आनंददायी नित्य नियम होउन जाईल. नाही का?
प्रतिक्रिया
मस्त लिहिलंयस जाई अगदी माझाच
वेल सेड, जाई.
सहमत!
क्या बात है!!! लेख आवडलाच. -
शेम २ शेम असच बोल्तो..अगदी
मस्त लिहिले आहे.. विचारही
..मलाही जाम कंटाळा आला होता..म्हणुनच
पण मिपावरच्या या धाग्यांनी
आवडले
जाई ताई, लेक खरच चान्गला आहे.
अहो पण "प्रविन्भपकर" उडाले
जाई,
मस्तच आहे !!! असाच नवरा
घ्या....कुणाचं काय तर कुणाचं काय
ह्म्म्म्म
वा!! छान लिहिलय्स जाई!
है शाबास!!
चर्चा चालुच
छान लिहिलंय..तरीही लोक घरी
मस्त मस्त!
सही
+१
खुप छान
लै भारी
छान लेख
गंमत वाटली....
...घ्या....
माझा पण नवरा असेच मला उशीर
छान लिहिले आहेस जाई
क्या बात है............ नवरा असावा तर असा
क्या बात है............ नवरा असावा तर असा