आम्हाला राग येत नाही ब्वा (जरी आलेला दाखवत असलो तरी)
आमच्या मुळेच अनेकांना राग येतो, चीड चीड होते असे आमचे गुप्तहेर कळवतात :)
बाकी तुला कशाचा राग आला येवढा ? बायको स्वयंपाक करत नाही की काय ?
>>आम्हाला राग येत नाही ब्वा (जरी आलेला दाखवत असलो तरी)
नाना, मोक्षप्राप्तीच्या अगदी जवळ आहात. ;)
>>बाकी तुला कशाचा राग आला येवढा ? बायको स्वयंपाक करत नाही की काय ?
बायको अजुन नाहीये, त्यामुळे हा प्रश्न बाद. :)
काही लोक घरातला राग बाहेर व्यक्त करतात.
घरात अथवा हापिसात जे राग व्यक्त करू शकत नाहीत ते अंतर्जालावर साध्या सोप्या धाग्यांवर सुद्धा खवट /अवांतर् /उर्मट /तुसडा प्रतिसाद देवुन राग व्यक्त करतात.
काही लोक जमाव स्थापन करतात आणि तसल्या प्रतिसादांचा एकसयावच्छेदेकरून भडिमार करून एखाद्या कोकराला पळवून लावतात.
काही स्वतःच धागे काढतात आणि वेगवेगळ्या नावाने प्रतिसाद आणि त्या प्रतिसादास उत्तरे देवून टी आर पी वाढवतात आणि संध्याकाळी जितमं मया च्या आवेशात घरी जातात
क्रमांक ५ चा पर्याय स्वीकारला आहे, पण ७ देखील आहेच. त्याचे स्पष्टीकरण ~~
अशा स्थितीत, घरी असल्यास, एकतर कॉम्प्युटरवर स्टोअर केलेली लता किंवा तलत मेहमूद यांची अजरामर मधुर गाणी ऐकत राहतो (स्क्रीन ऑफ करून). आणि घरी नसताना असा प्रसंग आलाच तर नगर वाचन मंदिराकडे गाडी वळवितो व तेथील वातावरणात (इतरांसमवेत) स्वतःला गुरफटून घेतो.
कोणत्याही स्थितीत समोरील व्यक्तीला रागात अपशब्द मी बोललेलो नाही. नंतर पुढे कधीतर प्रसंग आलाच तर इतकेच म्हणतो, "तू त्या दिवशी चुकीचे बोललास." बस्स...याचा फार फायदा होतो.
इन्द्र्राज पवारांसारख सात्वीक रहाण जमतच नाही. जरी ते योग्य असल तरी.
समोरच्याला जर त्याची चुक असली तर पटवुन देण्याचा प्रयत्न करतो. जर तो समजला तर ठिकच नाहीतर तुकबांनी सांगीतल्या प्रमाणे नाठाळाचे माथी....
हां पण जर स्वत:ची चुक असेल तर मात्र प्रांजळणे चुक मान्य करुन क्षमाही मागतो.
श्री.गणपा.... सात्विक वगैरे काही नाही; पण तो एक तसा स्वभावच बनला आहे असे म्हणतो. "संताप" (अकारण वा सकारण) येऊन येऊन व त्यामुळे बीपी प्रचंड प्रमाणावर वाढल्याने अगदी जवळच्या नात्यातील दोन ज्येष्ठांचा अकाली मृत्यु मी पाहिला आहे, तसेच त्यांचे कुटुंबिय ज्या पद्धतीने पुढे इस्टेटीवरून कोर्ट कचेर्यात अडकले, त्यांचा अनुभव घेऊन माझ्या आईने संतापापासून दूर राहणे किती गरजेचे आहे ते मला शिकविले. भले मग आपली बाजू योग्य असली तरी मी पडते घेतो. काहीवेळा लोक याला "पळपुटेपणा, बावळटपणा" असे शेलके आहेर देतात, पण त्याकडे आता दुर्लक्ष करायचे शिकलो आहे. आताच्या आणि भविष्यातील कौटुंबिक जबाबदार्या पेलण्यासाठीही या स्वभावाचा उपयोग होईल.
पहिल्या पर्यायाला मत दिले आहे. पण ३ आणि ५ हे देखील अनुक्रमे वापरतो.
हे नाहीच जमलं तर सरळ झोपून जातो.
उगाच कोणामुळे तरी आपलं बी.पी. शूट व्हावं असं मला मुळीच वाटत नाही. तरीदेखील काही लोक ज्याचं 'उपद्रवमूल्य' फारच 'हाय' आहे, डोक्याला शॉट करतातच! त्यांचा खास पुणेरी भाषेत जाहीर अपमान करतो!
--असुर
तुम्ही ही करुन बघा...सगळ्यात आधी पाणी प्या.अन मग एक दिर्घ श्वास घ्या ,
काही मिनिटे काहीच बोलू नका ,
खरंच खुप शांत वाटेल !
नंतर विचार करुन तुमचे काही चुकले असेल तर माफी मागा. (माफी मागण्याने आपण लहान होत नाही असे मला तरी वाटते म्हणून मी तरी माफी मागते)
अन त्याचे काही चुकले असेल तर त्याला /तिला दाखवून द्या
त्या व्यक्तिशी संवाद साधा अन सांगा तुम्हाला त्याचा का राग आला नाहीतर त्याला काही कारणाने त्याच्या चुकिच्या वर्तनाची जाणिव करुन द्या
पण जर का तो / ती खरच खोडसाळ असेल तर मग काही वेगळी strategy किंवा सरळ दुर्ल़क्ष
वाहीदा, हा असा संयत प्रतिसाद तुझ्याकडून खरंच अपेक्षित नव्हता; पण आनंद झाला हे वाचून!
लोकांना चार शहाणपणाच्या कडू गोष्टी गोड वेष्टनात घालून सांगण्याची हातोटी माझ्याकडे नसल्यामुळे बर्याचदा राग आला की मी संबंधित लोकांकडे दुर्लक्ष करते. उगाच, लोकांच्या स्वतःला न पटणार्या वागण्याची शिक्षा मी स्वतःला देत नाही.
माऊ, My Bad Experiences have taught me everything.. तजुर्बेके बोल !
आपण आपल्या डोक्याच्या शिरा ताणून कधी कधी काहीच होत नाही ग फक्त मन:स्तापच वाढतो ...
लेकीन कभी-कभी एक खुबसुरत रिश्ते में दरार आ गई, इस चिज का अहेसास रुला देता है :-(
इसलिए खुदा से दुवा मांगती हूं "ऐ दिलोंको पलटनेवाले, उस शख्स को अपने गलती का अहेसास करा दे" अन जर ती व्यक्ती परत मित्र / मैत्रिण झाली की मग Behave as if Nothing has ever gone wrong ..Don't ever dig out again :-)
>>अन जर ती व्यक्ती परत मित्र / मैत्रिण झाली की मग Behave as if Nothing has ever gone wrong ..Don't ever dig out again
सौ टके की बात, अगदी बरोबर पण बरच अवघड आहे असं वागायला
>>राग आल्यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळते.
हे फारच महत्वाचे आणी खरे आहे. आंतरजालावरच नाही तर रोजच्या व्यवहारीक जीवनामधे सुद्धा. मला वैयक्तीक आयुष्यात या गोष्टीचा खुपच फायदा झाला आहे. नोकरीत सुरुवातीला राग आला की वाट्टेल ते बोलुन, ई-मेल ला उलटा -सुलटा रिप्लाय देऊन मोकळा व्हायचो,कितीही चांगल काम केलेलं असलं तरी यामुळं ग्रोथला ब्रेक लागायचा, पण हळु हळु प्रतिक्रिया (रिअॅक्ट न करता) न देता त्या गोष्टीला प्रतिसाद (रिस्पॉन्स देण्यास) देण्यास शिकलो आणी प्रगतीला वेग मिळाला. :) राग राग करुन आपलं रक्त जाळण्यापेक्षा अॅसर्टीव मार्ग अवलंबणे सर्वात उत्तम पर्याय आहे. पण काही ठिकाणी राग अनावर (विशेषतः अहंकाराला ठेच लागली की) होतो आणी माणुस स्वतःचच नुकसान करुन घेतो हेही तितकेच खरे.
आजकाल रागाच्या भरात खून, मारामार्या, चांगल्या संबंधात वितुष्ट येणे, बीपी वाढणे, आजार वाढणे हे प्रकार ईतके वाढले आहेत की विचारता सोय नाही आणी रागावर संयम प्रस्थापित करणे तेवढे सोपे नाही.
{खाली स्वतंत्र अभिप्राय द्यायची सोय दिसत नसल्याने, (च्यायला, या लेआऊटवाल्यांच्या!!) इथे नायल्याला आडवी टांग मारून प्रतिक्रिया लिहित आहे...}इतर काहीतरी ला मत दिले आहे , कारण,
कोणत्याही कारणाने/व्यक्तीमुळे चीडचीड झालेली/ प्रचंड राग आलेला असेल तर पायात चपला घालायच्या अशी या संस्थळावर फार प्राचीन परंपरा आहे!
:)
आणि हे माहीती असूनही असा धागा टाकल्याबद्दल मराठमोळ्यावर जाहीर चिडचिड व्यक्त करीत आहे!!!
:)
अरे असं आहे का? बरं झाले सांगितलेस. आता तुझ्याकडे येताना विचारेन, 'स्वयंपाक करत आहेस का म्हणून' ;)
नवीन प्रतिक्रिया लिहिण्यास चौकट मिळाली नाही म्हणून माझी प्रतिक्रिया इथेच लिहितो.
इतर ला मत दिले आहे.
शक्य असल्यास आवडते संगीत (गाणी) लावतो. घरी असल्यास विनोदी सिनेमा/मालिका पाहतो. :)
नाहीच जमले तर ज्याच्यामुळे चिडचिड झाली असेल तर त्याच्यावरही राग काढतो. :(
खरं सांगायचे म्हणजे आता तरुणपणासारखा पटकन् राग येत नाही. बर्याचदा अशा माणसाची कींवच वाटते. पण तरीही कधी राग आलाच तर शक्य तितका शांत रहाण्याचा प्रयत्न करतो. पण राग आलेला चेहेर्यावर दिसतो, तो लपवु शकत नाही.
पण माझे असे मत आहे की राग दाबला तर तो रक्तदाब वाढवतो. अशा प्रसंगी एखादे शांत गाणे दुसर्या जागी जाऊन ऐकल्यास फायदा होतो.
याआधी कधी राग आला होता ते आठवत नाहीये. 'माहीत नाही' असा पर्याय नसल्याने सातवा पर्याय निवडला आहे. सुजयच्या ब्लोग वर प्रतिसाद देताना पन खूप लोकाना राग आला होता. त्यावर उपाय म्हनून काही लोकानी प्रविन्दाच्या ब्लोगची वाट लावली.
प्रतिक्रिया
आम्हाला राग येत नाही ब्वा
>>आम्हाला राग येत नाही ब्वा
In reply to आम्हाला राग येत नाही ब्वा by अवलिया
काही लोक घरातला राग बाहेर
In reply to >>आम्हाला राग येत नाही ब्वा by मराठमोळा
"डोक्याला शॉट लागला भाड्या..
In reply to काही लोक घरातला राग बाहेर by विजुभाऊ
उजळणी चे वर्ग...
In reply to "डोक्याला शॉट लागला भाड्या.. by परिकथेतील राजकुमार
५ व ७
इन्द्र्राज पवारांसारख सात्वीक
संताप
In reply to इन्द्र्राज पवारांसारख सात्वीक by गणपा
पहिल्या पर्यायाला मत दिले
मी सगळ्यात आधी काही करत असेल तर, खुप खुप पाणी पिते
वाहीदा, हा असा संयत प्रतिसाद
In reply to मी सगळ्यात आधी काही करत असेल तर, खुप खुप पाणी पिते by वाहीदा
अनुभवाने बरंच काही शिकवल आहे
In reply to वाहीदा, हा असा संयत प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>अन जर ती व्यक्ती परत मित्र
In reply to अनुभवाने बरंच काही शिकवल आहे by वाहीदा
:-)
In reply to अनुभवाने बरंच काही शिकवल आहे by वाहीदा
क्र. १ ला..
मला चीड्चीड होतच नाही
राग ही माझ्यामते दुय्यम भावना
>>राग आल्यावर लगेच कोणतीही
In reply to राग ही माझ्यामते दुय्यम भावना by पुष्करिणी
शिव्या....
आम्हाला राग आला की आम्ही घरी
इतर काहीतरी!
In reply to आम्हाला राग आला की आम्ही घरी by Nile
अरे असं आहे का? बरं झाले
In reply to आम्हाला राग आला की आम्ही घरी by Nile
कुढत बसतो
जमेल तितके
याआधी कधी राग आला होता ते
इतर