फिश-केक:
परवा लक्षात आले की घरी दोन दिवसांपूर्वी आणलेले मासे (haddock) पडलेले आहेत. आमच्याकडे जास्त पसंती कालवणाला आहे, पण आज त्यासाठी मला हवे होते ते नारळ, कोथिंबीर असे काहीच घरात नव्हते. होते असे माझे कधीकधी. ;) आणि तेवढ्यासाठी संध्याकाळी इंडियन स्टोरला जायचा कंटाळा आला होता. आमच्याकडे बाबा लहानपणी म्हणत असत की घरात काय आहे त्यात बरेच काही करता येते, दरवेळी एखाद्या पदार्थासाठी अडून बसण्याची गरज नाही. आणि ते खरोखरच घरात जे आहे त्यात चविष्ट जेवण तयार करतात (मूड असला तर). हा उपदेश आठवला, म्हणून घरात काय होते ते पाहिले. एक म्हणजे घरी बनवलेला गव्हाचा उरलेला ब्रेड होता. बेसिलची पाने होती, कांदे-बटाटे, लसूण थोडेतरी घरात असतातच, तसे होते. म्हणून या सर्वात फिश केक (हवे तर पॅटिस म्हणा) बनवले. ही काही फिशकेकची सगळ्यात उत्तम पाककृती नाही, पण ठीक लागली. तेव्हा पेश आहे - तुमच्याही काही टिप्स असल्या तर लिहा.
साहित्यः
३/४ वाटी ब्रेड-क्रम्ब्ज (माझ्याकडे घरगुती गव्हाचा आणि भाकरीच्या पिठाचा ब्रेड होता/होती, तो/ती मिक्सरमधून काढले).
१ - १ १/४ पाऊंड कुठच्याही पांढर्या माशाचे तुकडे - (काटे आणि त्वचा काढून टाकलेले) - मॅश करून -फूड प्रोसेसरमधून माशाचे तुकडे मॅश करून घेतले. ( ज्यांना मासा आधी किंचित उकडून मग मॅश करायचा असल्यास ते तसे करू शकतात, पण गरज नाही).
१ लहान कांदा बारीक कापून (कांद्याची पात असल्यास ती घाला).
लिंबाचा रस १-१/२ चमचा (चिंचेचा कोळही घालता येईल).
आले-लसणीची पेस्ट १-१/२ च. चमचे
मीठ, गरम मसाला, १-१ १/२ चमचा तिखट (चवीप्रमाणे)
४-६ बेसिलची पाने बारीक कापून
१ च. कॉर्नफ्लावर (असल्यास)
तेल
कृती:
तेल सोडून बाकी सगळे साहित्य जितके एकजीव होईल तितके केले. एकजीव करायला कॉर्नफ्लावर घालायला हवे होते. पण ते माझ्याकडे नव्हते! खरेतर यात बटाटेही मॅश करून घालता येतील. पण मी बटाटे वेगळे तेलावर भाजले होते, ते माशाच्या मिश्रणात घालणार नाही असे ठरवले. :) त्यामुळे आता माझे पर्याय फारच मर्यादित झाले: म्हणजे माशाचे मिश्रण जास्त न मोडता तव्यावरून काढायला लागणार होते. त्यामुळे लहान लहान चपटे पॅटिसप्रमाणे केले. तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने परतले. खालच्या बाजूने पांढरट रंग दिसला (रंग बदललेला दिसला) की मोडणार नाहीत अशी काळजी घेऊन उलटून परतले.
काल आम्ही हे असे जेवलो.

" alt="" />
" alt="" />
वाचने
9227
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! वा!
करा करा!
In reply to वा! वा! by प्रियाली
यमी!! मस्त दिसतोय पदार्थ.
छान!
छान आहे
छान दिसतोय फिश केक.. पण हे
In reply to छान आहे by piu
होय!
In reply to छान दिसतोय फिश केक.. पण हे by स्मृती
वा! वा!! प्लेट सजलेली दिसते
गल्ली चुकली ग !
In reply to वा! वा!! प्लेट सजलेली दिसते by रेवती
+१
In reply to गल्ली चुकली ग ! by संदीप चित्रे
अरे संदीप, शाकाहारींनाही
In reply to गल्ली चुकली ग ! by संदीप चित्रे
त्यात "आम्ही हे खात नाही' असा
In reply to अरे संदीप, शाकाहारींनाही by रेवती
भाषा बिघडली
In reply to त्यात "आम्ही हे खात नाही' असा by निखिल देशपांडे
अदिती यात फिश ऐवजि
In reply to भाषा बिघडली by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म्म्...
In reply to भाषा बिघडली by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकच प्रकार अनेक प्रकारांसारखा
In reply to हम्म्म्... by पंगा
धन्यवाद
In reply to एकच प्रकार अनेक प्रकारांसारखा by आमोद शिंदे
एक विशेष रेसिपी. छान आहे.
मस्त!!!
धन्यवाद
रंगीबेरंगी ताजी दिसणारी प्लेट
होय
In reply to रंगीबेरंगी ताजी दिसणारी प्लेट by बेसनलाडू
आधी पाककृतीच नाव (केक आणि
छान छान
हम्म
In reply to छान छान by सहज
?
In reply to हम्म by चित्रा
आता
In reply to ? by पंगा
पटले नाही
In reply to आता by चित्रा
तुमचेच बरोबर.
In reply to पटले नाही by पंगा
सॉरी, राँग नंबर
In reply to तुमचेच बरोबर. by चित्रा
फोटो वरुन लोकं इतकी तारीफ कशी
In reply to पटले नाही by पंगा
=)) =))जय भिम शिंदे
In reply to फोटो वरुन लोकं इतकी तारीफ कशी by आमोद शिंदे
मिपाकरांना मुर्ख
In reply to =)) =))जय भिम शिंदे by गणपा
हा हा
In reply to मिपाकरांना मुर्ख by आमोद शिंदे
अधिक चपखल
In reply to हा हा by पंगा
हम्म्म्...
In reply to अधिक चपखल by आमोद शिंदे
सगळ्या मिपाकरांना मुर्ख बनवत
In reply to मिपाकरांना मुर्ख by आमोद शिंदे
ह.घ्या पुरे!
In reply to सगळ्या मिपाकरांना मुर्ख बनवत by Nile
हम्म्म्.....
In reply to फोटो वरुन लोकं इतकी तारीफ कशी by आमोद शिंदे
>>एकाच प्रतिसादात एखाद्याला
In reply to हम्म by चित्रा
गुरुत्वाकर्षणाचा नियम, अर्थात...
In reply to >>एकाच प्रतिसादात एखाद्याला by आमोद शिंदे
छान दिसतायत फिश-केक्स पण तो
मस्त ,मस्त....
शाकाहारी असल्याने नुसतेच चान
मस्त
'वी हॅव बिगर फिश टू फ्राय'
In reply to मस्त by नंदन
एकदम मस्त. करुन पहायला हवा
सर्वांचे