
जवळ जवळ सर्वाना वडा बनवता येतो तरीही रेसिपी टाकत आहे.
आज टाइप करण्याचा हुरूप आला आहे म्हणून समजा..जेवण बनवणे टाइप करण्यापेक्षा जास्त सोपे आहे असे मला वाटते.
असो पा कृ आणि फोटो...देत आहे..चांगल्या प्रतिक्रिया कळवा.. :)
उकडलेले बटाटे - ६एक
कोथिंबीर-खूप
कढीपत्ता-८एक पाने
लसूण-६ पाकळ्या
आले-१/२ इंच
हिरवी मिरची ४- पेस्ट करून
तेल-१ पळी
जिरे-मोहरी
हळद
मिठ
तिखट-१/४ चमचा
बेसन
कृती
१.कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कधिपत्ता,लसूण,आले एक एक शीजले की क्रमवार घाला.
मग हळद घाला.मग उकडलेले, मश केलेले बटाटे घाला. मिठ घाला. ४ मिनिट वाफ काढा.
कोथिंबीर घालून मिक्स करा. व भाजी गार होऊ द्या.
२.वड्या वरील आवरणा साठी बेसन,मीठ,लाल तिखट एकत्र करा. त्यात पाणी घालून घत्तसर मिश्रण बनवा. जास्त पातळ मिश्रण असेल तर ते वड्या ला मिश्रण नीट लागणार नाही. व वडा देखील कढाईला चिकटेल.
३.कढईत तेल तापवा. आता बनवलेल्या भाजीचे गोल गोल गोळे बनवा. मग ते क्र.२ च्या मिश्रणात बुडवा. व तापलेल्या तेलात फ्राइ करा.
वडे तयार आहेत...
त्यावेळि भारतातिल पावान्सारखे पाव मि ळाले नाहित .. म्हनुन..
असेच खाउन घ्या.. माफ करा बघुन् घ्या.
प्रतिक्रिया
ह्या दिवाडकर ष्टाईल गोल गोल
(लागणार)मिळणार बुवा?जिरे-मोहरी वड्यात जिरे ?
कुठल्या पार्टीचा वडा आहे हा?
अरे!! ईतकी चांगली पाकृ तळाला
मिरच्या मात्र तळलेल्या दिसत
मिरच्या
In reply to मिरच्या मात्र तळलेल्या दिसत by प्राजक्ताचि फुले