दारी उभा गे साजण
लेखनप्रकार
तो: एक विचारु ?
ती: ह्म्म.. विचार की..
तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय..
ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच !
तो: एकदा भेटूनच येतो.
ती: परवा सकाळी येशील नं घरी?
तो: हो.
तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............
रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं.
आजचा दिवस नि रात्रही जायची आहे अजून.
मनातल्या डोहावर कितीतरी गोष्टी तरंगत राहिल्या. निळसर गुलाबी रंगाचे कागद, अत्तराच्या कुपीचे हरवलेले झाकण, चंद्रलिपीतली अक्षरे नि त्याला चिकटलेली मोरपिसं ...!!!
रात्र पुन्हा गढूळली. क्षितिजावर रेंगाळणारे ढग गाफिल क्षणी मनात वस्तीला आले. आणि तो पण आला....
खात्री नव्हती ? होती की. तरीपण..काय...तिच्या मनात चाललंय तरी काय???
"दारी उभा गे साजण
नको त्याच्यापुढे जाऊ"
दुखले का ? की संताप आहे हा ?
"त्याने यात्रेत भेटल्या
कोण्या पोरीच्या देहाला
दिले आभाळाचे बाहू"
ढग बरसतील नं आता? प्रलय येणार... बघू त्याच्या चेहर्याकडे? ऊन असेल की सावली तिथे?
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण "
मी पाऊल टाकू ? पहिलं ?
तोच येतोय पुढे!
मूठीत काय त्याच्या ? ओंजळ पुढे करतेय मी..
चाफा ! पहिल्या भेटीत मी त्याला दिलेला...!!!!
भरून आलेल्या आभाळाला एक गार झुळूक भेटली..पाऊस !
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण..."
जिंकली की ! आता पाऊस थांबलाय. पहाट केशरी दवात भिजतेय्....चाफा नव्या गंधाने दरवळतोय !
( लेखातील कवितेचे कवी- ग्रेस)
वाचने
6915
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
>>( लेखातील कवितेचे कवी-
सुंदर! अतीव प्रेमाबरोबर
लेखाचे शीर्षक
In reply to लेखाचे शीर्षक by मुक्तसुनीत
अवघड आहे!
In reply to लेखाचे शीर्षक by मुक्तसुनीत
अपेक्षाभंग आणि अपेक्षापूर्ती
In reply to अपेक्षाभंग आणि अपेक्षापूर्ती by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by ज्ञानेश...
+१
In reply to +१ by आमोद शिंदे
कुणी उधळली मुठ नभी ही रम्य
In reply to लेखाचे शीर्षक by मुक्तसुनीत
लेख आवडला. छान!
In reply to लेखाचे शीर्षक by मुक्तसुनीत
मुक्तसुनीत
हातच सोडुन पळत्याच्या
माया, लेख खरेच आवडला... छान
लिखाण
In reply to लिखाण by मुक्तसुनीत
वात्रट प्रतिक्रिया
In reply to वात्रट प्रतिक्रिया by अवलिया
मुसुंची पहिली प्रतिक्रिया
In reply to मुसुंची पहिली प्रतिक्रिया by यशोधरा
"गालबोट"
क्या बात है !!!
In reply to क्या बात है !!! by मिसळभोक्ता
+ १ हेच म्हणतो!
शब्दच संपले.. आधी ग्रेस
खल्लास! खूप सह्ही लिहिलं
सुंदर!
तीन वेळा
रात्रभर कूस बदलत आभाळातल्या
In reply to रात्रभर कूस बदलत आभाळातल्या by राजेश घासकडवी
वा वा.. डुगडुगसरका योग का काय
माया सुरेख लिहिलं आहेस.
सुंदर..
माया सहीच लिहिला आहेस लेख..
अब्बाब्बाब्बा.... मला खरंच
मला हे आठवले I dont have any
म्हणजे विजुभाऊ, "तेरे बिना
छान लेखन! अजून येउ द्या! असे
छान लेखन. अवांतर :- मुसुंची
थोरांनी सगळं म्हणून / कौतुक
chan
ज्यांना कविता कळते त्यांनी
बाबीच हो नक्कि
बाबीच हो नक्कि