Skip to main content
लेखक जासुश यांनी शुक्रवार, 06/08/2010 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य लागेल तसे अंदाजे घ्या. तसे केल्यास सॅंडविच चांगले बनते. बटाटे - ५ एक टोमॅटो-१ कोथिंबीर-थोडीशी कांदा-१ हिरवी मिरची-४ तेल-१ पळी जिरे-मोहरी हळद मिठ बटर. ब्रेड कृती कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कांदा,टोमॅटो एक एक शीजले की क्रमवार घाला. मग हळद घाला.मग उकडलेले, मश केलेले बटाटे घाला. मिठ घाला. ४ मिनिट वाफ काढा. कोथिंबीर घालून मिक्स करा. व भाजी गार होऊ द्या. होल वीट ब्रेड घ्या. त्याला बटर लावा. मग चटणी लावा. मग भाजी लावा. ब्रेड ची दुसरी स्लाइस ह्यावर ठेवा. सॅण्डविच मेकर मधे ठेवून टोस्ट करून घ्या. सॅण्डविच मेकर नसल्यास तव्यावर थोडे बटर घालून त्यावर हे सॅंडविच ठेवा. व कालथ्याने दाबून भाजा. मी केलेले सॅंडविच हे तव्यावर केले आहे. ऑनियन रिंग्स सोबत खा. फोटो बघून झाला की संध्याकाळी वेगळा स्नॅक खाउ नका. वजन वाढेल.

वाचने 6717
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सॅण्डविच तर मस्त दिसतंय. अनिअन रिंगसुद्धा छान. शंका: १ बटाटा, १ पळी तेल आणि बटर...... याला हेल्दी सॅण्डविच का म्हटले आहे? होल व्हीट ब्रेड आहे म्हणून?

प्रतिक्रीयेसाठी आभारी आहे. शंका रास्त आहे. पण मी शेवटी एक टिप दिली आहे ती अशी: फोटो बघून झाला की संध्याकाळी वेगळा स्नॅक खाउ नका. वजन वाढेल. :) फक्त फोटो तेवढा healthy आहे.

तेच म्हणते. फक्त फोटो तेवढा healthy आहे. कारण ओनियन रिंग्ज म्हणजे फ्राईड ! + बेडला बटर ही लावायचे आहेच. healthy पेक्षी रूचकर असा बदल केला तर तो योग्य होईल.

In reply to by मीनल

नावात तेवढे हेल्थि बाकी असो..मला बदल कसा करायचा ते येत नाही.अजुन्हि नविन आहे. बाकी सॅंडविच म्हटल्यावर कुणी क्लिक नसते केले असे वाटून गेले..म्हणून तो शब्द पण टाकला. बाकी त्यात अजुन चीज वगैरे नाहीए..आणि मेयोनिझ पण नाहीए ..म्हणून पार्ट्ली हेल्थि म्हणू शकू. :)