माझे मत
मिसळपाव ह्या संकेतस्थळाशी माझी ओळख झाली ती अगदी अपघाताने. ऑफिसच्या कामानिमित्ताने आंतरजालावर विहरत असताना सहजच ह्या संकेतस्थळाशी गाठभेट झाली. जसजसे मिपा वरील लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया/प्रतिसाद वाचत गेले तसतशी मिपा च्या प्रेमात पडत गेले. कित्येकदा तर (मी मागेच म्हटल्याप्रमाणे) मिपा सदस्यांनी एकमेकांची घेतलेली फिरकी वाचून मी मनसोक्त हसले आहे आणि त्यांच्या हजरजबाबीपणाला मनोमन दाद ही दिली आहे.
मिपाच्या सदस्यांचे विविध विषयांना स्पर्श करणारे लेख, त्यांचा अभ्यास, कविता आणि त्यावरील विडंबने वाचून आपणही ह्या कुटुंबातील एक व्हायचेच हे ठरवले होते. त्याप्रमाणे सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले देखील. त्यादिवशी अगदी एखादा अनमोल खजिना मिळाल्यासारखा आनंद झाला होता. सदस्यत्व मिळाल्यानंतर मात्र मिपा ला भेट देण्याचा योग दोन दिवसांनंतर आला. आणि एक नवीनच बातमी मिळाली कि माझ्याच प्रमाणे आणखीनही काही सदस्य ह्या कुटुंबात प्रवेश करते झाले आहेत. आनंद द्विगुणित झाला.
पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही. मिसळपाववर नव्या जुन्या सदस्यांची चाललेली चिखलफेक पाहून मन विषण्ण झाले. मी नवीनच आहे त्यामुळे कोणालाही सल्ला देण्याइतपत किंवा मार्गदर्शन करण्याइतका मला अधिकार नाही. तरी देखील काही गोष्टी नवीन सदस्यांना मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात किंवा ही माझी कळकळीची विनंती आहे असे समजा हवं तर --
1. मिपा हे एक कुटुंब आहे. नवीन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाची तुलना जुन्या सदस्यांशी करता कामा नये.
2. मिपाच्या जुन्या जाणत्या सदस्यांचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत डावलता येणार नाही. कुटुंबात प्रवेश
केलेल्या नवीन सुनेलाच कुटुंबातील सर्वांना आपलेसे करावे लागते आणि ते ही प्रेमाने व आपुलकीने. सुनेच्या
कनवटीला घरादाराच्या चाव्या लटकण्यासाठी काही काळ हा निश्चितच जावा लागतो.
3. जुन्या जाणत्या सदस्यांनी वेळप्रसंगी केलेली कानउघडणी, दिलेला सल्ला किंवा केलेले मार्गदर्शन हे तितक्याच
खिलाडूवृत्तीने स्विकारता आले पाहिजे.
4. आपण आपला लेख, कविता प्रकाशित केल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया यायला हव्यात हे
ठरविण्याचा अधिकार आपणांस नसतो. देण्यात आलेल्या प्रतिक्रिया कोणीही वैयक्तिक पातळीवर न घेता
त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. अन्यथा न आवडलेल्या प्रतिक्रियांना 'सोडून देण्याचा'
पर्याय प्रत्येकाकडे उपलब्ध असतोच की. तेव्हा लेख प्रकाशित करण्याआधी जुन्या सदस्यांचे लेख व त्यावरील
प्रतिक्रिया अवश्य वाचाव्यात.
5. मिपाच्या जुन्या सदस्यांचे एकमेकांशी असलेले नाते हे निखळ मैत्रीचे आहे. तसेच नाते एकमेकांत आणि जुन्या
सदस्यांशी निर्माण करण्याची जबाबदारी सर्वथा नवीन सदस्यांची आहे.
तेव्हा मिपा च्या कुटुंबात तेढ निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी नवीन सदस्यांचीच आहे हे पुन्हा एकदा ठामपणे सांगते. उडालेला धुरळा हा काही काळापुरताच राहो आणि मिपाच्या कुटुंबातील वातावरण पूर्वीसारखेच हसरे, खेळकर राहो ही मिपाच्या सदस्यांना विनंती.
प्रतिक्रिया
मिसळपाववर नव्या जुन्या
हम्म... हल्ली मला इकडुन
सहमत !! अवांतर : पहिलच लिखाण
अवांतर : पहिलच लिखाण आहे का ?
अंमळ गल्लत होते आहे?
नाही हो...
अगदी अगदी परा...
चुकलं ...चुकलं.......
हा घ्या दुवा...
४) पुण्यात सायकलला चांगले
अगदी अगदी....
सविता, रुपकात्मक, सुंदर
स्वागत
हो
तम्मनांकित प्रिती चा पुढचा
अतिशय संयमित लेखन
छान लिहीलंत.
सविता
"तुझीच " हा शब्द योग्य आहे
पहिलेच लिखाण...
हॅहॅहॅ
सविता = टारझन आहे का?
ह. ह. पु. वा.
>>>सविता = टारझन आहे का? हा
पुप्या... अरे काय हे..
मी इथे आल्यापासुन मधून मधून
संताजी - धनाजी
संतजी धनाजींनी इथल्या लोकांना
अहो ते मोगलांना दिसायचे
चांगले लेखन. मात्र पूर्णपणे
+१
लेखाचा उद्देश चांगला अन
रोशनि चा शेवटचा भाग कुटे आहे?
रोशनि चा शेवटचा भाग कुटे आहे?
अगदी मनातले बोललात... सविता
सविता छान लिहील आहेस.
.
सहसा मी माझं मत कोणी