काय बॅचलर मंडळी शिकलात की नाही सैपाक बिंपाक? अहो नसाल तर लागा तयारीला. चुकुन माकुन एखाद्या IT वालीने गळ्यात माळ घातली तर मग कस व्हायच तुमचं? ;)
आज एका सोप्या डिश पासुन सुरवात करा.
गृहिणींचा आणि बॅचलर मंडळींचा अगदी अडी-नडीला धावुन येणारा किचन मधला दोस्त म्हणजे बटाटा. घरात दुसरी कसलीच भाजी नसली तरी कांदे /बटाटे असतातच. अश्या वेळी नुसत्या बटाट्याच्या काचर्या करुन वेळ मारुन नेता येते.
थोडी फुरसत असेल आणि कणिक तिंबता येत असेल तर हा पदार्थ करुन पहायला हरकत नाही.
साहित्यः
२-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
१/२ चमचा हळद.
१ चमचा जीरे पुड.
१ चमचा लाल तिखट.
२" आलं बारील तुकडे करुन वा किसुन.
७-८ पाकळ्या लसुण बारील तुकडे करुन वा किसुन.
३-४ मिरच्या ठेचुन.
मीठ चवी नुसार.
कणकेचा गोळा चांगला तिंबुन.
कृती:
सर्वप्रथम बटाटे मॅश करुन घावे.
त्यात सगळे मसाल्याचे पदार्थ टाकुन चांगल एक जीव करुन घ्यावं. चवीचा अंदाज घेउन मीठ टाकावं.
कणकेचा गोळा परत एकदा मळुन, लहान सफरचंदाच्या आकाराचा गोळा वेगळा करुन त्याची छोटी पुरी लाटावी.
हातानेच केली तरी चालेल पण कडा शक्यतो पातळ ठेवाव्या.
लिंबाच्या आकाराचा सारणाचा गोळा या तयार पुरी मध्ये ठेवुन तिच्या कडा मोदका प्रमाणे वाळुन घ्याव्या.
शक्यतो मध्ये हवा रहाणार नाही याची दक्षता घ्या. हलक्या हातानेच हा सारण भरलेला दाबुन त्याला पेढ्याचा आकार द्या.
हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या. हे खर कौशल्याच काम.
पुरण पोळीतल पुरण असो आलु पराठल्यातला बटाटा, ज्याला ते सारण आतच कोंडुन पोळी लाटता येत तोच खरा बल्लव् (काकु असेल तर सुगरण).
आमचे हात हलके नसल्याचे पुरावे वरील कलाकृती दाखवतेच आहे. ;) असो मीच करणार, नी मीच गिळणार असल्याने जीथे जमेल तिथे थोडी ठिगळं लावली. पराठ्याचा आकार एखाद्या देशाच्या भौगोलीक नकाश्या सारखा आला नाही या वरच समाधान मानुन आम्ही स्वत:चीच पाठ थोपटुन घेतली.
पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन पराठा खमंग भाजुनघ्यावा.
ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का ;)

वाचने
17556
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटलं...
नळ सुटलाय तोंडात!
मस्त हो
+१
In reply to मस्त हो by चित्रा
पहाटे पहाटे रिकाम्या पोटी
सहमत. बाकि पराठे एकदम झकास
In reply to पहाटे पहाटे रिकाम्या पोटी by मदनबाण
गणपाशेठ,
आहाहा!
|| श्री गणपाय नमः ||
In reply to आहाहा! by सहज
+१ सहमत
In reply to || श्री गणपाय नमः || by आनंदयात्री
बाकी, प्रभुकाकूही चांगल्या
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
+२
In reply to || श्री गणपाय नमः || by आनंदयात्री
+३
In reply to +२ by मराठमोळा
गणपा!!!!!!
रूममेट
मस्त रे गण्पाभौ.... >>असो मीच
नीट बघ..
In reply to मस्त रे गण्पाभौ.... >>असो मीच by प्रभो
सॉरी S O R R E
In reply to नीट बघ.. by मस्त कलंदर
>>>हा कलथ्याने थोड दाबुन गोल
In reply to सॉरी S O R R E by गणपा
हा हा हा प्लेट मधाला ही तोच
In reply to >>>हा कलथ्याने थोड दाबुन गोल by मस्त कलंदर
काय मग गणपा! इकडं कुठं जॉब
मस्तं रे गणपा एक नंबर पाकृ.
पुप्या आख्खा बटाटा सारणात
In reply to मस्तं रे गणपा एक नंबर पाकृ. by llपुण्याचे पेशवेll
तिंबणे आणि लाटणे
कणीक तिंबताना कशी फसते हे नीट
In reply to तिंबणे आणि लाटणे by ऋषिकेश
प्रॉब्लेम्स
In reply to कणीक तिंबताना कशी फसते हे नीट by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझी केस ऐकल्यावर असं वाटत
In reply to प्रॉब्लेम्स by ऋषिकेश
सरळ मकमावशींकडे पोळ्या
In reply to तुझी केस ऐकल्यावर असं वाटत by ३_१४ विक्षिप्त अदिती
जाऊदे
In reply to सरळ मकमावशींकडे पोळ्या by मस्त कलंदर
बटाट्याचे परोठे माझेही आवडते,
मस्तच रे..
प्रा का टा
जुळे झाल्याने
In reply to प्रा का टा by परिकथेतील राजकुमार
गणपा ख ल्ला स पा़कृ रे एकदम
परा तु कालच्या हँगओव्हरचा
In reply to गणपा ख ल्ला स पा़कृ रे एकदम by परिकथेतील राजकुमार
एकदम झक्कास.
सुस्साईईईईईईईईड्ड्ड्ड..............
अरे या गणपाला सैपाकाच्या
गणपाभौ
सर्व मायबाप खवय्यांचे आभार
झक्कास्स्स! च्यायला नुसत्या
शब्द नाहीत..!
कुर्बान.....
मस्तच ........