एक निर्णय्...मदत न करण्याचा. माझा निर्णय चुकीचा आहे कि बरोबर?
एक निर्णय... मदत न करण्याचा.
...परवाचीच गोष्ट आहे. माझ्या शेजारी एक पाकिस्तानी कुटुंब राहते.अगदी well established...नवरा,बायको आणि तीन मुलं.रोजच्या बोलण्या- भेटण्यातून तिच्याशी छान मैत्री झालेली आहे. तिचं नाव लाईमा आहे. वयाने माझ्या एवढीच आणि अतिशय सुंदर! तिच्या सारखीच तिची मुलंही देखणी. एक मुलगी आणि दोन मुलं. ती सारी फलटण माझ्याकडे खेळायला,अभ्यासाला येते.अगदी रोज येते. लाईमा सुद्धा खूप प्रेमळ आहे.अतिशय हसरी,बोलकी आहे.तिच्या नवऱ्याला काही मी पाहिलेले नाही.कारण ती माझ्याकडे तो office ला गेल्यावरच येते. आमचे जे काही बोलणे-भेटणे होते ते तो गेल्यावरच. अर्थात माझ्या घरी जर माझा नवरा असेल तर ती फिरकतही नाही.मला आठवत सुरुवातीला एकदा ती आली होती.बेल दाबल्यावर माझ्या नवऱ्याने दार उघडले.तर अक्षरश: भूत बघितल्यासारखा तिचा चेहरा झाला..शॉक बसावा तशी ती गर्रकन वळली आणि शब्दश: पळत घरी गेली.म्हणजे परपुरुषा समोर जाण्या बद्दलची तिच्या मनातली धास्ती एवढे जबरदस्त होती ना.! तिच्यात आणि तिच्या नवऱ्या मध्ये १०-१२ वर्षांचे अंतर आहे. कुठे बाहेर जाण्याची परवानगी नाही. बिल्डींग मधल्या स्त्री वर्गाशी बोलण्याची मुभा तेवढी होती तिला.ते ही त्यांच्या घरातील पुरुष वर्गाच्या अनुपस्थितीतच हे वेगळे सांगायची गरज नाही. जे काही सामान हवे असेल ते home delivery ने मागवयचे.जमेल तितक्या दारा आडूनच ते घ्यायचे आणि त्याचे पैसे द्यायचे. तीन मुलांचे खाणे पिणे सांभाळता आणि घरकामा मध्ये तिचा दिवस निघून जातो.आणि या सगळ्याची इतकी सवय झाली आहे ना तिला कि तेच तिचे सारे आयुष्य आहे. सवय म्हणण्यापेक्षा संस्कृतीचा प्रभाव आणि त्याबद्दलची स्वीकृती इतकी रुजलेली आहे ना कि कशाही बद्दल तक्रार मनात येऊ द्यायचा विचारही तिनी केला नसेल. असो सांगायचा मुद्दा हा कि ती माझी छान मैत्रीण आहे.
परवा तिनी दुपारनंतर मुलीकडून निरोप पाठवला ती चिमणी आली सांगत सांगत "आंटी मेरी मम्मी आपको बुला राही हैं"
मी ५-६ मिनिटात गेले. कधी नव्हत ते ती प्रचंड टेन्शन मध्ये होती. मी तिला विचारले काय झाले. म्हणाले 'मुझे समझमे नाही आता मै आपसे कैसे कहू,आपसे हेल्प चाहिये थी| " मी म्हटले 'आप बोलो मै क्या कर सकती हु|
तीच्या डोळ्तातले पाणी आत्तापर्यंत वाहायला लागले होते. शेवटी कसेबसे हुंदके आवारात तिने बोलायला सुरुवात केली 'मुझे मेरे भाईजान को पैसे भेजने थे| उसको बडी जरुरत हैं..मुझे तो घर से निकलने के इजाजत नाही हैं.आप वेस्टर्न युनिअन से भेज सकते हो मेरे लिये?'आणि तिने पर्स उघडून काही पैसे काढून समोर ठेवले. लेकीन मेरे हजबंड को पता नाही चालना चाहिये.
माझ्या मनात आले हात तिच्या मारी ! एवढच होय? करून टाकू या ना तिचे काम. नाहीतरी तिच्या नवऱ्याला मी पाहिलेही नव्हते त्यामुळे त्याला मी सांगण्याचा संबंध च नवता. एक्स्चेंज ही चालत जाण्या इतक्या अंतरावर होता. आणि मी तिला तसे बोलूनही गेले कि मी पाठवते पैसे म्हणून. ज्याना पाठवायचे आहे त्यांचे नाव लिहून दे मी पाठवते.
मी तयार होऊन येते आणि जाताना पैसे आणि नाव वगैरे डीटेल्स घेऊन जाते.
मी तिच्या दारातून बाहेर पडले आणि माझ्या घरात शिरता शिरता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हिच्या भावाला पैसे पाठवायचे म्हणजे पाकिस्तान ला पाठवायचे. अरे बाप रे....मग माझ्या मनात इतके असंख्य विचार येऊ लागले ना. कि कशावरून हिचा भाऊ ही हिच्या इतकाच विश्वासार्ह असेल.मी लाईमाला ओळखते. तिचा भाऊ कसा आहे,कोण आहे आपल्याला काहीही माहिती नाही.आपण आपले documents देऊन हे पैसे पाठवणार. उद्या जर काहे वेगळे प्रकरण निघाले तर? तो भाऊ जर काही वेगळ्या गोष्टींमध्ये involved असेल तर? आणि मी कशात तरी अडकले तर?...नाही नाही ते विचारांनी डोक्यात थैमान घातले.एकीकडे तिची आगतिकता मला पाहवत नव्हती.वाटत होत कदाचित असे काही नसेल ही.काहीही होणार नाही. पण एक मन मात्र तयार होत नव्हते.
शेवटी मी निर्णय घेतला तो तिला मदत न करण्याचा.
आधी हो म्हणून बसले होते. पण मनाशी ठरवले कि जाऊन तिच्याशी स्पष्ट बोलायचे. मी तिला पटेल अशा कारणांची मनाशी जुळवा जुळव करायला सुरुवात केली.त्यातले एक final केल.तिच्या घरी जाऊन तिच्याशी बोलले आणि सांगितले कि आम्हाला कंपनी तर्फे पैसे पाठवावे लागतात आणि तिथून असे पैसे पाठवायला परवानगी नाहीये. तिला बिचारीला ते कारण पटलेही. तिच्या डोळ्यात परत तीच अगतिकता दाटली.पण वरकरणी हसून मला म्हणाली 'चलो ठीक हैं,कोई मुश्कील नाही.मै और कुछ रास्ता निकाल लुंगी|" छान कॉफी बनवली माझ्यासाठी .त्या कॉफीची चव मला मात्र नेहमी पेक्षा खूप वेगळी लागली. मन अतिशय अस्वस्थ,उद्विग्न झाल होत....आत्ताही आहे.ती दुसर्या दिवशी पासुन अगदी नेहमीप्रमाणे वागु लागली.पण माझ्या मनातला अपराधी पणा कमी होत नाहीये.
मी केल ते बरोबर केल कि चुकीच? तिला मदत करता येण्यासारखी होती,पण मी नाही केली. आपण खूप स्वार्थी आहोत का?
कि मी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला.स्वत:ला आणि माझ्या कुटुंबाला नको त्या प्रकरणाला कधीही सामोर जाव लागू नये याच हेतूने मी तो घेतला.
तुम्हाला काय वाटत? तुम्ही अशा situation मध्ये काय निर्णय घेतला असता?
प्रतिक्रिया
तू जे हि केल ते योग्यच
अतिशय योग्य निर्णय.
तुम्ही स्वतः पैसे न
अतिशय योग्य निर्णय.
Pagination