आयटीतल्या बायका
(सदर लेखनाची प्रेरणा एका वाक्यात सांगायची, तरः च्यायला, मग आम्हीच काय पाप केलं ? असे म्हणता येईल.)
प्रविन्भप्कर आणि सुजय कुलकर्णींच्या लेखनाने आमचे डोळे खाडकन उघडले. आज जगातले सर्वात महत्वाचे प्रश्न, म्हणजे इंचाइंचाने मागे सरणारे कश्मीर (आणि वर सरकणारा हिमालय), ग्लोबल वॉर्मिंग, मेक्सिको खाडीतील तेल गळती, पुण्यातील परप्रांतीय मुलींची नशाखोरी, पॅराग्लायडिंगच्या छायाचित्रांमुळे वाढलेला इनोचा खप, ह्या सगळ्यांसाठी आयटीतल्या बायका जबाबदार आहेत, अशा आमच्या संशयावर जणू शिक्कामोर्तब झाले.
आमचा हा संशय फार जुना आहे. मनोगतावरून आम्हाला आणि आमच्या देवगडच्या एका मित्राला काढून टाकण्यात, (आणि नंतर उपक्रमावर रिपीट परफॉर्मन्स घडवून आणण्यात) आयटीतील काही बायका (आणि रसायनशास्त्रातले काही अजब पुरुष रसायन) ह्यांचा हात होताच, असे आमचा देवगडचा मित्र आजही छातीठोकपणे सांगतो. पण यापेक्षाही अधिक खात्री पटली, ती आमच्या एका मित्राच्या कहाणीमुळे. तीच कहाणी इथे थोडक्यात ऐकवतो. (सत्यकथा ह्या मासिकांत येणार्या कथांइतकीच ही सत्य आहे, ह्याची खात्री असू द्यावी.)
आमचा मित्र, तिकडला कोल्हापूर साईडचा. मनाने अतिशय निर्मळ वगैरे. सगळं तारुण्य निबंधलेखनात गेलं. वेगवेगळ्या दैनिकांचे उपसंपादक त्याला करीना, बिपाशा, दीपिका सारखे क्यूट आणि सेक्सी वाटायचे. व्हायचं तेच झालं. पत्रकार झाला. कोल्हापूरच्या तरुण भारतात, राजारामपुरीचे विशेष बातमीदार म्हणून फेमस झाला. तुंबलेल्या नाल्यांच्या प्रश्नावर त्याने महानगरपालिकेस धारेवर धरले. शेवटी महापौरांनी खास त्यांच्या स्वतःच्या भट्टीवरची पहिल्या धारेची पाजली, तेव्हा धार जरा बोथट झाली.
अशीच अनेक समाजोपयोगी कामे करत ३५ वर्षाचा झाला, तोपर्यंत म्हातारी अंथरुणाला खिळली होती. लग्न केलं नाहीस, तर भूत म्हणून मानगुटीला बशीन म्हणाली, तेव्हा पोरी बघायला लागला. पण तोवर सर्व देखण्या, मनमिळावू, गुणी मुलींना देखणी, मनमिळावू, गुणी बाळे झाली होती. आता ३०-३२ वर्षांची लग्नाची मुलगी मिळून मिळणार कुठे ? म्हणून त्याने आयटी इण्डस्ट्रीकडे मोहरा वळवला.
हिंजवडीला पोहोचला. तिथल्या एका मल्टिनॅशनलच्या कॅफेटेरियात आमच्या ओळखीने प्रवेश मिळवून दिवसेंदिवस शोध करायचा. एकदाची ६५ किलोखालील एक मुलगी दिसली. नेत्रपल्लवी वगैरे झाली. तिच्या जाड भिंगाच्या चष्म्यांत ह्याला आपले प्रतिबिंब दिसले, तेव्हा "तुमने मुझे अपने नजरोंमे बसा लिया है" वगैरे काही काही बोलला. आणि प्रपोज केले.
तिने त्याचा रिझुमे मागितला, तेव्हाच खरे तर त्याला धोक्याची जाणीव व्हायला हवी होती. पण प्रेमात पडलेल्याला आणि जॉब शोधणार्याला अक्कल नसते, म्हणतात. आयटीतली मुलगी शोधायची म्हणून खरे तर आमच्या मित्राने सहा महिन्यात जे२ईई वगैरे शिकून घेतले होते. तर मुलाखत अशी झाली.
मुलगी: काय स्किल्सेट ?
मित्रः काय असाच थोडाफार, इकडे तिकडे, काहीतरी. तसं घरातलं वातावरण सोवळं, त्यामुळे लग्नासाठी आवश्यक स्किल्सेट स्वतःच बिल्ड केला.
मुलगी: अच्छा, म्हणजे सेल्फ मोटिव्हेटेड, क्विक टु लर्न, वगैरे.
मित्रः हो, तसेच म्हणा. सुरुवात अगदी एफ-१ की पासून.
मुलगी: हायबर्नेट वगैरे ?
मित्रः हो, करतो की. दर शनिवार रविवारी.
मुलगी: स्प्रिंग ?
मित्रः ओढून बघा. ताणेन पण तुटणार नाही.
मुलगी: कुठे कुठे वापरलेत हे स्किल्स ?
मित्रः तशी संधी कमीच मिळाली, आणि मिळाली तीही अनपेड.
मुलगी: व्हेअर डू यू सी युअरसेल्फ इन फाईव्ह इयर्स ?
मित्रः हियर ओन्ली. विथ यू.
बस, त्या "विथ यू" ने त्या जाड भिंगाच्या चष्म्याखाली वाफ जमायला लागली. आणि महिन्याभरात आमच्या मित्राचे लग्न झाले.
बाहेरून अगदी आनंदी वाटणारे युगल. पण आमचा मित्र आमच्या पार्ट्यांना येणे बंद झाले, केस गळायला लागलेच होते, पण आता चंद्रकोर उगवायला लागली होती. सतत विमनस्क दिसायचा. म्हणून एकदा हिंजवडीहून परतताना त्याला गाठला. आणि बळेबळेच दोन पेग पाजले. मग मित्र खुलला, आणि त्याने अनेक किस्से सांगितले. सगळे काही इथे लिहिण्यासारखे नाहीत. (अधिक माहितीसाठी इच्छुकांनी व्यनि करावा. किंवा जाऊ द्या,उगाच सर्वर ची ब्यांडविड्थ कशाला वाया घालवता?)
लग्नानंतर काहीच दिवसांनी, रोज कॅफेटेरियात खायचा कंटाळा आला, म्हणून बायकोला त्याने कुकर लावायला सांगितला.बायकोने आधी कांकूं केले, पण एक नवीन स्किल्सेट रिझ्युमेवर टाकता येईल, म्हणून भात केला. तर पहिल्याच घासात खडा. "अगं, तांदूळ निवडून घेतला होतास का ?" दाताचा टवका थुंकत मित्र म्हणाला. तर बायको खेकसली. "तू मला भात करायला सांगितला होतास. खडे नसलेला, असं स्पेक मध्ये होतं का ? प्रॉडक्ट रिलीज झाल्यानंतर स्पेक बदललेलं कसं चालेल ? पुढच्या वर्शनला ही व्हॅल्यू अॅडेड सर्विस म्हणून कन्सिडर करीन."
नंतर दर शुक्रवारी ती वीकली स्टेटस रिपोर्ट मागायला लागली. एका आठवड्यात त्याच्या रिपोर्टमध्ये घर झाडल्याची फक्त तीनदा नोंद होती, म्हणून "आय हॅव नोटेड धिस फॉर युवर अॅन्युअल इव्हॅल्युएशन", म्हणाली.
भाजी आणणे, कपडे धुणे, घर साफ करणे, अशा प्रत्येक कामासाठी, एक एक बगझिला टिकेट बनवायची, आणि घरी येऊन रोज डॅशबोर्ड उघडून बग-स्टेटस रिव्ह्यू करायची.
मित्र हे सर्व उदास होऊन सांगत असताना, मला उगीच डोक्यात काहीतरी चमकले. मी म्हटले, "पण, काय रे, 'ते' तरी व्यवस्थित होते ना ?" मित्राच्या डोळ्यात पाणी तरळल्या सारखे वाटले.
"वीकली स्टेटस सॅटिस्फॅक्टरी वाटले, तर शनिवारी नक्की. माझी सगळी बगझिल्ला टिकेट्स रिझॉल्व्ड फिक्स्ड असणे आवश्यक आहे, तरच."
मित्र पुढे सांगत होता.
"आमच्या म्हातारीचे काय खरे नाही. तिने अल्टिमेटम दिले, की नातवाचे तोंड पाहिले नाही, तर भूत म्हणून दोघांच्याही मानगुटीला बसेन, म्हणून."
"अरे, पण तुमच्या दोघांच्या मानगुटी कधीच जवळजवळ नसतात. एकदम दोघांच्या मानगुटीवर कशी बसेल ती ?" माझा माफक विनोदाचा प्रयत्न.
मित्राने आवंढा गिळला, आणि पुढे सांगू लागला.
"मी भीत भीतच बायकोला सांगितले. तर, आश्चर्य असं, की ती खूपच खूष झाली. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कंटाळा आला, आता प्रॉडक्ट डेव्हलप करायला मिळणार म्हणून तिला आनंद झाला होता. तिच्या बरोबरच्या -- म्हणजे वयाने आणि आकारानेही-- काही मुली म्हणे अमेरिकेत आयटीत होत्या. त्या हिला ईमेलवरून खिजवायच्या. कारण त्या प्रॉडक्ट करायच्या, आणि ही सर्विस. त्यामुळे स्वतःचे प्रॉडक्ट म्हटल्यावर, तिला एक विकृत आनंद झाला.
तिने रोडमॅप डॉक्युमेंट लिहायला सुरुवात केली. टाईमलाईन्स, प्रोसेसेस, सगळ्या डॉक्युमेंट केल्या. अरे इतके डिटेल मध्ये प्लॅनिंग केले. आता रिक्वायरमेंट देणारी कस्टमर म्हणजे आमची म्हातारी. मग हिने एक पॉवरपॉइंट तयार केले, चित्रे वगैरे काढून, अगदी डिटेलवार. आणि कोल्हापुरात म्हातारीला प्रेझेंटेशन देऊन आली. इंटरमिडिएट डिलिव्हरेब्ल्स ची चित्रे पाहून म्हातारीचे डोळे पांढरे झाले. डेव्हेलपमेंटसाठी वॉटरफॉल मॉडेल वापरावे, का अजाईल प्रोसेसेस ह्यावर बरेच दिवस विचार झाला. शेवटी, अजाईल इज इन, वॉटरफॉल इज सो सेव्हन्टीज, म्हणून ते ठरले. स्प्रिंट प्लॅनिंग मंथली करायचे ठरले, कारण फीचर इंप्लिमेंट करून क्यू-ए, डिप्लॉयमेंट वगैरे व्हायला एक महिना लागतो म्हणे."
मी अवाक होऊन पहात होतो. हसावे की रडावे काही कळत नव्हते. मी सहानुभूती दाखवण्यासाठी आणखी एक पेग मागवला. मित्र मात्र लगेच उठला, आणि म्हणाला, "नको रे, जातो आता घरी. आज तिसरा मंथली स्प्रिंट रिव्ह्यू आहे. उद्यापासून नवीन स्प्रिंट सायकल सुरू होणार. प्रोजेक्ट डिले झाले, तर बेंचावरच्या मंडळींना अॅडिशनल रिसोर्स म्हणून प्रोजेक्टवर टाकेल ती."
असा आमचा निर्मळ मनाचा उमदा मित्र, ह्याचे आयटीतल्या मुलीने कसे वाटोळे केले, बघा. या एका उदाहरणावरून तुम्हाला सहज कळले असेल, की जगातले सगळे प्रॉब्लेम्स आयटीतल्या बायकांमुळे झालेले आहेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
=)) =)) =)) =))
अनुभव नाही
बाकी क्षेत्रातला अनुभव नाही
एक लंबर........
डोळे पाणावले बघा... दुष्ट
हा लेखही विनोदी वाटला
खरेच
वावा वा वा
हा हा हा, अगदी असच
असेच म्हणतो..
क्लास... पुर्वीसारखेच तडकेदार
असेच म्हणतो
तर बेंचावरच्या मंडळींना
+१ हेच बोलतो
हा हा .. सहमत.. मजा आली
ह ह लो पो
+१ असेच म्हणतो
=)) =)) =)) =)) =))
हेच म्हणतो
हायला
संजय
युनिक्स ?
या एका उदाहरणावरून तुम्हाला
हॆहॆहॆ
पु. लं.
अंधारात
" पाध्ये अणि काळं मांजर" असा
:-)
ख प लो. अशक्य फटके. मिभो
खतरनाक.. टिपीकल
एकंदर
देअर यू गो !
अहो मिभो
घासकडवी मास्तर सत्याच्या खूपच
आवरा!
आरं आरं...
हा हा हा लै भारी.. !
ज ब रा
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
खिक्क
आग्गायायायाया ...
प्रतीक्षेत
मी प्रविन्भप्कर यांच्या
=)) मिभोकाका, आजचा दिवस
'धर्म' आणि 'अनुभव'
आर ओ एफ एल.
खल्लास
तिच्या बरोबरच्या -- म्हणजे
=)) मजा आली वाचताना.. मिभो