कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य : ऊत्तरायण -भाग १
व्हाट ईज ए फेंडशिप डे !!!
सर्वात महत्वाचे : मला एक सांगा " व्हाट ईज ए फेंडशिप डे ? मुला-मुलांमधली ,मुली-मुलीमधील मैत्री आणी मुला-मुली मधील मैत्री यातला नेमका फरक काय आहे ? बर मग आपण हा विचार करुयात की हा मैत्रीचा दिवस साजरा करण्याची डी-जे,कॉकटेल डिनर, ओपन नेकचा आणी अजुन सेक्सी दिसण्याकरता बॅकलेस,मायक्रो-स्क्रर्टचा ड्रेस-कोड,एखाद गावाबाहेरचं फार्म हाऊस,सिम्बी सारख्या वसती गृहात,ऊद्याचे मॅनेजर्स बनुन,भक्कम पगाराच्या दिशेने वाटचाल करण्यार्या मुला-मुलींना कशाला लागतो ब्वा ? दुसरा महत्वाचा भाग असा आहे की ५०० पैंकी ५०० मुल-मुली तिथे निख्खळ मैत्रीच सेलिब्रेशन करण्यासाठीच असे आडबाजुच्या फार्म-हाऊसवर गेले असतील नाही का ?.अमीर खाननी एक पिक्चर काय काढल की आला ह्यांना स्टडी-स्ट्रेस !!! मग स्टडी स्ट्रेस घालवायला, चला,थोडीशी घेऊयात ? काय ऊच्चतम विचार आहेत.कोणे-एके काळी दारुला समाजमान्यता नव्हती. आता ती मुला-मुलींना आवश्यक वाटते आणी त्याला आपल्या पिढीन समर्थन देण ह्यात मला विषेश वाटत नाही,त्याच हेच कारण आहे की आमच्या मागच्या पिढीने संस्कार संभाळले नाहीत.पण आता आजचा तरुण संभाळण्याचा प्रयत्न करतो.तर लगेच " नडगी फोड कार्पोरेटर" म्हणुन ठणाणा करतात.
मला ह्या धाग्याच्या प्रवर्तकाला, डॉन्याला, थोडासा वैयक्तीक का असेना , प्रश्न विचारायचा आहे ..बाबा रे !! दहावीला बोर्डात येण्यासाठी ,स्ट्डी स्ट्रेस झालाच असेल नाही का ? मग तो घालविण्यासाठी अश्या किती पार्ट्या केल्या होत्यास तु ??
थेऊर आणी थेऊर ग्रामस्थ :::
थेऊरचा गणपती अष्टविनायकांपैकी एक,दहा एक वर्षापुर्वी थेऊरला साखर-कारखाना झाला आणी ग्रामस्थांची परिस्थिती थोडीशी का असेना बदलली, तत्पुर्वी जी ग्रामस्थ मंडळी पुर्णता नाही पण अशंता का असेना टुरिस्ट बिझनेसवर चालायची.त्यातलेच अष्टेकर महाराज एक ? पंधरा एक वर्षापुर्वी साधे शेतकरीच होते ते ..पैसा हातात खेळायला लागल्यावर छानसा फार्म-हाऊस वगैरै बाधुन घेतला,त्यांच्याच घरातली ही तरूणाई . तर आता ईथे येणारे टुरिस्ट कोण ? अर्थात श्री च देवस्थान म्हणजे "कपल स्पॉट" नाही. तिथे येण्यार्या फॅमीलीज असतात.लक्षात घ्या फॅमिलीज !! अश्या पार्ट्यांच समर्थन करणार्यांनी एकदा मिपाच्या कट्ट्यावर,टेबलावर दिसणार्या दारुचे फोटो,त्यांच्या फॅमीलीमधल्या मेंम्बरला दिसतील म्हणुन " कट्टा वृतांत" लिहायला नकार दिला होता.असो..तर विषय हा आहे की तिथे व्हिजीट करणारे मोस्टली फॅमीलीसकट येतात ..आज सिंहगडावर किती जण फॅमीलीसकट न घाबरता जातात?आज किती जण लोणावळ्याला न घाबरता फॅमीलीसकट जातात.थेऊर मध्ये दारु मिळत नाही असे मी म्हणणार नाही. मिळते की !! त्यात किती जण रात्रभर डीजे लावुन नाचतात ?? ऊद्या जर थेऊरचा सिहंगड झाला तर ? पन्हाळ्याचा तर झालाच आहे .(ईन्द्रजदा तिथे म्हणे सन २००४ ला पार्टी ला गेले होते, त्याच सुमारास एक बारबाला सापडली होती ना तिथे मेलेली !! हो आठवल तोच काळ, मला त्या बारबालेशी ईन्द्रजदा संबध जोडायचा नाही ,पण परिस्थिती बघा ,ज्या परिसरात कधी एकेकाळी अस्मितेसाठी मरेपर्यंत खिंड लढवुन पावन केली गेली,त्याच परिसरात अस्मितेची धिंड काढायाला काही लोक्स जातात आणी त्याच समर्थनही करतात. कलयुगात नग्न-सत्य म्हणजे हेच काय ते )मग थेऊरचही सिहंगड,पन्हाळा होऊ नये असा विचार करण्यात ग्रामस्थांच काय चुकल हे मला कोणीतरी मला समजवा बॉस ?
दहा व्होल्वो भरून ऊघड्या-पाघड्या पोरी येतात काय ? त्याच्यां त्या व्होल्व्होमुळे गणपती मंदीरात जाण्याचा रस्ता अडतो काय ? टेम्पो भरुन आणलेली दारु पुरत नाही म्हणुन अजुन दोन रिक्षा भरून थेऊरच्या बार मधुन दारु आणली काय जाते ? रात्री अकरा नंतर डीजे चा कर्णकर्कश आवाज , ग्रामस्थांची घरे ओलांडुन, थेट हाय-वे पर्यंत पोहोचतो काय ? आणी ग्रामस्थांनी तक्रार ही करायची नाही बर का ? का तर कार्पोरेट/स्टुंडटला फ्रेंडशिप डेची ओली पार्टी करायची आहे म्हणुन ? बर ग्रामस्थांनी काही कायदा हातात घेतला नाही. रितसर पोलीसांना कळविले. मग त्यात त्यांचे काय चुकले ??मी तर उलट म्हणेन चांगल झाल ..बर ग्रामस्थांची हाणामारी झाली नाही तिथे...शिवाय कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता
जेव्हा असल काहीतरी होत तेव्हा पब्लीक पेटलय ते चांगल झालय अस समजायला काय हरकत आहे ? एक प्रकारच जनमत होत नाही का ते ?
पत्रकारिता .....
मला एक कळत नाही दरवेळी पत्रकारांची कशी काय चुक असते !! ..मिडीया आहे..मिडीयाला वाचक आहेत..जसा वाचक-वर्गाची मागणी तशीच मिडीया पुरविणार ना !!..नाहीतर मिडीया कसा खपायचा... रियालिटी शोजला (आणी त्यावरच्या धाग्यालाही) टीआरपी काही ऊगाच मिळत नाही. आता त्यातले सर्वच पत्रकार तसे नसतात, पण जे असतात,त्यांच्यावर,जनरलाईज्ड विधाने करून,थेट बोट ठेवणे हे कितपत योग्य आहे ह्याचा आपण विचार करावा.कोठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही मुला-मुलीच नाव आलेलं नाही्.याचा सरळ अर्थ असा होतो की बातमी देण हे महत्वाच होत सर्वांसाठी ..माझ्या माहीतीतली एक पत्रकार बिचारी , पार्टीच्या कारवाईच्या दुसर्या दिवशी पहाटे पाच ला तिथे पोचलेली ..रात्री बारा वाजेपर्यंत उपाशी राहीली...हे जर आपण असे म्हणाल की केवळ सनसनाटी निर्माण करायसाठी...तर ते चुकीच नाही का होणार ? ..बघा कशी गल्लत आहे समाजमनाची...एक स्त्री-पत्रकार उपाशीपोटी बातमी कव्हर करते आणी त्याच बातमीतल्या नंग्या-पुंग्या स्त्रिया बियर पित नाचतात...
काय फायदा झाला तिच्या त्या उपाशी रहाण्याचा !! पण पत्रकारांना नेहमीच अशा प्रकारच्या क्रिटीक्सला सामोरे जावे लागते , असो ...पण पत्रकारांना नावे ठेवण्याएवजी जरा परिस्थितीचा विचार करा...बातमी आपल्यापर्यंत कुठल्या खाच-खळग्यांतुन पोहोचते त्याचा.. सर्वप्रथम एखादा कार्यकर्ता किंवा एखादा सोर्स बातमी देतो..क्राईमच्या बातम्यांसाठी बर्याच अंशी पोलीसांवर अवलबुंन रहाव लागते ...त्या बातमीला पुरावे जोडावे लागतात ..कुठला क्राईम-अॅक्ट खाली हा गुन्हा घडला आहे त्याचा अभ्यास लागतो....असो ..प्रोसेस सांगत बसलो तर अजुन एक डायरी लिहावी लागेल ..त्यात पुण्यात कोठे-कोठे आणी किती पार्ट्या होतात माहीत आहे मला...कसल्या-कसल्या होतात...त्याच्या बातम्या आपल्यापर्यत पोचत देखील नाही. कारण माहीत आहे ..ती म्हणजे तिथली राजकारण्यांशी संबधित असणारी काही ग्रामस्थ काही अंशी का व्हायना त्यात सामील असतात, पार्टीत नाही, पार्टीत मिळणार्या ऊत्पनात आणी कधी कधी पार्टीतही..स्वताची लाल करायची म्हणुन नाही पण थर्टी -फर्स्ट नाईट नंतर लोहगाव परिसरात मी हे प्रकार (जेन्युअन आहेत की नाहीत ह्याची तमा न बाळगता) बंद केले आहेत ...(वाघोलीला एकदा पार्टी झाली होती,पण ते आपल्या अखत्यारीत नाही.) तर साम्गायचा मुद्दा ईतकाच जर त्या तिथला ग्रामस्थ पेटला तर बर्याच अंशी सत्य माहीत व्हायला आपल्याला मदत होईल ..अन्यथा ...दुसरा मार्ग नाही...मी हे नाही म्हणत की पोलीस त्या सामील नसतात ..काही अंशी हे सत्य देखील असु शकत...सगळेच नाही... बॉस त्यांनाही त्याबद्दल माहीती असायला हवी ना !! राऊंडच्या गाडीला सगळेच्या सगळे फार्म हाऊस चेक करणे शक्य आहे का ? का त्यासाठीपण आर्मी बोलवायची...राज्यात पोलीसांची कुमक आणी स्थिती ह्याचा अभ्यास करा एकदा ....
क्रमश !!
प्रतिक्रिया
सही है भिडु लगे रहो शब्दशः
पन्हाळा ???????
कधी पासुन झाली दारु बंदी
सहमत
वा सुहास राव अतिशय चांगला
सुहाशा तुझ्या सर्व
ग्रामस्थांची आणी मिडीयाची
अभिनंदन करायला हवेच पोलिस अन ग्रामस्थांचे
अभिनंदन करायला हवेच पोलिस अन ग्रामस्थांचे
भलत्या अपेक्षा तुमच्या
तथाकथित विचारवंतांच्या,
सुहास, एकदम मस्त! सहमत
एकवीरा आई
प्रतिक्रिया
सदस्य कटुता येण्याचा प्रश्नच उभा राहु नये.....
क्षमस्व !!
मस्त
इथेही....
ओके
दुसरी बाजू
सहमत
छान चर्चा... १)महाराष्ट्रात
दुटप्पीपणा???
इथे सरकार दारु बनवण्यासाठी
कपल स्पॉट ?
या मुलामुलींची वयं काय होती?
आजच्या तरुणाचा विजय असो!
मझ्या बलोबल प्यार्टी करनार
मझ्या बलोबल प्यार्टी करनार
मझ्या बलोबल प्यार्टी करनार
आमच्याकले की नैइ १ बी एच के